बांडगुळ

© निसर्ग शिकवण... भाग-५ ©


०©०  बांडगुळ प्रवृत्ती  ०©०

बांडगुळ हि एक परजिवी वनस्पती.....  दुसर्‍या वनस्पतींच्या जिवावर जगणारी म्हणून प्रसिद्ध आहे. हि वनस्पती अन्न पाण्यासाठी दुसर्‍या वनस्पतींवर अवलंबून असते. मोठ्या झाडांच्या खोडावर वाढुन आपल्या मुळ्यांद्वारे खोडातून अन्नाचे सोशन करते. स्वत: कोणतेही प्रयत्न न करता आयत्या अन्नावर ताव मारणार्‍या या झाडाच्या गुणांमुळे अशा प्रवृत्तीच्या माणसांना बांडगुळ म्हणून ओळखले जाते.

अशाच स्वभावाच्या माणसांना म्हणजे दुसर्‍याच्या जिवावर जगणार्‍यांना समाजात बांडगुळाची उपमा दिली जाते.
झाडावरील बांडगुळ वेळीच काढला नाही तर तो झाडाला वांझ करतो. बांडगुळ असलेल्या झाडाला फळं लागत नाहीत. कारण बांडगुळ झाडाची हि फळ धारण करण्याची शक्तीच नाहीशी करतो.

बांडगुळ म्हणजे पालक झाडाला लागलेली किडच असते. तो पालक झाडाचे अन्न पाणी स्वत: सोशून घेवून स्वत: फोफावतो , वाढतो आणि समृद्ध होतो. मात्र पालक झाडाला दिवसेंदिवस कमजोर करत जातो. त्याची फळे देण्याची शक्ती क्षीण करतो.

बांडगुळ  हे पालक झाडातील अन्न पाणी शोशून घेतो आणि त्याला कमकुवत करतो. माणसांमध्येही अशा प्रवृत्तीची माणसे असतात. अशा प्रवृत्तीची माणसे विश्वासघातकी  असतात. ज्याच्या जिवावर जगतात त्याचा गळा आवळायला अशी मंडळी क्षणाचाही वेळ लावत नाहीत.

" खाल्लेल्या मिठाला जागणे "  किंवा " ज्याची खावी पोळी , त्याची वाजवावी टाळी " असे मराठीत वाक्प्रचार पुर्वी पासून प्रचलित आहेत. कदाचित अशा माणसांकडे बघुनच हे वाक्प्रचार सुचले असावेत. बांडगुळाच्या प्रवृत्तीची माणसे खाल्लेल्या मिठाला जागायचे तर दुरच , ते ज्या ताटात खातात त्यातच छिद्र पाडतात. त्यामुळे समाजात वावरताना अशा बांळगुळाच्या प्रवृत्तीच्या स्वार्थी माणसांपासून लांब राहिलेलेच हिताचे ठरते.

गुलाब बिसेन (९४०४२३५१९१)

ब्लाॅग - Gulabbisen.blogspot.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

कवलकी बंडी (नहानपनको खेल)

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा