जिवन फुलवणारे झाड

निसर्ग शिकवण...भाग- ६

०©० जीवन फुलवणारे झाड ०©०

झाड.... निसर्गाने माणवाला दिलेला एक वरदाण. माणसाच्या प्राथमिक गरजांपासून ते भौतिक गरजा भागवणारा एक सच्चा साथी. माणसानं माणसाची साथ जरी सोडली तरी झाड मात्र शेवटच्या क्षणापर्यंत अगदि माणसाची राख होईपर्यंत साथ देतो. एवढि लांब पर्यंत साथ इतर कुणाचीही माणसाला मिळत नाही.

जिवण जगण्यासाठी , जीवांमध्ये प्राण फुंकण्यासाठी आवश्यक असणार्‍या प्राणवायूचे समृद्ध साठे या झाडांकडे आहेत. पाऊस अडवून पृथ्वीवर नवजिवण फुलवण्याचे काम तो करतो.जमिनिवर पडणार्‍या पावसाला सजिवांसाठी धरतिच्या कुशीपर्यंत पोचवण्याचे काम झाड करतो. धरतीच्या कुशीत पोचलेलं हेच पाणी धरती आपल्या लेकरांना वर्षभर पाजत असते. झाड सजिवांना शितल छाया देतो. प्राणवायूचा मुख्य स्रोत झाडच आहे. फळे , फुले , पाने आणि लाकडे असे आपले सर्वस्व तो माणवाला अर्पण करतो.

मानवी जीवनात झाडाचे अनन्यसाधारण महत्व आहे. झाडांशिवाय जिवसृष्टिची कल्पनाच करता येणार नाही. अशा ह्या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे तो जेवढा वर वाढतो किंबहुणा त्यापेक्षा किंचित जास्तच तो जमिनिच्या पोटात मुळ्याच्या रूपात आपला जमिनिवरील भार सांभाळत असतो. त्यामुळे पूर , भूकंप यांसारख्या संकटातही तो अभेद्द असतो. वर्षानुवर्षे जमिनित पाय रोवून उभा असतो. याउल वरच्यावर मुळ्या असणारी झाडे छोट्याशा वादळाने उन्मळुन पडतात.

माणसाने कितीही प्रगतिची शिखरे गाठली तरी आपले पाय जमिनिवर ठेवावेत. जमिनिवर पाय असलेली व्यक्ती संकटांना न डगमगता तोंड देवून विजय प्राप्त करू शकते. तर थोड्याशा यशाने हुरळुन जाणारी माणसे चिरकाल यश टिकवून ठेवू शकत नाही. औट घटकेच्या राजाप्रमाणे त्यांची अवस्था होत असते.

संपूर्ण जीवन दुसर्‍यांच्या उपयोगी पडणार्‍या या आपल्या सच्च्या मित्राचा थोडा गुण आपणही घेवून इतरांच्या उपयोगी पडुया. स्वत: प्रकाशित होत असतानाच इतरांनाही प्रकाशमान करूया.

- गुलाब बिसेन (९४०४२३५१९१)

ब्लाॅग - gulabbisen.blogspot.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

कवलकी बंडी (नहानपनको खेल)

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा