श्रेष्ठ रचनाकार
© निसर्ग शिकवण...भाग-७ © ०©० श्रेष्ठ रचनाकार कोण ? ०©० निसर्ग..... सजिव आणि निर्जिवांचा सुंदर मिलाफ साधणारा निसर्ग....सृष्टिची रचना करणार्या विधात्यानं माणवाला अधिक बुद्धिमाण केलं. या बुद्धिमत्तेच्या जोरावर माणवाने सर्व प्राणिमात्रांमध्ये आपलं श्रेष्ठत्व सिद्ध केलं. नवनिर्मितीचा भोक्ता असलेला माणूस या जिवसृष्टिवर अनेक रचना करतोय. कधी भूतलावर तर कधी भूगर्भात तर कधी अनंत पोकळीत. त्यामुळे कदाचित असेल किंवा बुद्धिचा गर्व म्हणून असेल काही मानसे स्वत:ला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजतात .दुसर्या जिवांना ते कायम कमी लेखतात. परंतु निसर्गात असे काही रचनाकार आहेत कि त्यांच्यापुढे माणवाची कला फिकी पडते. या सृष्टित असे काही जीव आहेत कि त्यांच्याकडे बघुन त्यांना विचार करणारा मेंदु आहे किंवा नाही असा प्रश्न पडेल. परंतु त्यांची निर्मिती अशी अगाध आहे कि ती माणसालाही तोंडात बोटे घालायला लावते. उदा. (१) सुगरण.... इवलासा पक्षी. आपल्या ईवल्याशा चोचीने गवत गोळा करून त्यांची अशी काही विण करतो कि माणसालाही ती उकलता येणार नाही.<br> (२) वाळवी..... हा ईवलासा किटक... परंतु आपल्या कुटुंबासाठी उन , व...