पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कविता - आमची झाडीपट्टी

 आमची झाडीपट्टी आमची झाडीपट्टी झाडा झुळपाची बांद्या खोबर्‍याची तर्‍या बोळीची गावखारीची आमची झाडीपट्टी देशी खेळाची शंकरपटाची मोवरानाची तान्यापोर्‍याची आमची झाडीपट्टी दंड्यार नाटकाची कवी लेखकाची भवभूतीची झाडी गोंडीची आमची झाडीपट्टी वैनामाईची धाना तुरीची लाखोरी जवसाची वेरू वास्त्याची आमची झाडीपट्टी ढोडी नाल्याची रेती मातीची ढुड्डी पोर्‍याची फणस बोराची आमची झाडीपट्टी चक्रधराची मुकुंदराजाची पोवारी बोलीची नागझिर्‍याची ( ता. क. मित्रहो, जसा मनात आला तसा लिवलु. वाचून गोळ मानुन घ्या बाबा.) - गुलाब बिसेन (9404235191)

बालमनाची उत्कट व प्रगल्भ अभिव्यक्ती – ‘ मोहर’

 बालमनाची उत्कट व प्रगल्भ अभिव्यक्ती – ‘ मोहर’                        मानवी मनाच्या अथांग सागरात उमटणाऱ्या नानाविध भावना आणि कल्पना समर्थपणे व्यक्त करण्याची प्रचंड ताकत काव्यामध्ये आहे, हे वादातीत आहे. तथापि वरवर सोपा वाटणारा हा साहित्यप्रकार लीलया हाताळण्यासाठी उपजतच संवेदनशील मन आणि उच्चकोटीची प्रगल्भता हवी हेही तितकेच खरे! कवितेचे हे शिवधनुष्य पेलण्याची ईश्वरदत्त देणगी मोजक्याच काही लोकांना प्राप्त असते.                       बालपण हे खरेतर स्वच्छंदी फुलपाखरासारखे या फुलावरून त्या फुलावर  खेळण्या- बागडण्याचे वय ; पण या वयातही शब्दांच्या जादुई दुनियेत अगदी सहजपणे विहरणारी काही दुर्मिळ पाखरेही असतात! कु वैष्णवी युवराज सुतार हे नाव त्यांपैकीच एक. उंड्री ( ता पन्हाळा, जि. कोल्हापूर) सारख्या एका छोट्याशा गावातील जिल्हा परिषेदेच्या शाळेत सातव्या इयत्तेत शिकणारी ही चि...

पोवारी कथा - बोली

 पोवारी कथा - बोली लेखक - गुलाब रमेश बिसेन मु. सितेपार , ता. तिरोडा , जि. गोंदिया. मो. नं. 9404235191 ई मेल - gulab0506@gmail.com टॅक्टरकं आवाजलक बिरज उठेव. बल पेटायस्यान भीतपरकं घळीमा देखन बसेव. पायटंका पाचपरा घळीका  काटा बस्या होता. "कोठी आयेतजी बोरे ?" येनं आवाजलक वू उठस्यान बाहेरकं सपरीपर आयेव. "हे खालतच्या सपरीवरच आहेत." तसा हमाल एकएक धानका बोरा उचलस्यान टालीमा भरण बस्या. चुरणो होयस्यान हप्ता भयी रहे. टॅक्टर नही मिलेलक घरचं बोराकी छल्ली लगायस्यान टॅक्टरकी बाठ देखत एक हप्ता चली गयेव. बिरजको मोठो टुरा नागपूरकं काॅलेजमा सिकत होतो. गये मयनामा काॅलेजकी फी भरणसाती वोनं आपलं मोठं सारोकनलक सात हजार उचलीतीस. बरसातमा परापाणीसाती उचलेव सोसायटीको कर्जाको ब्याज बढत होतो. धान कटाईपासून चुरणोवरीको खर्चा देनो बाकी होतो. येनं सबको मनमा बिचार करतच बिरज नास्ता करस्यान गंजपर जानला नाकलेव. संगमा गावमाका दुयच्यारझन होताच. सबजन टॅक्टरपर बसस्यान निकल्या. गंजपर दलालका हमाल बाठच देखत होता. हमालयीननं बोरा उतरायस्यान ढेरी लगायीन. बोलीला बेरा होती. बिरज आपलं संगवालयीनसंगं ढेरीजवर ...

मुलांना वाचनानंद देणारा वाचनसखा

 मुलांना वाचनानंद देणारा वाचनसखा वर्गात प्रविष्ट होणारे प्रत्येक मूल हे भिन्न परिस्थितीतून, भिन्न वातावरणातून आलेला असतो. सोबतच वर्गातील प्रत्येक मुलाची बौद्धिक क्षमता कमी जास्त असते. त्याचा एकंदरीत परीणाम मुलांच्या क्षमता विकासावर होत असतो. सर्व मुलांच्या त्या वर्गातील सर्व क्षमता एकासोबत विकसित होतील असेही नाही. त्याचाच विचार करून मुलांची वाचन क्षमता विकसित करताना येणारे अडथळे दूर करत मुलांना आनंददायी पद्धतीने वाचनाकडे वळवण्यासाठी जि. प. वरीष्ठ प्राथमिक शाळा भरैगाव , ता. देवरी , जि. गोंदिया येथे कार्यरत असलेले उपक्रमशिल शिक्षक, आमचे मित्र सदाशिव निळकंठराव पाटील हे "वाचनसखा" हे त्यांच्या लेखनीतून साकारलेले पुस्तक घेऊन आले आहेत. वाचनाचा पहिला टप्पा चित्रवाचन. या चित्रवाचनाच्या माध्यमातून पुस्तकामध्ये मुळाक्षरांची ओळख करून दिली आहे. सोबतच लेखन सरावासाठीही जागा दिली आहे. वाचन क्षमतेवर असणारी लहान मुले चित्रांकडे आकर्षित होत असतात. त्यामुळे मुलांच्या परिसरातील, परीचीत चित्रांचा यात कल्पक योजना केलेली आहे. एकुण ३१ पाठांमध्ये मुळाक्षरांपासून चौदाखडीपर्यंतची ओळख करून देण्यात आली आह...

लेख - मोहर फुलला

 लेख - मोहर फुलला शिक्षण ही मुख्यता बहुध्रृवीय क्रिया आहे. विद्यार्थी शाळा, परीसर, समाज, शेजार, घरातून सतत काहीना काही शिकत असतो. शिकण्याच्या या प्रक्रियेमध्ये शाळा हा महत्वाचा घटक आहे. शाळेतील शिक्षक - विद्यार्थी या दोन ध्रृवांदरम्यान सतत आंतरक्रिया घडत असते. हि प्रक्रिया अविरत सुरू असते. या प्रक्रियेमध्ये शिक्षकांचा विद्यार्थ्यांवर आणि विद्यार्थ्यांचा शिक्षकांवर परस्पर कमीअधिक परीणाम होत असतो. यात शिक्षक हा सुलभकाची भुमिका वठवत विद्यार्थ्यांच्या अंतर्गत ऊर्जेला योग्य दिशा देण्याची जबाबदारी पार पाडत असतो. अशा दिशादर्शनातूनच भावी पिढीचे सुजाण नागरीक, कलावंत, शास्रज्ञ, खेळाडु, विचारवंत, लेखक, कवी, साहित्यिक घडत असतात. अशाच एका प्रवासाचा मांडलेला हा प्रपंच. माझी मे २०१८ साली कोल्हापूर जिल्हा परीषदेच्या विद्यामंदिर उंड्री (ता. पन्हाळा) या शाळेत बदली झाली. पूर्वीच्या द्विशिक्षकी शाळेपेक्षा येथील वातावरण निराळे होते. शिक्षक संख्या आणि विद्यार्थी संख्याही मोठी. अशा शाळेत काम करताना सुरूवातीला वातावरणाशी जुळवून घ्यावं लागलं. जूनमध्ये शाळेची घंटा वाजली. सारे सोपस्कार पार पाडत वर्ग सुरू झ...

प्रस्तावना

 प्रस्तावना मानवी जीवन हे उत्क्रांतीतून फुललेले नवजीवन आहे. माणसाने आपल्या क्रांतीकारी विचारांना कृतीची जोड देत सर्व प्राणीमात्रांत स्वत:चं श्रेष्ठत्व सिद्ध केलं. आपल्या देशालाही अशाच क्रांतीचे स्फूल्लींग फुलवणार्‍या क्रांतीनायकांची पार्श्वभूमी आहे. शेकडो वर्षापूर्वीपासून या मातीत क्रांतीनायकांनी क्रांतीची बीजे रूजवली आणि इतिहासात मानाचे स्थान प्राप्त केले. अशाच इतिहासाच्या पानांवर स्वकर्तृत्वाने आपले मानाचे स्थान मिळवलेल्या थोर विभूतींपैकी निवडक नऊ महापुरूषांच्या कार्यकर्तृत्वाची आपल्या वेगळ्या शैलीत ओळख करून देण्यासाठी अमित पाटील "क्रांतीनायक" हे पुस्तक घेऊन आले आहेत. अमित पाटील हे विद्यार्थी आहेत. ज्ञानार्जनासोबतच ते वक्तृत्व, कथाकथन, एकपात्री प्रयोग, कविता लेखन या माध्यमातून श्रोत्यांना मंत्रमूग्ध करत आहेत. "क्रांतीनायक" हे त्यांचे पहिलेच पुस्तक आहे. या पुस्तकातून क्रांतीनायकांची ओळख करून देताना त्यांनी नेहमीच्या चौकटीतून न जाता आपल्या वेगळ्या शैलीची छाप सोडली आहे. अमित पाटील हे कवी असल्याने त्यांनी क्रांतीनायकांचा जीवणपट वाचकांपुढे मांडताना कवीतेचा खुबीने वापर ...

कदम निरंतर चलते जिसके.....

 कदम निरंतर चलते जिसके..... "पोवारी बोली व संस्कृती" ही आज महाराष्ट्र,मध्यप्रदेश व छत्तीसगड पुरतीच परिचित राहिली नसून जिथे जिथे हा समाज वास्तव्यास आहे तिथे तिथे या बोली व संस्कृतीचे जतन करण्याचे प्रयत्न समाजबांधव करीत आहेत. आता ही बोली व संस्कृती केवळ श्राव्य राहिलेली नसून ती लिखानाद्वारे पुस्तकबद्ध सुद्धा होत आहे,हि बोलीअभ्यासकांसाठी अतिशय अभिमानाची बाब ठरलेली आहे. रामायण,महाभारत,श्रीमद्भगवगीता व ग्रामगीता हे महाकाव्य व विशालप्राय दस्तावेज पोवारी बोलीत अनुवादित करण्याचे महत्कार्य पोवारी बोलीचे अर्ध्वयू संततुल्य मा.श्री.जयपालसिंहजी पटले यांनी. पुढे बर्याच पोवारी साहित्यिकांनी आपली सृजनप्रतिभा जागृत करीत पोवारी कवितासंग्रह,पोवारी दंडार लावणी,पोवारी नवटंकी नाटक,संगीत नाट्यकथालेखन केवळ पुस्तक स्वरूपातच नाही तर रंगभ्मीवरही सादर व्हायला लागले. स्व.श्री.मनराजजी पटेल यांच्या कवितांचे संगीतबद्ध ध्वनीमुद्रणही गायक श्री.चेतन राणे यांच्या सुमधूर आवाजात मुद्रित झाले. पोवारीतून कथालेखन हा प्रकार थोडा मागे राहिला होता पण डाँ.ज्ञानेश्वरजी टेंभरे यांनी पोवारी महापुरूष यांचे कथारूपात मांडणी क...

सृजनशाळा : सृजनशिलतेने झपाटलेल्या एका शिक्षकाचा उपक्रमकोश

सृजनशाळा : सृजनशिलतेने झपाटलेल्या एका शिक्षकाचा उपक्रमकोश लेखक - चंद्रकांत निकाडे एकविसाव्या शतकाच्या सुरूवातीला प्राथमिक शिक्षण विभागात शिक्षकांची एक नवी पिढी दाखल झाली आणि प्राथमिक शाळांतून चैतन्याचे वारे वाहू लागले. खर्‍या अर्थाने आनंददायी शिक्षणाची पहाट उगवली. पाठ्यक्रमाबरोबरच नाविण्यपूर्ण उपक्रमांमुळे विद्यार्थी विकासाचा आलेख उत्तरोत्तर उंचावत गेला. आजतागायत हा आलेख प्रगतीच्या दिशेने घोडदौड करत आहे. पन्हाळा तालुका तसा कोल्हापूर जिल्ह्यातील डोंगरी विभागात मोडणारा भाग. बहुतेक सर्व गावे आणि शाळा दुर्गम प्रकारात मोडणार्‍या. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या तालुक्याला अनेक ऐतिहासिक संदर्भ आहेत. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे अनेक दिग्गज आहेत. राजकिय पटलावर आपल्या कर्तृत्वाने विकासाची गंगा तळागाळापर्यंत पोहचविण्याचा आटोकाट प्रयत्न करणारे नेतेही आहेत. बेभरवशाच्या शेती या एकमेव उद्योगाला उत्तम पर्याय म्हणून शिक्षणाकडे पाहण्याची दृष्टी या तालुक्यातील पालक व विद्यार्थ्यांना लाभली आहे. अशा परिस्थितीत गोंदीया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील सितेपार गावातून सेवेच्या निमित्ताने एक युव...

शिक्षकांच्या सामाजिक बांधिलकीचा वेगळा पैलू

 शिक्षकांच्या सामाजिक बांधिलकीचा वेगळा पैलू संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचा केंद्रबिंदू असलेला विद्यार्थी सध्या कोरोनाच्या कहराने घरातच बंदिस्त झालाय. मुलांच्या किलबीलाटाने गजबजणार्‍या शाळा ओस पडल्यात. त्याचा परीणाम विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनावर होत आहे. तसे बघितले तर विद्यार्थी हा केवळ शाळेतच शिकतो असे नाही. परंतु विद्यार्थ्यांना काही गोष्टी जाणिवपूर्वक शिकवाव्या लागतात. त्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज असते. त्या गोष्टी शाळांमधून शिकवण्याचे काम शिक्षक करत असतात. त्यामुळे वैश्विकीकरणाच्या या काळात शिक्षकांची भूमिका अधिक व्यापक झाली आहे. कोरोनामुळे शाळाच बंद असल्याने शिक्षकांचे अध्यापन बंद झाले. परंतु विद्यार्थ्यांचे शिक्षक अखंडीत सुरू राहावे. शिक्षण बंद पडू नये यासाठी शिक्षक धडपडत आहेत. कुणी आॅनलाईन तर कुणी आॅफलाईन , कुणी गट कार्यातून तर कुणी समुह अध्यापनाद्वारे धडे देण्यात गुंतले. "शाळा बंद , शिक्षण सुरू" या धेय्याने प्रेरीत शिक्षक सर्वत्र धडपडताना दिसू लागले. कोरोनामुळे परिस्थिती अधिकच बिकट होत गेली. तसे शासनाचे सर्व विभाग कामाला लागले. अशावेळी शिक्षण विभाग कसा मागे राहील. मग शि...

नव शिक्षक घडवताना…...

 नव शिक्षक घडवताना…... सध्याचा काळ हा अनेक अंगाने संक्रमणाचा काळ आहे.  या काळामध्ये रोज नवे घडत आहे.  या नवे घडण्याची गतीही अफाट वेगाने वाढते आहे.  काल ज्या  संकल्पना आपले मूळ रोवून  खांबाप्रमाणे घट्ट उभ्या होत्या, त्या आज उन्मळून पडल्या आहेत.  जग रोज बदलतंय.  या जगात रोज नवं घडत आहे.  विद्यार्थी शिक्षक यांच्यातील नातं या तंत्रज्ञानाच्या काळात बदलत चाललेलं आहे. वर्गातील विद्यार्थी हा केवळ शिक्षकाकडूनच शिकत नाही, तर त्याच्या सभोवती असलेलं  निसर्गरुपी पुस्तकही त्याला शिकवतच आहे. सोबतच इंटरनेटचं  मायाजाल त्याला नवनवे रोजच  काही ना काही शिकवत आहे.  अशा विद्यार्थ्यांना रोजच सामोरे जाणारा शिक्षकही अपडेट असणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी शिक्षकांनी जुनी परंपरागत शिक्षणाची पांघरलेली झूल उतरून नव तंत्रज्ञानाची कास धरणे ही काळाची गरज झाली आहे. अशा दिवसेंदिवस आव्हानात्मक ठरत  चाललेल्या परिस्थितीत टिकून राहण्यासाठी नव शिक्षक घडवणे गरजेचे ठरते.  मग तो घडेल तरी कसा?  यासाठी दोन पातळ्यांवर प्रयत्न होणे गरजेचे ठरेल. व...

तरूणांच्या स्वप्नांना हवे दातृत्वाचे बळ

 तरूणांच्या स्वप्नांना हवे दातृत्वाचे बळ देश सेवेचा ध्यास घेवून सैन्यात जाण्यासाठी सज्ज असलेले काही युवक एकत्र येतात. मैदानावर कुठल्याही सोयी सुविधा नसताना घाम गाळून मेहनत करतात. सुविधांची वाणवा असताना इतरांना प्रेरित करून नित्याने सराव सुरू ठेवतात. बेरोजगार असतानाही पदरमोड करून मैदानावर स्वखर्चाने तुटपुंजे का असेना साधनं बसवतात. एक एक करत युवकांना जोडतात. "एक एका साह्य करू , अवघे धरू सुपंथ" या उक्तिप्रमाने हे युवक हातात हात घालून एकमेकांना प्रेरणा देत आहेत. हि गोष्ट आहे , गोंदिया जिल्ह्याच्या पुर्व टोकावर नागझिरा अभयारण्याच्या कुशित वसलेल्या सितेपार (ता. तिरोडा) आणि परिसराती गावांतील तरूणांची. देश सेवेसाठी भारतीय सैन्यात भर्ती होण्याचे स्वप्न बाळगणारे हे तरूण. सितेपार , खेडेपार परिसरातील कुणाल रहांगडाले , समित पटले , मुकुल झंझाड , संगम रहांगडाले , मनोज बघेले , आकाश कटरे , खोमेश ठाकरे , जितेंद्र माहुरले , पिंटु पटले , अक्षय रहांगडाले , सुहास हजारे , सोपान तुमसरे , रविंद्र पारधी , अमित पडोळे , शुभम रहांगडाले , संस्कार माहुरले , विकी रहांगडाले या तरूणांनी खेडेपार येथिल मैदानावर...