श्रेष्ठ रचनाकार

© निसर्ग शिकवण...भाग-७ ©

०©० श्रेष्ठ रचनाकार कोण ? ०©०

निसर्ग..... सजिव आणि निर्जिवांचा सुंदर मिलाफ साधणारा निसर्ग....सृष्टिची रचना करणार्‍या विधात्यानं माणवाला अधिक बुद्धिमाण केलं. या बुद्धिमत्तेच्या जोरावर माणवाने सर्व प्राणिमात्रांमध्ये आपलं श्रेष्ठत्व सिद्ध केलं. नवनिर्मितीचा भोक्ता असलेला माणूस या जिवसृष्टिवर अनेक रचना करतोय. कधी भूतलावर तर कधी भूगर्भात तर कधी अनंत पोकळीत. त्यामुळे कदाचित असेल किंवा बुद्धिचा गर्व म्हणून असेल काही मानसे स्वत:ला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजतात .दुसर्‍या जिवांना ते कायम कमी लेखतात.

परंतु निसर्गात असे काही रचनाकार आहेत कि त्यांच्यापुढे माणवाची कला फिकी पडते. या सृष्टित असे काही जीव आहेत कि त्यांच्याकडे बघुन त्यांना विचार करणारा मेंदु आहे किंवा नाही असा प्रश्न पडेल. परंतु त्यांची निर्मिती अशी अगाध आहे कि ती माणसालाही तोंडात बोटे घालायला लावते.

उदा.

(१) सुगरण.... इवलासा पक्षी. आपल्या ईवल्याशा चोचीने गवत गोळा करून त्यांची अशी काही विण करतो कि माणसालाही ती उकलता येणार नाही.<br>

(२) वाळवी..... हा ईवलासा किटक... परंतु आपल्या कुटुंबासाठी उन , वारा आणि पावसातही खंबीरपणे टिकुण राहणारं मातीचं वारूळ तयार करते. हे वारूळ माणवनिर्मीत अत्याधुनिक वातानुकुलित घरालाही लाजवेल असं असते.

(३) कोळि..... किटक वर्गात मोडणारा कोळी. छोटासा जिव परंतु तो जाळं असं काही विणतो कि त्याचा सुगावा माणसालाही कधी लागत नाही. भल्याभल्या शत्रूंची तो शिकार करतो.

मानवाने आपल्या कुशाग्र बुद्धिचा वापर करून अनेक श्रेष्ठ रचना केल्या आहेत. उदा. ताजमहल , आयफेल टाॅवर , स्टॅचु आॅफ लिबर्टि इ. या वास्तूंना जगातील आश्चर्य म्हणून ओळखले जातात. पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान प्राण्याच्या दृष्टिने माणवाला हि भूषणावह बाब आहे. परंतु याचा अर्थ असा होत नाही कि माणसाशिवाय या भूतलावर कुणी श्रेष्ठ रचनाकार नाही. निसर्गाकडे उघड्या डोळ्यांनी बघितल्यास माणसापेक्षाही अनेक श्रेष्ठ रचनाकार आपल्याला सापडतील. वर दिलेली उदाहरणे हे त्याचेच प्रतिक आहेत.

जगात माझ्यापेक्षा बुद्धिमान , माझ्यापेक्षा शक्तिशाली , माझ्यापेक्षा कलावान , माझ्यापेक्षा गुणवान अनेक जीव आहेत.मी गुणवाण आहे पण माझ्यापेक्षाही अधिक गुणवान या जगात आहेत. मी बुद्धिमान आहे पण माझ्यापेक्षाही अधिक बुद्धिमान या जगात आहेत. मी एक चांगला कलाकार आहे पण माझ्यापेक्षाही उत्तम कलाकार या भूतलावर आहेत. हि बाब प्रत्येकाने लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आपल्याकडे असलेल्या कला , बुद्धि , गुण इत्यादिंचा सार्थ अभिमान प्रत्येकानेच बाळगावा पण त्या कलांचा घमेंड मात्र कधीही करू नये. कारण विद्या विनयेन शोभते.

- श्री. गुलाब बिसेन (९४०४२३५१९१)

ब्लाॅग - Gulabbisen.blogspot.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

कवलकी बंडी (नहानपनको खेल)

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा