पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सु विचारांचा सुगंध

००० सु ' विचारांचा सुगंध ०००         शाळेला असताना गुरुजींनी व आईवडीलांनी दिलेले चांगले विचार आणि त्यांनी केलेले सुसंस्कार यातून सुविचारांची माझ्या मनात मांदियाळी भरायची. सुविचारांच्या सुगंधाने मला असे काही मोहीत केले कि , मला सुविचारांचा संग्रह करण्याचा छंदच लागला. मग वाचनात येणारे सुविचार मी संकलीत करु लागलो. कधी वाचलेल्या पुस्तकातील तर कधी शाळेच्या भिंतीवरील , कधी गुरूजींच्या वाणीतून आलेले तर कधी वर्तमानपत्रातील मजल दरमजल करत शालेय जीवनात मी १००० सुविचारांचा संग्रह केला.       आज जागतिक मराठी भाषादिनानिमित्त अडगळीत पडलेल्या परंतु सांभाळुन ठेवलेल्या सुविचारांच्या दोन्ही वह्या काढल्या आणि शाळेत घेवून आलो. शाळेत असताना हे सुविचार भविष्यात कुणाच्या उपयोगी पडेल असे मनातही आले नव्हते.         मराठी भाषेचा गोडवा तिच्या अनेक रुपांतून अखंड वाहत आहे. आज मराठी भाषा दिनानिमित्त मी शालेय जीवनात संकलीत केलेला सुविचारांचा वसा माझ्या विद्यार्थ्यांच्या हातात सोपवताना खुप आनंद होतोय. सुविचारांचा हा सुगंध भावी पिढिद्वारे वर्षानुवर्षे असाच दर...

उमलती कळी

००० उमलती कळी ०००     """"""""""""""""""""       परिपाठ नुकताच झाला होता. वर्गात जावुन हजेरी उघडली , एवढ्यात  इ. ३ रीची श्रावणी कसलीतरी फुले घेवून माझ्याजवळ येवुन उभी राहीली. मागोमाग तिच्या मैत्रीणीही आल्या. आणलेली फुले मला देत श्रावणी म्हणाली , "सर , ही फुले आमच्या घराजवळ खुप फुललेली आहेत. मी म्हणालो " हि कसली फुले आहेत ". ती " माहीत नाही सर ". मी फुले हातात घेतली. फिक्कट जांभळ्या रंगांची ही रानफुले होती. श्रावणी व तिच्या मैत्रीनी मला त्या फुलांविषयी विस्ताराने सांगु लागल्या.  " या फुलांची रोपे यावर्षी चांगल्या पावसामुळे मोठ्याप्रमाणात उगवली आहेत. या फुलांच्या कळ्या रात्री पाण्यात ठेवल्यास दुस-या दिवशी कळ्या उमललेल्या असतात. फुलांना अनोळखी असा सुगंध आहे. हिफुले खुप बारीक व नाजुक आहेत. मुलींची निरिक्षण शक्ती बघुन मी स्तंभीत झालो. थोडावेळ विचारकेल्यावर माझ्या लक्षात आले कि , मागील वर्षी या मुलींना मी  " जाऊ फुलांच्या जगात " या कवीतेच्या अध्यापनाव...

खडु

॰॰॰॰॰ खडु ॰॰॰॰॰   घड्याळात चारचे ठोके होताच सर्व मुले शारीरिक शिक्षणाच्या तासासाठी मैदानात जमली. मी व माझे सहकारी प्रात्यक्षिक घेवू लागलो. एवढ्यात एक सत्तरीतील आजी पाय-या चढुन शाळेत येताना दिसली. ती तडक माझ्याजवळ आली. त्यांच्याशी संवाद साधत मी म्हणालो , " आजी , काय चाललय ? " आजी : काय नाही सर. तुमच्याकडचं काम होतं . मी : काय काम होतं आजी ?"  आजी : " दोन खडु पायजेत ." मी : खडु ! कशासाठी ? आजी : म्हैस चिपाडतीया. तिला खडुचा तुकडा लागवडीतनं दिल्यावर थांबतया." मी: डाॅक्टरांना नाही दाखवलं म्हशीला ? "  आजी : डाक्टराच्या अवसदापेक्षा नामी अवसद हाय खडु ."    शाळेतून गावातील अनेक  जवळजवळ सर्वच मानसे जनावरांसाठी खडु नेतात. कुणी म्हशीसाठी , कुणी गायीसाठी तर कुणी शेळ्या मेंढ्यांसाठी. या जनावरांना लघवीतून पांढरा द्रव  जाण्यावरचा खडु हा घरगुती परंतु रामबाण उपाय. शिवाय शाळेतुन खडु मिळतोय तो निशुल्क मोफत. या खडुमुळे का असेना पण ज्यांची मुले शाळेत नसल्याने शाळेकडे न फिरकणारी मंडळीही शाळेच्या पाय-या चढतो. साहजिकच त्याची नाळी शाळेशी जोडली गेली आहे ती फक्त या खडुम...

स्वनिर्मितीचा आनंद

०००  चिमुकल्यांचा नृत्याविष्कार आणि स्वनिर्मितीचा ---------------------------------------------------------------------आनंद ००० ------------------                                       " सर , हे गाणं मी बसवलय. चांगलं बसलय ना ?" शाळेचे स्नेहसंमेलन सुरु असताना अमृतने मला विचारले. " खुप छान बसलाय डांस ! " मी म्हणालो. " सर , यावेळी बसवण्याचा प्रयत्न केलाय. माझा पहीलाच प्रयत्न आहे." मी , " गाणं छानच बसलय ! एखादि स्टेप जर चुकली असेल तर काही फरक पडत नाही . या चुकांतूनच आपण शिकत जाणार आहोत." शाळेचा माजी विद्यार्थी अमृत गवड व माझी नृत्यांवर चर्चा सुरु होती.                मागील पंधरा दिवसांपासून शाळेतील माझे सहकारी , पालक व शाळेचे माजी विद्यार्थ्यांची स्नेहसंमेलनासाठी धावपळ सुरु होती. सर्व मंडळी झपाटल्यासारखी कामाला लागली होती. शाळेत शिक्षक तर घरी पालक व आजी माजी विद्यार्थी नृत्य बसवत होती. शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी ब-याच ठिकाणी व्यावसायी...

जागली

००० जागली ०००     " शांती , मी बांद्यावर जावून रायलो ." सेवकराम टाटावर बसून हात धुवतच चिल्लवला. तशी वाळीत लसणायचे वापे कोळपत बसलेली शांती धावतच आली. सेवकसंगा लगण झाल्यापासून पंचीस वर्ष झाले , ती सेवकच्या खांद्यालं खांदा लावून संसाराचा गाळा चालवत होती. कयी कयी ती नव-यासंगा नायी पटला त झगळे पर सकाळचा झगळा संद्याकाळवरी इसरुन जाय. आयुष्यात कमी जास्त त होतच रायते ! एवळ्यात तिना पाण्याचा डबा भरून त्याच्यासंगा एक पाण्याचा गिलास देतच मनावले लागली, " आज नयझरीच्या बजारले जावून तेवळी किलोभर मिरची  मशणीतना पिसून आणा." तसा सेवक तिच्या हातातला पाण्याचा डबा धरुन मान हालवत बांद्यायच्या रस्त्यालं लागला.............,............................... " जागली "  या माझ्या  " झाडी "  बोलीतील  कथेतुन........... गुलाब बिसेन

फरहानचा गाडा

००० फरहानचा गाडा ०००   सकाळचे कोवळे उन्ह पडताच घराशेजारची बालगोपाल आपापली खेळणी घेवून उन्हात खेळु लागली. कुणी सायकल फिरवू लागला . कुणी बॅटबाॅल  , कुणी  तीन चाकी सायकल तर कुणी बिनसाहीत्याची खेळु लागली.      एवढ्यात शेजारी राहणारा फरहान  कसलेसे खेळणे घेवूण आला. पाच सहा वर्षांचा फरहान स्वभावाने मृदूभाषी ,कायम हसतमुख . फरहानच्या जवळील जरा वेगळे खेळणे बघुन सर्व मुलांनी आपली खेळणी आणि खेळ सोडुन त्याच्याभोवती एकच गलका केला. कायम दुस-या मुलांच्या मागेपुढे करत खेळणा-या फरहानला या गलक्याने खुपच आनंद झाला. खेळणे बघण्याच्या उत्सुकतेपोटी त्याच्याभोवती गलका केलेल्या त्याच्या मित्रांना त्याने तेवढ्याच उत्सफूर्तपणे आपले खेळणे दाखवत प्रतिसाद दिला.    फरहानचे खेळणे कोणत्याही दुकानातून विकत घेतले नव्हते तर लोखंडी सळ्यना वेल्ड करुन ते बनवले होते. परंतु या साध्या खेळण्याने महागडी खेळणी खेळणा-या मुलांना भुरळ घातली.    ते खेळणे होते..... साध्या लोखंडी सळ्यांना वेल्डकरून बनवलेला "गाडा". दोन चाके , एक दांडा आणि एक स्टेअरिंग असलेले हे खेळणे !   ...

रीटेक

०००  रीटेक  ०००        विज्ञानयुगात दररोज नवनविन शोध लागतायत. तंत्रज्ञानात दररोज नवनवीन भर पडतेय . गरज हि शोधाची जननी  या उक्तीप्रमाने दैनंदिन जीवन अधिक सुकर व्हावे हा त्यामागचा हेतू आहे. असे असले तरी या तंत्रज्ञानाचा उपयोग कोण , कसा  आणि किती प्रमाणात करतोय यावर त्या तंत्रज्ञानाचे यश अवलंबून असते.         मोबाईल क्षेत्रात स्मार्टफोन आला आणि मानवी जीवनच बदलून गेलं. मोबाईलच्या कॅमे-यातून जीवनातील प्रत्येक क्षण टिपून ठेवण्याचा जो तो प्रयत्न करताना दिसतोय. त्यात सेल्फिनेतर सगळ्यांनाच वेड लावलय. सामांण्यांपासून ते उच्चवर्णीयांपर्यंत सर्वांना सेल्फीचा मोह आवरता आवरत नाही. परंतु सेल्फिच्या अतिरेकाने अनेकांचा जीव घेतलाय. असा कटु प्रसंग कुणाच्याही वाट्याला न येवो.         प्रसंग क्र. १      वळणावळणाच्या , मंद उताराच्या रस्त्याने मी चाललो होतो. अचानक एका वळणावर माझ्या समोरच्या बाजूने एक दुचाकी येताना दिसली. दुचाकीवर तीन तरूण बसले होते. दुचाकी वळणावरुन घसारुला लागताच , दुचाकी चालकाने अचानक दोन्ही...

पैसा नको , प्रेम द्या

००० पैसा नको , प्रेम द्या ०००   काही दिवसांपूर्वी वृत्तवाहीनीवरील एका बातमीने मन सुन्न करुन टाकले. या बातमीत मन सुन्न करुन टाकण्यासारखे एवढे काय होते ?     बातमी होती एका पाळणाघराची ! तिथे काम करणारी एक बायी एका सात आठ महिन्याच्या बाळावर अमानुष अत्याचार करत होती. हे दृश्य बघुण माणसातील माणूसकी शोधन्याची वेळ आपल्यावर आली असल्याचेच  जाणवले.   या पाळणाघरातील मुलांच्या वयाचा विचार केला तर यात खरा दोष कुणाचा ? असा प्रश्न पडतो. एकीकडे पैशाचा हव्यास तर दुसरीकडे माणसातील आटत चाललेलं प्रेम . या दोन्हींच्या मध्ये ही निष्पाप बालके भरडताहेत. आधुनिकतेचा मुखवटा परीधान करुन सुशिक्षित झालेली पीढी यात स्री - पुरुष , पती - पत्नी दोघेही पैसा कमावण्याच्या शर्यतीत पळताहेत. या शर्यतीच्या नादात आपल्या पोटच्या गोळ्याला आई बाबांचे प्रेम मिळायचे राहुनच जातेय.   आज कितीतरी कुटुंब अशा चक्रात सापडुन आपल्या चिमुकल्यांना छळताहेत. घरात दोघेही कमावती असतील तर किमान स्रीनेतरी आपले बाळ तीन चार वर्षाचे होईपर्यंत त्याचे आईच्या मायेने पालनपोषण करावे. किमान तीन चार वर्षांच्या प्रेमाने त्या...

सहप्रवासाचा नवसंकल्प

०० सहप्रवासाचा नवसंकल्प ०००    प्रवास या शब्दाशी भूतलावरील सर्व सजीवांची अशी काही गट्टी जमली आहे की, ती सोडुनही सुटु शकत नाही . उलट ती अधिकच घट्ट होत आहे. जिवनात प्रत्येकालाच प्रवास करावा लागतो. सर्व जीवजंतु पासून मानवापर्यंत सर्वच प्रवास करतात. जगण्याच्या लढाईत प्रवास अटळच झालाय. या प्रवासाला नानाविध कला आहेत. नानाविध कारणे आहेत.    जिवनातील या अटळ प्रवासाला सहप्रवासात रुपांतरीत केल्यास जीवन आनंददायी बनण्यास मदत होईल. एकमेकांच्या हातात हात घालुन सहप्रवासाला निघाल्यास जीवन प्रवास अधिक सुकर होईल. या प्रवासात भेटणा-या प्रत्येक वाटसरुला आनंद वाटत गेल्यास आपल्या जीवनातही आनंदाचा गंध नक्की पसरेल. हा जीवन प्रवास  " अनाथांना साथ — गरजुंना मदतीचा हात "  देत सहप्रवासात बदलुया.    सहप्रवासाने जीवनमार्गावरील प्रवास सुखकर करण्याचा नववर्षारंभी सहप्रवासाचा नवसंकल्प करुया.   ॰॰॰ सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ॰॰॰.......................गुलाब बिसेन

हॅप्पी बाप्पा

००० हॅप्पी बाप्पा ०००  """""""""""""        शाळेत पाऊल ठेवतो न ठेवतो इ. ३ री चा प्रज्वल त्याच्या मित्रांसोबत त्याने मातीपासून बनवलेली बाप्पांची मूर्ती घेवून आला. मूर्ती सुबक व सुंदर होती. मी त्याच्या कलेचे कौतुक केले आणि वर्गात गेलो. सगळीकडे गणोशोत्सवाचा आनंद ओसंडत असताना बालगोपाल मागे कसे राहणार. त्यांनीही आपल्यापरीने तयारी सुरू केली होती.      वर्गात गेल्यावर वेगळ्याच विषयाने माझ्या मनात कल्लोळ माजवला. मागील काही वर्षांपासून गणेशोत्सवात मातीच्या मूर्तींऐवजी प्लॅस्टर आॅफ पॅरीसपासून बनवलेल्या मूर्त्यांना मागणी अधीक वाझलीय. यामागे अनेक कारणे आहेत. कारण कोणतेही असले तरी  शेवटी हानी पर्यावरणाची होतेय. यावर बालगोपालांचे प्रबोधन करावे असा मनात विर आला.        परीपाठ झाल्यावर मी मुलांना दोन बादल्यांत पाणी आणायला सांगितले. एका विद्यार्थ्याने POP पासून बनवलेली मूर्ती आणली . ती  एका बादलीत ठेवली. दुस-या बादलीत प्रज्वलने आणलेली मातीची मूर्ती ठेवली. तासाभरानंतर सर्व मुलांना घेवुन दोन्ही बादल्यांचे निरीक्षण केले. निरीक्षणावर...

मशागत

 ००० मशागत ०००       शेतात भरघोष पीक येण्यासाठी शेतीची मशागत करावी लागते. तशीच शाळेची भरभराट व्हावी. प्रगतीची शिखरे गाठावी यासाठी शाळेची मशागत करावी लागते. दोन्हीचे स्वरूप मात्र भिन्न आहे. चार पाच वर्षांपूर्वी बादेवाडी शाळेत नविन इमारतीचे बांधकाम सुरु होते. बांधकामासाठी जेसीबीने खड्डे काढण्यात आले. यावेळी जागेच्या अडचणीमुळे शाळेत जेसीबी आणताना मोठी कसरत करावी लागली. खड्यांतील माती जागेअभावी शाळेच्या मैदानातच टाकण्यात आली. त्यामुळे मैदानात दोन ते चार फुटाचे मातीचे ढिग तयार झाले. सोबतीला दगडे होतीच.      शाळेच्या बंदिस्त आवारामुळे मुलांचे खेळणे बागळणे बंद झाले. काय करणार ? माती टाकायला दुसरा पर्यायच उपलब्ध नव्हता. लहान मुले मातीच्या ढिगा-यांवरुन चढता उतरताना घसरुन  पडु लागली. मुलांना खरचटण्याचे प्रमाण वाढले. समस्येत भरीस भर म्हणून की काय , मातीमुळे मुता-यांची दारेही बंद झाली. ह्या समस्या सोडवण्यासाठी मुले व आम्ही दररोज माती काढत होतो. परंतु मातीपुढे आमचे प्रयत्न तोकडे ठरत होते. मुलांना खरचटणे नित्याचेच होवून बसले. यावर उपाय म्हणून परत जेसीबी आना...

मड्डा

०००  मड्डा  ०००     रामदास आज झुंजुरकालेच उठला. खाटंखालच्या गळव्यातला गिलासभर पाणी पिऊन लगवील कोठ्यात गेला. कोठ्यात गायी ,बयील उठावच्या तयारीतच होते. त्याना दुधपित्या वासरायले बाजुल बांधुण गायीयच्या मांगचा शेण काळुन तो टोतलीत भरु लागला.      रामदास आपल्याच तंद्रित होता. तो रातभर झोपला नोहता. दिवसभर धु-यायचा गवत कापून त्याचा आंगना आंग दुकत होता पर झोप त्याच्या जवळ कायी आलीच नायी. त्यालं एकच चिंता सारकी सतावत होती.      त्याचा च्यार एकराचा धान निसवला होता. धान भरावले पाणी पायजे होता. पर उना-यासारक्या कळक तपनीना बांद्या कड्ड्या पळत होत्या.     थोळा ओल होता तो च्यार आट दिवस कसातरी ढकलल. पाण्याची कोणतीच आशा दिसत नोहती. येत्या च्यार पाच दिवसात धानाले पाणी नायी भेटला तं यासालीबी मड्डाच कापावा लागल असा त्याले वाटत होता.      गेल्यासालीच त्याना मोठ्या पोरीच्या लग्नाले " नवतरीत धान देयीन " असा सांगुन तिरोड्याच्या कटरे दलालाकळुन तीस हजार रुपये आंगावर घेतलं होतन.................  " मड्डा "  या माझ्या कथेतून....

अक्षर देणगी

 ००० अक्षर देणगी ०००   आज विद्यार्थ्यांचा अभ्यास तपासत असताना मी थोडा खिन्न होतो. काही मुलांनी काल रविवार असूनही गृहकार्याची पाटि कोरीच ठेवली होती. अशा मुलांना अपूर्ण गृहकार्य पूर्ण करायला बसवून मी उर्वरीत मुलांचा अभ्यास तपासू लागलो.एवढ्यात इ. ४ थीच्या हर्षदने अभ्यासाची वही माझ्यापुढे सरकवली.ही वही बघताच माझ्या मनातिल खिन्नता कुठल्याकुठे पळून गेली.वाळवंटात अचानक एखादा पाण्याचा  स्रोत सापडावा तसे मला झाले.     इ. ४थीत शिकणा-या  हर्षदच्या वहीतील हस्ताक्षर बघुन मन आनंदि झाले. वहीतील हस्ताक्षर अगदि दृष्ट लागावी असेच.अक्षर देणगी लाभलेला हर्षद लेखन करताना कमीत कमी चुका करतो. अगदि नाहीच्या बरोबर. टपोरे असलेले अक्षर , शब्दांतील योग्य अंतराने अधिकच आकर्षक होतात.मराठी सोबतच इंग्रजीतही तो सुंदर लेखन करतो..................गुलाब बिसेन

आकृतिबंध

००० आकृतिबंध ०००  विद्यार्थ्यांचा घरचा अभ्यास तपासत असताना मुलांची कुजबुज सुरू असल्याचे मला दिसले.   " काय चाललय मुलांनो ?"  " सर , आम्ही आकृतिबंध तयार केलाय." मी मुलांकडे बघत म्हणालो , " कुठे आहे आकृतिबंध ?"  " सर , आमच्या ओळी बघा." मुले एका सुरात म्हणाली. मी अभ्यास तपासायला ओळीत उभ्या असलेल्या मुलांकडे बघितले , तर मुले ओळीत एक मुलगी त्या पाठीमागे मुलगा या क्रमाने उभी होती.    मुलांनी गणितातील आकृतिबंध प्रत्यक्षात आणला हे बघुन मला खुप आनंद झाला. आकृतिबंध या घटकाच्या अध्ययनावेळी विद्यार्थ्यांनी परीसरातील व घरातील आकृतिबंध शोधुन काढले होते. शालेय अभ्यासाची परीसरातील ज्ञानाशी सांगड घातल्याने विद्यार्थ्यांना आकृतिबंध शोधण्याचा छंदच लागला. पुस्तकी ज्ञानाची व विद्यार्थ्याच्या परीसराची सांगड घातल्याशीवाय घेतलेले ज्ञान वा दिलेले ज्ञान व्यर्थ ठरेल...............गुलाब बिसेनgulabbisen.bloggspot.com

माझा पुस्तक प्रपंच

 ००० माझा पुस्तक प्रपंच ॰॰॰    पुस्तकाशिवाय दुसरा चांगला मित्र जगात कुठेही सापडणार नाही. पुस्तके आपल्याला परिस्थितीची जाणीव करुन देतात. दुस-यांचे दु:ख बघायला शिकवतात आणि कठीन परिस्थित जगण्याचे बळ देतात.       माझी आणि पुस्तकांची गाठ पडली ती शाळेत गेल्यावरच ! पहिलीत गेल्यापासुन वाचणाची गट्टी जमायला सुरुवात झाली आणि बघता बघता पुस्तकांतील कवीता आणि धड्यांचा आशय तोंडपाठ होवु लागला. माझ्या घरात माझ्या बाबुजींना वाचणाची खुप आवड होती. परंतु त्यावेळी अवांतर वाचणाची पुस्तकेतर सोडाच साधा वर्तमानपत्रही वाचायला मिळत नव्हता. शहरातील पाहुण्यांकडुन आणलेल्या वर्तमानपत्राच्या रद्दिवर बाबुजी आपली बाचनाची तहान भागवत. सहामहीने वर्षभर जुने पेपर वाचुन काढायचे. पेपर वाचुन झाले की आमची पुस्तके वाचुन काढायचे. त्यामुळे त्याचा अप्रत्यक्ष परीणाम माझ्यावर होवुन मलाही वाचणाची गोडी लागली.         काॅलेजला गेल्यावर थोड्याप्रमाणात का असेना अवांतर वाचणाची पुस्तके दृष्टीस पडु लागली. पण वाचायला मिळत नव्हती. आणि खरेदीही करता येत नव्हती. शेवटी तुपाची तहान ताकावरच भागवाव...

संवेदनशीलता हरवत चाललीय का ?

 ००० संवेदनशीलता हरवत चाललीय का ? ००   आज शाळेला जात असताना मी जेऊर फाट्यावरून मुख्य रस्ता सोडुन वळणावळणाच्या व तीव्र चढ असलेल्या रस्त्याला लागलो. रस्ता वळणावळणाचा व तिव्र चढाचा असल्याने गाडीचा वेग खुपच कमी होता. माझ्यासोबत माझ्या गाडीवर माझे सहकारी होते. तीव्र चढ चढुन गाडी जरा सपाट रस्त्याला लागल्यावर मला समोर रस्त्यावर काटक्या पडलेल्या दिसल्या . शेतक-यांनी भाताची मळणी करून पिंजराची होळी रस्त्याकडेला करून  पिंजर जनावरांनी खावू नये यासाठी बाभळीच्या काटक्या लावल्या होत्या. त्यातील एक मोठी काटकी वा-याने उडुन रस्त्यावर पडली होती. या काटकीने एका वेळी एकच दुचाकी जाईल एवढाच रस्ता मोकळा सोडला होता. येणारे जाणारे सर्व प्रकार बघून निघून जात होते. परंतु कुणीही काटकी बाजुला करण्याची तसदि घेतली नाही. परिस्थिती बघुन माझे सहकारी गाडीवरून ऊतरले आणि काटकी बाजुला करून आम्ही मार्गस्थ झालो.आजच्या प्रसंगाने माणूस फक्त स्व:तचाच विचार करून बघुनही न बघितल्याचे सोंग घेतो हे अधोरेखीत झाले...........गुलाब बिसेन

पानगळ

०००पानगळ ०००     सकाळी थंडीची मंद झुळुक आणि सूर्य डोक्यावर येताच सुरु होणारी पानगळ ! पानांचं ओझं झाल्यासारखी झाडे अंगावरील पानांना झटकुन देतात. ही पानगळ झाडांना नविन जिवन , नविन आनंद देते. जुन्या पानांना सोडण्याचे दु:ख पदरात घेवून नव्या पानांचे स्वागत करायला ही मंडळी सरसावते. आजच्या दु:खात उद्याचे सुख दडलेले असते. जुण्याला सोडल्याशिवाय नव्याचे सुख कसे मिळेल ?     झाडांचे रंगरूप बदलणारी पानगळ ! सगळीकडे उत्साही , आनंदी वातावरण ! झाडाझाडावर, पानापानावर नविन बहार . पानाफुलांची रंग उधळायसाठी लागलेली स्पर्धा , पाखरांची फुलांचा मकरंद चाखायसाठी चाललेली  धावपळ मनाला हर्षून टाकते.      पानगळ नविन जिवण देते झाडांना........आनंद देते सृष्टिला.......विचार देते कवीला......सुगंध देते भुंग्याला......रंग देते फुलांना........निवारा देते पाखरांना.......शितलता देते वाटसरुला.          निस्पर्ण झालेल्या वृक्षाचे ओंगळवाने रुप फुलल्या नंतर सर्वांनाच हवेहवेसे वाटते . फुललेला पळस ....आंबा....शिवर....मोह....गुलमोहर स्वागताला पायघड्या घालुन सज्ज...

बाळा , आमचं गाव सोडुन जावू नको रं

००० बाळा , आमचं गाव सोडुन जावु नको रं ! ०००     शाळेत प्रवेश करतो न करतो ते माझ्या वर्गातील मुले मला शाळेच्या प्रवेशद्वारावरच कचरा झाडुन काढताना दिसली. मी दिसताच त्यांनी माझ्याभोवती गलका करत म्हणाले , " सर , आमची पाळी नसताना आम्ही लोटुन काढलय." मी त्यांच्या कामगीरीबद्दल त्यांना शाबासकी दिली. त्यांच्याशी चर्चा करतच मी शाळेच्या पाय-या चढु लागलो. एवढ्यात " बाळा , आमचं गाव सोडुन जावू नको रं ." असा आर्त आवाज ऐकु आला. मला वाटलं , कुणीतरी आपापसात बोलत असतील. मी आवाजाकडे दुर्लक्ष करत पुन्हा शाळेच्या पाय-या चढु लागलो. एवढ्यात तोच आर्त आवाज , त्याच सुरात ऐकु आला. यावेळी मी त्याकडे दुर्लक्ष करु शकलो नाही. मी आवाजाच्या दिशेने बघु लागलो.               एक साठीतील आजी घरची जणावरे शाळेच्या पाय-यांना लागुन असलेल्या ओढ्याच्या वाटेने हाकीत चालली होती. मी शाळेत आल्याचा बघुन ती पाय-यांजवळ आली. आणि माझ्याकडे बघत म्हणाली , " बाळा , आमचं गाव सोडुन जावू नको रं ! "  मला तिच्या बोलण्याचा अर्थ कळेना. मी बुचकळ्यात पडलो. " बाळा , तु आमच्या पोरांना जीव लावलस. त्य...