कचरामूक्त वर्ग

॰॰॰  कचरामूक्त वर्ग  ॰॰॰

      विद्यार्थ्यांच्या ज्ञानउपासना ही वर्गात व शालेय परीसरात होत असते. याठिकाणी स्वच्छता ठेवून वर्ग व परीसर आरोग्यदायी बनवता येतो. ब-याचदा स्वच्छतेची  जबाबदारी विद्यार्थ्यांवर येवून पडते. माझ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीतही तेच घडले. वयोगट लहान असल्याने  वर्ग स्वच्छतेचा ताण मुलांवर येवू लागला. यातुन  काही मुले स्वच्छतेचा नंबर असलेल्या दिवशी उशिरा यायची . ही बाब माझ्या लक्ष्यात आल्यावर मी यावर उपाय शोधन्याचा प्रयत्न केला. शेवटि एक मार्ग सापडला. माझ्या वर्गात दहा बारा कागदि बकेट होत्या. त्या मी दोन मुलां एक याप्रमाने वाटुन दिल्या. त्याचा वापर कचरापेटी म्हणून करण्यास सांगितले. वर्गात जास्त कचरा हा मुलांच्याद्वारे कागदाचे तुकडे,पेन्सिलचे तुकडे इ.चा होतो. हा कचरा मुले प्रत्येकाला दिलेल्या कचरा पेटीत टाकु लागले. हा कचरा दररोज सकाळी गोळा केला जातो. त्यामुळे वर्ग न झाडता वर्ग स्वच्छ राहु लागला. लहान मुलांचे  दररोज वर्ग झाडण्याचे कष्ट वाचले. आता आठवड्यातून  दोन किंवा तीनदाच वर्ग लोटावा लागतो. त्यामुळे हे काम मुले आनंदाने करतात..............गुलाब बिसेन

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

कवलकी बंडी (नहानपनको खेल)

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा