जागली
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
० जागली ००
" शांता , मी बांद्यायवर जावून रायलो. " सेवक ताटावर बसल्याबसल्या हात धुतच चिल्लवला. तशी वाळीत लसणा - कांद्याचे वापे कोळपत बसलेली शांता वापे कोळपावचा सरूता तेतीच ठेवत घाईघाईना धावतच आली. अना पाण्याची डबकी भरू लागली.शांता सोनेखारीच्या पाटलाची पोरगी ! सेवकसंगा लगण झाल्यावर सितेपारात आली. आज लग्नालं पंचीस साल झाले. सेवकघरी तशी गरीबी होती. पर तिना कयी बापाघरची पाटेलकी दाखवलन नायी. ती सेवकच्या खांद्याल खांदा लावून संसाराचा गाळा चालवत रायली. गरीबीचे दिवसायलं सुखाच्या दिवसात बदलवासाठी ते नवर्यासंगा मोठ्या नेटाना कष्ट करत होती. कयी कयी सेवकसंगा नायी पटलां तं ती झगळे , पर सकाळचा झगळा संध्याकाळवरी विसरून जाय. संसारात कमी जास्त तं होतच रायते. संसार मनलाका भांड्यालं भांडा लागतेच. एवळ्यात तिना पाण्याची डबकी भरून तिच्यासंगा एक ईस्टिलचा गिलास देत सेवकलं मनावले लागली , " आज नयझरीचा बजार आये. बांद्यावरून लवकर येजाल. बजाराले जावून तेवळी किलोभर वारली मिरची घेवून येजा. " तसा सेवक तिच्या हातातली पाण्याची डबकी घेवून मान हालवत बांद्यायच्या रस्त्यालं लागला.
सेवकच्या बांद्या कानुबा तर्याच्या पोटात होत्या. बरसातभर तरा पाण्याना भरला राये. धान कापून झाल्यावर बांद्यायची ओल तर्याना लवकर जात नोहती. त्याच्याना सेवक आपल्या बांद्यायीत हरसाली चना पेरत होता. " चना मन्जे चोरायची धन " सर्वात जास्त कोणता कठाण चोरीलं जात असल तं तो मन्जे चना. हिरवा चणा दिसला का कोणालेबी दोन डाटरे खावूसाच लागते. मंग तो गावचा पाटेल कावून नोको राये. सेवक नेहमी मने , " या सितेपारात चोराले शेंबर संगी ." त्याच्याना सेवक हरसाली आपल्या बांद्यायच्या बिचात मोठ्या धुर्यावर मार्या बांधे. मार्याबी चांगला तिन माणूस उच्चा ! माणूस मार्यावर उबा रायला का , धुर्याच्या आळपा परसाकळ बसलेला माणूसबी दिसे. चौफेर नजर सहज पोहचे. कानुबा तर्याच्या पोटात सेवकच्या अर्धा एकराच्या साहा बांद्या होत्या हरसाली तो एका बांदित चना अना एका बांदित गहु पेरे. यासाली बांद्यायले ओल चांगला असल्याना त्याना गहु , चना दोन दोन बांद्यांयीत पेरलं होतन. चांगल्या ओलाना अना पायटच्या वदंना चना चांगला टोंगराभर वाहाळला होता. डाटरेबी चांगले फलांदले होते. गव्हानाबी चांगली वाळ धरलं होतन.
आता चना पिळत आला होता. गव्हाले थोळी टाईम होती. गव्हाच्या लोंब्या अजुन भरावले सुरूवात नोहती. पर चण्याचे घेंगरे दुरूनच मोत्यायसारखे चमकत होते.पंधरा पाऊण मयण्यात चना कापावले येणार होता. त्याच्याना सेवकच्या जिवाले घोर लागला होता. गावाच्या भोवताल कास्तकारायचा कठाण होता. चना , गहु , लाखोरी , जवस, धन्या असा प्रत्येकाचा कायीना कायी होताच. पर चण्याशिवाय दुसर्या कोणत्याच कठाणाच्या चोरीच्या बातन्या आयकावले भेटत नोहत्या. चना चोरीच्या बातन्या हररोजच आयकावले भेटे. कोणाचा कवटाभर तं कोणाचा गठ्ठाभर ! काल सेवकच्या घराजवरचा मंगलच सांगावले बसला , त्याचा चना चोरी गेला मनून. त्याच्याना मंगल जास्तच काळजीत पळला. आज तो चोरीची बातनी खरी होय का खोटी हे पावासाठी मंगलच्या बांद्यावर गेला. तं खराच त्याच्या बांदितला चांगला कवटाभर चना चोरीले गेला होता.
आता चना चोरी झाल्याच्या बातन्या आणकीनच वाळल्या. संद्याकाळी चौकात चोरीच्याच चर्चा रंगु लागल्या.त्याच्याना सेवक जास्तच काळजीत पळला. त्याचा पुरा चना पिळला होता. आयता हातात आलेला पीक चोरीले जावू नये मनून त्याना आता रात्तची जागली करावचा ठरवलन. पयले तो राती दहा अकरा वाजे बांद्याकरून एक चक्कर मारून झोपे. अना झुंझुरकाच दुसरा चक्कर !
आज दिवसाची जागली करून तिनकवाजता तो घरी आला. आल्याआल्या त्याना आपल्या मनातला विचार शांताले सांगतलन. तशी शांती त्याच्यावरच खेकसली , " एवळ्या ठंडीत रातची जागली करावची कोणती गरज पळली ? नेला तं नेवू द्या चना ! " शांताचा पारा चळल्याचा पाऊन तो घटकाभर शांतच बसला. शांतालं चुलीवर चाय ठेवालं सांगुण आपण गायीचा टुटला दावा सवारत बसला. शांताना चुलीत टुराट्या टाकुन ईस्तो पेटलन ना चाय ठेवलन. टुराट्यायच्या धगाळ्याना घळीभरातच चाय फसफस करत उकळु लागला. दुधाचा पांढरा रंग लाल कयी झाला त समजलाच नायी. शांताना दोन कपात चाय गारून दोगेबी चाय पित बले. आता शांताचा पारा खाली आल्याचा पाऊन चाय पितच सेवक तिले समजवू लागला , " शांता , आजवरी चन्यासाठी आपण दोगायना मेयनत केला. चन्यालं बोरीच्या काट्या लावण्यापासून भर तपणीत जागली केला. चन्यासाटी गावगवतरबी सोळला. आता पंधरा पाऊण मयण्याचीतं बात आये , चना कापून झाला का झाला ! लागलतं चना काटुन घरी आणून आंगणातच चुरूण." शांता कायीबी न बोलता आयकत होती. सेवकचा बोलणा तिलं पटत होता. रातच्या जागलीलं तिना सेवकलं होकार देलन.
पायता पायता दिवस भूसूकभूसूक जात होते. सेवकचा चन्यावर खळा पहारा चालु होता. रात झाली का , सेवक जेवण करून बांद्यावर जावाची तयारी करू लागे. एक कुराळ , किसान टार्च , थंडीत पांघरावले एक चादर अना हातात नेहणमीचा खन्नाट वेरूचा डंडा ! अशी तयारी करून तो पाटलाच्या कामथातून पायरस्त्याना बांद्यायकळ निघे. बांद्यावर आल्या आल्या चन्यातून एक चक्कर मारे. चंद्राच्या उजेळात चण्याचे चमकणारे ठोकर घेंगरे पाऊन त्याचा मन भरून ये. कास्तकाराले याच्याशिवाय दुसरा मोठा सुख नायी.
होळी जवळ आली होती. चंद्राचा उजेळ रोजच्यारोज वाळत होता. चंद्राच्या या उजेळाना कोसभर दुरचाबी चक दिसत होता. सेवक मार्यावर चळुन एक नजर पुर्या बांदधानभर फिरवे. टार्च , कुराळ , डंडा जागच्या जागी ठेवून तो झोपत होता. अशी त्याची रातची जागली चालु होती. एक एक दिवस निगुन गेल्यावर त्यालं थोळा हलका वाटे.
एक दिवस सेवक मार्यावर झोपला होता. तशी त्यालं चन्याच्या चिंतेना झोप लागत नोहती. पर रोजच्या उंद्याना त्यादिवशी त्यालं झोप लागली. चन्याच्या चोरीच्या बातन्या कानावर येतच होत्या. गावातले बदमास पोरं शिमग्याच्या नावाना रातभर खेळत अना लोकायचा चना चोरत होते. कोणाच्या बांद्यायवर चन्याचा हुड्डा भुजल्याची राख दिसे त कोणाच्या बांधानभर चना खाऊन फेकला दिसे. नास अना ईदवास ! चन्याची चोरी होत होती पर चोर कायी दिसत नोहते. सेवकलं उकुळ झोपच होती. एवळ्यात प्लास्टिकची बाटल पेचकल्याचा आवाज आला. या आवाजाना त्याची झोपच उळाली. त्याना आपल्या हाताजवळचा टार्च पटकन सुरू केलन.एका हातात टार्च ना दुसर्या हातात टंगोली धरून तो मार्यावर उभा होऊन पुर्या बांधानभर तो टार्च मारून पाहु लागला. एवळ्यात त्यालं आंब्यावाल्या गाट्यात धुर्याजवर पाच साहा जवान पोरं चना उपळताना दिसले. दुरून चेहरे ओळकत नोहते पर पोरं दिसत होते. तो चिल्लवतच मार्यावरून खाली कुदला. अना पोरायकळ धावू लागला. तो जोरांना चिल्लवत शिव्यादेत होता. सेवकच्या चिल्लवण्याना चोर सावद झाले पर चना उपळतच होते. पयल्या बांदितून तो दुसर्या बांदित गेला. धावता धावता त्याचा पाय अचानक खांडीतल्या मोवाच्या जळीलं लटकुन तो खाली पळला. तसाच हाताले झटका लागुन हातातला टार्च बाजुले जावून पळला. टंगोली मात्र त्याच्या हातातच रायली. त्याना स्वत:ले सावरत टार्च उचलुन तो सुरू करू लागला. पर वरून खालीत जोरात आपटल्याना टार्च कायी चालु होत नोहता. बटना दाबुन दाबुन सेवक थकला. अंधार्यातयी त्याची एक नजर चोरायवर होतीच. तो चोरायपासून अजुन एकबांदी दुर होता. त्यालं चोर आता दिसले पर चेयरे ओळखले नायी. सेवक बांदित पळल्याचा पावून चोरंबी हुशार झाले होते.
आता अंधार्यात या चोरायचा सामना कसा करावा ? त्यायलं येतून पळवाचा कसा ? सेवक पळला एकटा , त्याच्याना तेती शक्ती कामाची नोहती तं अकलेचा काम होता. सेवक थोळा गोंधळला. अना त्यालं अचानक सूचला , त्याना कालच चन्यातला मोहाच्या झाळातला पाला जमा करून धुर्याजवर मोठा डुंगा करून ठेवलं होतन. काल पर माचीस नसल्याना तो पाला पेटवाचा राहुन गेला. आज माचीस त्याच्या खिशातच होती. त्याना चटकन खिशात हात टाकलन. माचीस काळुन त्याना पाल्याचा डुंगा पेटवलन . मोहाच्या वारल्या पाल्याना एकखट्टे आग घेतलन. वारला पाला तळतळ पेटु लागला. मोठा धगाळा झाला. या धगाळ्याना बांधानभर उजेळ झाला. या अचानक झालेल्या उजेळाना चोरायना पुळचा धोका ओळकुण आपला ईरादा बदलावा लागला. हातातला चना बांदितच फेकुन थोबाळ लपवत , बांद्या कुदत परून गेले. धगाळ्याना चोर परून गेले पर चोरायची ओळख नायी लागली. सेवकच्या जागलीना चना चोरी होता होता वाचला. सेवक धगाळ्याच्या उजेळात चना न्याहारत मार्यावर चंगला अना सकार होवाची वाट पावू लागला.
श्री. गुलाब बिसेन
मु. सितेपार ,ता. तिरोडा , जि. गोंंदिया
Mob. 9404235191

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा