पाळाचे आंबे

॰॰॰॰॰ पाळाचे आंबे ॰॰॰॰॰

       आंब्यायचा नाव घेतला का जसा तोंडाले पाणी सुटते. तशी अंबरायीची आठवण झाली का , पाळाचे आंबे डोळ्यायसमोर नाचावले लागतेत. आमच्या गावाच्या पच्चिमेलं गावाले लागुन गावचा तरा आहे. या त-यालं लागुनच आंब्याची अंबरायी !
     अंबरायीत तीन च्यार पिढ्यायपासुन उभी असलेली वीस पंचवीस आंब्याची झाळं. आंब्यायले मोहर लागावले लागला का , या अंबरायीतून येणारा जाणारा वास घेतल्याशिवाय जात नोहता. या मोहराचा रस पिवाले मोहतेलच्या माशाही करपच्या करप घेवून येत. आमी पोरंबारं शाळा सुटली का त-याच्या पारीना अंबरायीत जावु. जाताजाता पारीच्या सदासावली मोळुन झोळपा बनवू. अना झोळप्यायना आंबे पाळु. या झोळप्यायचीबी मोठी गंमत ! कयीकयी झोळपा आंब्याले लागे पर आंबे नोहते पळत. कयीकयी झोळपा झाळावरच लटके त कयीकयी झोळप्याना झोळपाच पळे. झोळपे सरलेच त गोट्यायना आंबे पाळु.
    आंबे पाळता पाळता झोळपे एकमेकालेबी लागत. हवा धुंदिना बारआंबे पळत हे आंबे कळु लागत असले तरी आमी आवळीना खावु. आंब्यायले पाळ पळावले लागला का दुपारी भर तपनीत आमी अंबरायीत जावु. घरचे तपनीत जावू देत नोहते. तरी त्यायचा डोळा चुकवून जावूच .
   पाळाचे आंबे मोठे गोळ ! ते खावासाटि सर्वजन अंबरायीत तयार रायत. एकाद्याचा पोरगा गावात भेटत नसल त तो अंबरायी भेटे. कायी पोरं अंबरायीतच पळले रायत.
    हवा धुंद सुटली का गावातले पोरं पोरी थैले धरु धरु अंबरायीत जात . गर्जन घुमरन असला तरी त्याची कोणी चिंता नोहता करत. कायी झाळायची राखणी चालु राये. तेती आमाले पाय ठेवता येत नोहता.  कायी झाळं त असे होते का त्या झाळायवरुन बंदर जागाच नोहती सोळत. त-याचा पाणी ना पोटभर आंबे. बंदर खुष ! मंग या बंदरायना कतरुन टाकलेले आंबे उचलावलं पोरायची शर्यत लागे. या धु-यावून त्या धु-यावर पोर परत जात. एका बांदितून दुस-या बांदित. या झाळाखालुन त्या झाळाखाली. कयी कयीत कायीजणायचे थैले बी फाटत. आता आंब्यायची झाळे कमी झाल्यापासून कोण कोणाले झाळाखालीबी येवू देत नायी. आता अंबरायी कमी झाली. कायीयनां बंदरायच्या उपद्रवामुळं त कोणीना धानावर सावली होते मनुन झाळं कापली. पण लहानपणी खालेल्या पाळाच्या आंब्यायची आठवण आताबी येते.........गुलाब बिसेन

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

कवलकी बंडी (नहानपनको खेल)

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा