तणावरहित शिक्षणाची गुरूकिल्ली
तणावरहित शिक्षणाची गुरूकिल्ली
शिक्षण हि निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. हि प्रक्रिया बाळ गर्भात असल्यापासून सुरू होते आणि आयुष्यभर अविरत सुरू असते. मूल कुटुंबात , शेजारपाजारात अनौपचारीक शिक्षणाचे धडे गिरवत असतो.अनौपचारीक शिक्षणात मुलावर कुटुंबातील ज्येष्ठांकडून अनेक जिवनोपयोगी संस्कार घडवले जातात. मोठ्यांचा आदर करणे , स्वत:चे काम स्वत: करणे ,इतरांना कामात मदत करणे , वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता ठेवणे, इतरांना गरजेच्यावेळी मदत करणे असे अनौपचारीक शिक्षणाचे धडे बालक गिरवत असतो. हे धडे गिरवत असताना बालकावर कोणतेही बंधन नसते. किंवा वेळेचेही बंधन नसते.त्यामुळे बालक या काळात तणावरहित शिक्षण घेत असतो.
अनौपचारीक शिक्षणाचा टप्पा पूर्ण झाल्यावर मूल जेव्हा औपचारीक शिक्षण घेण्यासाठी शाळेत प्रवेश करतो , त्यावेळी त्याच्यावर शाळा , घर , कुटुंबिय , शेजारी इत्यादिंकडुन अनेक बंधने लादले जातात. शाळेत विशिष्ठ अभ्यास विशिष्ठ वेळेत करण्याचे बंधन बालकावर नकळत घातले जाते. त्यामुळे अनौपचारीक शिक्षण हसत खेळत घेणारे बालक औपचारीक शिक्षणाच्यावेळी तणावाखाली येतो. शाळेतिल विविध विषयांचा अभ्यास , शिकवणी वर्गाचा अभ्यास , विविध स्पर्धा परीक्षांची तयारी तसेच शिक्षक , पालक , पाहुणे यांच्या अपेक्षांच्या ओझ्यामुळे बालकावर ताण येतो. हा ताण न पेलवणारी मूल कुवतीप्रमाणे काम करू शकत नाही. त्यामुळे अनेक मुले वाम मार्गाला लागतात. तर काही मुले आपले जिवण संपवायलाही मागेपुढे बघत नाही.
बर्याच घरांमध्ये मुलांच्यापेक्षा त्यांच्या आईवडिलांवर अभ्यासाचा अधिक ताण आलेला दिसतो. त्यातही बोर्डाची परीक्षा असल्यास मुलांना घरातच कोंडुन ठेवणे (अभ्यासासाठी) , सारखे अभ्यास करण्यास सांगणे , पाहुण्यांकडे मुलांना न पाठवणे , मुलांच्या खेळण्यावर बंदि घालणे , शेजारपाजारात उठणे बसणे थांबवणे असले प्रकार केले जातात. असल्या प्रकारांमुळे मुलांवरील अभ्यासाचा ताण कमी होण्याऐवजी अधिकच वाढतो. वाढलेला ताण असह्य झाल्यास मुले टोकाची भूमिका घेवून आपला ताण घालवण्याचा प्रयत्न करतात.
त्यामुळे मुलांना अभ्यासाच्या तणावातून मुक्त करून तणावरहित वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. हि जबाबदारी शिक्षक , पालक , कुटुंबिय , शेजारी पाजारी या सर्वांची आहे.
मुलांच्या तणावरहित शिक्षणासाठी मुलांना त्यांच्या कलाप्रमाणे शिकुदेणं अधिक योग्य ठरेल. यासाठी मुलांची कल चाचणी करून घेता येईल. मुलांकडुन अपेक्षा ठेवण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्या मुलाची कुवत ओळखणे महत्वाचे आहे. कुवत नसलेल्या मुलाकडुन अवाठव्य अपेक्षा ठेवली तर त्यातून निराशाच पदरी पडेल. त्यापेक्षा मुलाची कुवत ओळखुन पालकांनी अपेक्षा ठेवणे अधिक चांगले. त्यामुळे मुल आणि पालक दोघेही तणावापासून लांब राहु शकतात. कारण अपेक्षांचं ओझं हे तणावाचे मुख्य कारण आहे.
घरी आणि शाळेत बालकासाठी तणावरहित वातावरण निर्माण करण्यासाठी शिक्षक , पालकानी मुलांच्या कलागुणांना वाव देणे खुप गरजेचे आहे. मुलांच्या आवडीनिवडी जोपासणे , त्यासाठी मुलांना प्रोत्साहित करणे , मुलांना पाहुण्यांकडे , आजोळी पाठवणे. मुलांचे सुप्त गुण ओळखुन ते विकसित करण्याचे प्रयत्न करणे. गायन , वादन , नृत्य , कला , क्रिडा इत्यादि कलांची मुलांच्या आवडीप्रमाणे जोपासना करून ते विकसित करणे यासाठी शिक्षक , पालक व कुटुंबिय यांचे प्रयत्न महत्वाचे ठरतात.
विविध छंदांच्या जोपासनेतून मुलांच्या मनावरील अभ्यासाचा ताण हलका करता येतो. कला किंवा क्रिडा क्षेत्र हे अर्थार्जनाचे क्षेत्र झालेले आहेत. त्यामुळे विविध कलांच्या व क्रिडास्पर्धांमध्ये मुलांना सहभागी करून घेता येईल. विविध कला गुणांच्या विकासातून मुलांचे व्यक्तिमत्व विकसित होईल. यातून मुलांमध्ये स्वत:विषयी अभिमानाची भावना निर्माण होईल. माझ्या अंगात इतरांपेक्षा वेगळे गुण आहेत. याची जाणिव मुलाला होईल. यातून त्याचा आत्मविश्वास वाढेल. आत्मविश्वास वाढल्यामुळे मुलाच्या मनावरील ताण कमी होवून अभ्यासात प्रगती होईल. तणावरहित वातावरणामुळे तो जिवणातील विविध स्पर्धांना तोंड देण्यास सक्षम बनेल. तणावरहित शिक्षणातून आजचा विद्यार्थी उद्याचा सुदृढ , सुजाण आणि सक्षम नागरिक बनेल.
श्री. गुलाब बिसेन
मु. सितेपार ता. तिरोडा
मो. नं. ९४०४२३५१९१

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा