नवतरी
॰॰॰ नवतरी ॰॰॰
धान पिवळा पडावले लागला का कास्तकाराची धांदल चालु होते. धाब्यावर ठेवलेला सुरकुळा काढ , जुण्या बंधायचा भारा काढ . बंडी कस त धिरा पाय. बंडीलं ओंगण लाव. धान कापावले बाया पाय. बोजे बांधावले माणसं पाय. या सगळ्यायची व्यवस्था झाल्यावर मंग चालु होते " णवतरीची " धामधुम. धान कापावच्या पयले ख-या तासावचा, त्यालं खुरदावण द्या. मंग शेणानं सारवा. या कामात घरातले पोरंबारंबी वाटाले नाही येत. लहान पोरायले शेण आणवचा , पाणी आणावचा काम. शाळेलं सुट्टि असली का सर्व पोरं बांध्यावर ! बोरा खा. लोखोरीच्या शेंगा , तुरीच्या शेंगा खा. मज्याच मज्या ! नवतरी सरतवरी चांगला मयनाभर हा उद्योग चालत होता.
आधुनिक काळात धान चुरावची मशीन आली . न बैलबंडीना केले जाणारी धानाची चुरणी कमी झाली. आतात खरेच दिसत नाही. या मशीनना कास्तकाराचे दिवसच पालटले. मयनाभर चालणारी चुरणी एका दिवसात होवून रायली. पर नवतरीची मज्या पुरी निंगुन गेली. थंडीत ख-याच्या बांधीत लाकळाचा खोळ पेटवुन शेकावले मज्या येत होती. ती आता येत नायी. मोळ्यात बंडी फिरवाची मज्या काही वेगळीच !
काळ बदला तशी वेळ बदलली. कास्तकारबी का करल ? त्यालं कोणती हाउस होती मशीनना चुरणा करावची. कास्तकारीत काम करावले मजुर भेटत नायी. मंग तो का करल. दिवसच फिरले कास्तकारीचे ! .........गुलाब बिसेन

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा