शिस्तबद्ध , चिवट मुंगी
© निसर्ग शिकवण... भाग-३ ©
००० शिस्तबद्ध , चिवट मुंगी ०००
निसर्ग चक्रातील चिमुरडा किटक म्हणजे मुंगी. रात्रंदिवस कामात व्यस्त राहणे हा तिचा स्वभाव. दुसर्याकडे लक्ष न देता आपल्या कामात व्यस्त असणारी मुंगी कुणी कळ काढलिच तर चावायलाही मागे पुढे बघत नाही. भल्याभल्यांना अस्मान दाखवायची ताकद इवल्याशा मुंगीत आहे. हत्ती आणि मुंगीची गोष्ट सर्वश्रुतच आहे. अशी हि मुंगी सुगीच्या दिवसात आपल्या वारूळात अन्न गोळा करून ठेवण्याचे काम करत असते. हे काम अगदि सिस्तबद्धपणे चाललेलं असते.
मुंगी सहज जरी चालत असली तरी एखाद्या सैनिकांच्या पलटनिप्रमाणे शिस्तबद्धपणे त्या चालत असतात. अन्न गोळा करताना आपल्यापेक्षा जड अन्नाचा कणही ति सहजपणे पेलते. यासाठी तिच्या हिमतीला दाद द्यावी लागेल. इवल्याशा मुंगीचा जिव जड अन्नाच्या कणाच्या वजनाने सहज जावू शकते पण मुंगी मात्र हे काम आपल्या हिमतीच्या जोरावर लिलया पार करते. काडीकचर्यातून अनेक अडथळ्यांशी दोन हात करत ति आपले अन्न निवार्यापर्यंत पोचवते.
मुंगीवर एखादे संकट कोसळल्यावर ति ज्या धैर्याने त्याला सामोरे जाते त्याला तोड नाही. संकट येताच सर्व मुंग्या एक होवून त्याचा सामना धैर्याने करतात आणि शत्रूला सळो कि पळो करून सोडतात. भले भले शत्रू इवल्याशा मुंगीपुढे हार मानतात. हे शक्य होत ते मुंगीच्या अंगात असलेल्या धैर्यामुळं. मुंगी चावली तर आपण तिला मारून टाकतो. पण बर्याचदा मुंगी मेलीतरी तिचा चावा सुटलेला नसतो. हा शत्रूशी लढण्याचा चिवटपणा मुंगीतच दिसतो.
मुंगीच्या अंगात असलेला चिवटपना , शिस्तबद्ध जिवनशैली , कष्ट करण्याची मानसिकता आणि कुठल्याही कठिण परिस्थिवर मात करण्यासाठी लागणारे धैर्य हे गुण माणसाने मुंगीकडुन घेण्यासारखे आहेत. इवलीशी शुल्लक वाटणारी मुंगी वरील गुणांच्या जिवावर या निसर्गचक्रात आपले स्वतंत्र अस्तिव राखत सन्मानाणे जगत आहे. माणसासारख्या बुद्धिमान प्राण्याला हे गुण नक्किच उपयुक्त ठरतील.....
.... गुलाब बिसेन (९४०४२३५१९१)
ब्लाॅग -gulabbisen.blogspot.com

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा