श्रमसंस्कार - बागकाम

श्रमसंस्कार - बागकाम

आॅगष्ट महिण्यात शाळेच्या आवारात लावलेली फुल झाडे व शोभेची झाडे , पावसाळाभर पाणी पिऊन आता स्वत:च्या पायावर उभे झालेत. काहि झाडं वाढली तर काहि झाडं फुलली. वाढलेली व फुललेली झाडे बघुन मन अगदि प्रसन्न होते.

झाडांची देखभाल आम्ही मुलांच्या मदतीने करतो. झाडांतील तण काढणे , पाणी घालणे हि कामे मुलेच करतात. त्यामुळे मुलांना झाडांविषयी आपुलकी वाटले. मुले झाडांची काळजी घेतात. त्यांचे नुकसान होण्यापासून रक्षण करतात.

ऐन पावसाळ्यात झाडे लावल्याने झाडे चांगली वाढलित.सततच्या पावसामुळे झाडांना पाणी घालायची गरज पडत नव्हती. दिवाळी सुट्टिनंतर पाऊस गेल्यामुळे मुलांनी झाडांना पाणी घालायला सुरूवात केली. पण तिव्र उतारामुळे पावसाळ्यात झाडांभोवतीची माती वाहुन गेल्याने पाणी काहि थांबेना.

हि समस्या घेवून मुले माझ्याकडे आले. तेव्हा मि त्यांना झाडांभोवती आळे करण्याचा सल्ला दिला. सोबत प्रात्यकक्षिकही करून दाखवलं. मग काय ... हि मंडळी लागली कामाला. प्रत्येकाने दोन दोनच्या गटात सर्व झाडांना आळे केले. आता पाणी आळ्यात थांबून झाडाभोवती मूरते. त्यामुळे झाडे चांगलीच तरारलित....... गुलाब बिसेन (९४०४२३५१९१)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

कवलकी बंडी (नहानपनको खेल)

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा