बुद्धि दे बाप्पा

बुद्धि दे बाप्पा

 नुकताच गणेशोत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा झाला. सगळीकडे मंगलमय , भक्तीमय वातावरण ! गणरायांचा हा दहा दिवसांचा उत्सव सर्वांना नविन उमेद , ऊर्जा देतो.
  गणरायांना निरोप देताना डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत. अशीच मित्राकडे गणरायांना निरोपाची लगबग सुरू होती. सर्व मंडळी गावाजवळच्या नदिवर जमली होती. थोड्याचवेळात आरतीला सुरूवात झाली. सर्व मंडळी आरतीत मग्न असताना आमच्या पाठीमागे अचानक धबकन आवाज झाला. सर्व दचकुन बघतात तर काय ? काही मंडळी गौरी, गणपती व शंकुरबाला नदिच्या पुलावरुन विसर्जित करत होती. हे बघुन मन खिन्न झाले. आजपर्यंत ज्या गणरायांना आपण विधिवत पुजले. त्यांचा असा निरोप बघुन आपण कुठल्या दिशेने प्रवास करतोय असा प्रश्न पडला...............गुलाब बिसेन

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

कवलकी बंडी (नहानपनको खेल)

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा