प्रामाणिकपणाचं बक्षिस
प्रामाणिकपणाचं बक्षिस सिहोरा हे तुमसर तालुक्यातील बाजारपेठेचे गाव. मुख्यरस्त्यावर गाव असल्याने तिथे बर्याचदा माझे येणे जाणे होते. या गावात दिवाळीनंतर दहा बारा दिवसाने "जलसा" भरतो. हा जलसा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. कलारसिक हा जलसा बघायला प्रचंड गर्दि करतात. पाच ते दहा दंडार मंडळांचा सहभाग यात दरवर्षी असतो. काही वर्षांपूर्वी मी हा जलसा बघायला गेलो होतो. जलशात पाय ठेवायला जागा शिल्लक नव्हती. अवती भवतीच्या मंडळींना धक्का न लागता पुढे - मागे जाणे केवळ अशक्य होतं. अशा तोबा गर्दित मी दंडार बघायला शिरलो. दंडार मंडळे आपली कला सादर करत होते. कलारसिक कलेला दाद देत होते. कलेचा हा मेळा डोळ्याचे पारणे फेडणारा असाच होता. एकिकडे दंडार कलावंतांचा कलाविष्कार सुरू असताना दुसरीकडे छोटे व्यावसायिक मंडळी जिलेबी , शिंगाडे , फुगे , भजी , खेळणी इ. ची दुकाने लावून आपल्या प्रपंचाची तजविज करण्यात व्यस्त होते. जलसा बघणारी मंडळी दंडार बघुन झाल्यावर या छोट्या छोट्या दुकानांमध्ये वस्तूंची खरेदि करत होते. कुणी खाद्य पदार्थांवर ताव मारत होते. तर कुणी लहान मुलांसाठी फुगे , खेळणी घेत होते. दंडारीचा आस्वा...