पोस्ट्स

एप्रिल, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सर , आम्ही तुमच्यासोबत थांबु ?

००० सर , आम्ही तुमच्याबरोबर थांंबु ? ००० उन्हाचा कडाका दिवसेंंदिवस वाढतच चाललाय. शाळेत परीक्षा संंपून निकाल तयार करायची लगबग सुरू आहे. असे असले तरी मुले शाळेला नियमीत येतच आहेत. आजही माझ्या वर्गातील उपस्थिती १००%  होती. मुलांंचे जेवण होवून थोळावेळ वर्गात स्थिरावली. उन्हाचा जोर वाढतच होता. त्यामुळे या चिमुरड्यांंना उन्हाच्या झळा लागायला नको म्हणून मी आज थोडा लवकरच घरी सोडले. मुलांंना सोडुन मी वर्गात बसून निकालाचे काम करू लागलो. एवढ्यात इयत्ता ४ थी तील करण व सुमीत दारात आली आणि एका सुरात म्हणाली , " सर , आम्ही तुमच्याबरोबर थांंबु ?" मी त्यांंच्याकडे बघितले. त्यांंच्या चेहर्‍यावरील निरागस भाव बघुन मलाही त्यांंना नकार देता आला नाही. मी " बसा " म्हणताच दोघेही आनंंदाने वर्गात त्यांंच्या जागेवर जावून बसले. माझे काम सुरु असल्याने मी त्यांंना वर्गातील गोष्टिंंची पुस्तके वाचायला सांंगितली. दोघेही शांंतपणे पुस्तक वाचत बसलीत.  बर्‍याचदा प्रशिक्षणांंध्ये मुलांच्या शाळेला येण्यावर एक कमेंंट केली जाते. ती म्हणजे " मुले शाळेला येताना हळुहळु  किंंवा रडत येतात. घरी जाताना ,सु...

देवाची करणी

००० देवाची करणी अन् नारळात पाणी..... अशी म्हण मराठीत प्रचलीत आहे.. याचाच साक्षातकार परवा शाळेत आला. मी पहिलीच्या वर्गात जात असताना मला दाराच्या चौखटिवर गवताच्या काड्या चिकटल्यासारख्या दिसल्या. त्या अशा मध्येच कशाकाय लटकल्यात हे बघायला जवळ गेलो तर मला व माझ्या सहकारी मॅॅडमना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. त्या हलणार्‍या काड्या दुसरंं तिसरंं काही नव्हतंं. तो होता अगदि गवताच्या काड्यांंसारखा दिसणारा गवती किडा. दुरून बघितल्यावर तो जिव असल्याचा कुणालाही न पटणारंं ! पण हीच तर खरी निसर्गाची कला आहे. त्याने माणवाला सर्व कला दिल्यात पण स्वत:कडे असंंकाही हातचंं राखुण ठेवलय की ते माणवाच्या आकलना पलीकडचंं असते.गुरू आपल्या शिष्याला विद्या देताना सगळंं देतो , पण असंं एखादंं हातचंं राखुण ठेवतंं की  ते शिष्यावर भारी पडतंं. विधाताही आपल्या अशा अनाकलणीय निर्मीतीतून हातच्याची प्रचिती वेळोवेळी करून देत असतंं........... गुलाब बिसेन ( ९४०४२३५१९१ )

अर्थज्ञानी स्वप्निल

००० अर्थज्ञानी .......स्वप्निल ००० काही महिन्यांंपूर्वी मी माझ्या शाळेशेजारच्या शाळेत तेथील शिक्षक रजेवर गेले असताना , एक दिवसासाठी शाळा सांंभाळायला गेलो होतो. शाळेत गेल्यावर परीसर स्वच्छता , परीपाठ ही नित्याची कामे करून वर्गात जावून  हजेरी घेतली. हजेरी घेवून होताच , इयत्ता 2 रीत शिकणारा  स्वप्निल त्याच्या मित्राला घेवून माझ्याजवळ आला . स्वप्निल त्या शाळेतला चुणचुणीत विद्यार्थी. स्वभावाने विनम्र आणि चेहर्‍याने गोड.   मी त्याला काही विचारण्याच्या आतच तो मला म्हणाला , " सर , तुमच्याकडे रूपे कार्ड आहे ? " जिथे अजुन मोठ्या माणसांंना रूपेकार्ड म्हणजे काय ? हे कळत  नाही , तिथे या चिमुकल्या स्वप्निलच्या अनपेक्षित प्रश्नाने क्षणासाठी मी भांंबावुनच गेलो. स्वत:ला सावरत म्हणालो , " का रे ?" " सर , रूपेकार्ड असले की माझे पप्पा पैसे देतात." स्वप्निल उत्तरला. रूपेकार्ड आणि पैशांंची काय भानगड आहे , हे मला काही कळेना. हे कोडंं उलगडण्यासाठी मी स्वप्निलकडून त्याच्या पप्पांंकडे मिळणार्‍या पैशांंची माहीती घेवू लागलो. तो मला सांंगु लागला. " सर , माझ्या पप्पांंकडे लयी...

सरड्याची धाव

सरड्याची धाव कुंंपणापर्यंंत.........समाजात अशा प्रवृृत्तीची अनेक माणसे असतात जी आपले अज्ञान लपवून ज्ञानी असल्याचा आव आणतात. ज्ञानी व्यक्ती असा आव कधीच आणत नाही. संंकट समयी ज्ञानीपणाचा आव आणणारी व्यक्ती गलीतगात्र होते तर खरी ज्ञानी व्यक्ती आपल्या अंंतरीच्या तेजाने सभोवताल उजळवून टाकते. संंकट समयी ज्ञानीपणाचा आव आणणारी व्यक्ती स्व:तच्या बचावासाठी कुंंपणाचा आसरा घेते तर खरी ज्ञानी व्यक्ती संंकटाशी दोन हात करण्यास सज्ज होते.............. गुलाब बिसेन

माझी विद्यार्थी सेवा

००० माझी.... विद्यार्थी सेवा ००० मी शाळेत येजा करत असलेल्या रस्त्यावर तीन हायस्कूल आहेत. या हायस्कूलमध्ये शिकणारी बरीच मुले लांंब गावातून एस.टि.ने येजा करतात. यातील जवळजवळ सर्वच मुलांंचे एस.टी.चे पास असतात. परंंतु बसने येजा करणारी ही मुले बसचा पास संंपला , बस चुकली , शाळेला जायला उशीर झाला तर कधी शाळेत लवकर जावंं लागलंं अशा अनेक कारणांंनी घरून शाळेला जाताना किंंवा शाळेतून घरी येताना ही मुले रस्त्याने येणार्‍या जाणार्‍या वाहनांंना हात दाखवून लिफ्ट मागत असतात. लिफ्ट मागुन घरुन शाळेत किंंवा शाळेतून घरी येण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी कधी वाहने थांंबतात तर कधी भूर्रकन निघुन जातात. अशा गरजु मुलांंना अडचणीत मदत व्हावी म्हणून मी मागील तीन चार वर्षापासून विद्यार्थ्यांंनी गाडीला हात दाखवला की मी गाडी थांंबवून त्यांंच्या शाळेपर्यंंत किंंवा शाळेतून परत येताना त्यांच्या  घरापर्यंंत  सोडतो. हा माझा कार्यक्रम संंपूर्ण वर्षभर सुरु असतो. काहीवेळा शाळेच्या अन्य कामात असल्यावर यात थोडा खंंड पडतो. यामुळे बर्‍याच मुलांंना माझा चेहरा ओळखीचा झालाय. या मुलांंना माझे नाव, गाव माहीत नसले तरी हात ...