एकाग्रतेचा प्रतिक बगळा
© निसर्ग शिकवण... भाग - ४ ©
०©० एकाग्रतेचा प्रतिक बगळा ०©०
बगळा ... पांढर्या रंगाची उपमा द्यावी ती बगळ्यालाच. अन्नाच्या शोधात सकाळी बाहेर पडणारा व सायंकाळी घरट्याकडे परतणारा बगळ्यांचा शिस्तबद्ध थवा बघितला कि सैनिकाची एखादि तुकडीच संचलन करतअसल्याचा भास होतो. आकाशात विहार करणारे बगळ्यांचे मनोहारी दृष्य डोळ्यांना शितलता देतात. एखाद्या शांतीदुताप्रमाणे बगळ्याचा थवा पांढरा रंग लेवून जगाला जणू शांततेचा संदेश देत फिरत असतो.
जगाला शांती संदेश देणारा बगळा शेतकर्याचा सच्चा मित्र आहे. बगळा शेतातील पिकांवरील किडे खातो. किडे खावून शेतकर्याच्या पिकांचे रक्षण करतो. बगळा किड्यांना पिकांचे नुकसान करण्यापासून वाचवतो. शेतकर्याच्या सच्च्या मित्राप्रमाणे शेतात डोलणार्या पिकांची जणू राखणच करतो. बळीराजाला धनधाण्याने समृद्ध करण्यात खारीचा वाटा उचलतो.
अन्नासाठी माशांची शिकार करणारा बगळा शिकारीची वाट बघत पाण्यामध्ये एकाग्र होवून शरिराची कोणतीही हालचाल न करता बराच वेळ शांत उभा असतो. शिकार आपल्या टप्प्यात येईपर्यंत तो आपली एकाग्रता टिकवून ठेवतो. शरिरावर आणि मनावर ताबा ठेवतो. शिकार आपल्या टप्प्यात येताच आपल्या चोचीने अलगद टिपतो. पोहण्याशी कोणताही संबंध नसताना किंवा पाणी हे अधिवास नसतानाही पाण्यातील शिकार करण्यात बगळ्याचा हातखंडा आहे. माशासारख्या पोहण्यात तरबेज शिकारीला पकडण्यासाठी बगळा जि एकाग्रता दाखवतो , ती वाखाणण्याजोगी आहे.
क्षणाचीही चुक बगळ्याला शिकारीपासून कोसो दूर नेवून ठेवते. बर्याचवेळा टप्य्यात पकडित आलेली शिकार अचानक चोचीतून निसटुन जाते. माणसाचेही असेच होते. हातात आलेले यश मुठितल्या वाळुप्रमाणे अचानक निसटुन जाते. परंतु बगळा मात्र अशा अपयशांनी खचुन जात नाही. अपयशांना भिक घालण्याचे त्याला माहितच नसते. अलट अधिक जोमाने आणि अधिक एकाग्रतेने परत नव्याने सुरूवात करतो आणि शिकारीचा फडशा पाडतो. काळ कितीही बिकट असला तरी आपली एकाग्रता ढळु न देता स्थिर राहुण यश मिळवता येतो , हेच बगळा सिद्ध करून दाखवतो.
" कठिण प्रसंगी अापली एकाग्रता ढळु न देता , विचलीत न होता आपल्या ध्येय्यावर लक्ष केंद्रित करून योग्य संधीची वाट बघणे आणि ती संधी येताच क्षणाचाही विलंब न करता संधीच सोनं करणे " हे जिवनाचे रहस्य बगळा आपल्याला शिकवतो.
- गुलाब बिसेन (९४०४२३५१९१)
ब्लाॅग - gulabbisen.blogspot.com

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा