पोस्ट्स

जुलै, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शाळा..... नव्हे माझी प्रयोगशाळा

शाळा.....नव्हे माझी प्रयोगशाळा विद्यामंदिर बादेवाडी शाळा , माझ्या आयुष्यातील एक सोनेरी पान. मसाई पठाराच्या कुशीत वसलेलं एक छोटसं टुमदार गाव. माझ्या नोकरीची सुरूवात या छोट्याशा गावातील छोट्याशा शाळेतून झाली. सह्याद्रिच्या कुशीत , मसाई पठाराच्या पायथ्याशी वसलेल्या या छोट्याशा गावात तीन खोल्यांची विद्यामंदिर बादेवाडी ही छोटिशी जिल्हा परिषदेची इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंतची शाळा. शाळेत चार वर्ग आणि दोन शिक्षक. प्रत्येकाने दोन दोन वर्ग सांभाळायचे. नोकरीची सुरूवातच अशा दुर्गम भागात झाल्याने आणि पूर्वानुभव पाठिशी नसल्याने पावला पावलावर परीस्थितीशी झगडावे लागले. चुकांमधुन शिकावे लागले. काम करत असताना हातून अनेक चुका होत होत्या पण त्या चुका पुढच्यावेळी सुधारत मार्गक्रमण करत गेलो. नोकरीच्या सुरूवातीला सर्व गोष्टि नविनच असल्याने प्रत्येक नविन काम करून बघणे , यशस्वी झालेल्या गोष्टिंची पुनरावृत्ती करत विद्यार्थ्यांमध्ये रूजवणे , या कारणाने हि शाळा माझ्यासाठी एक प्रयोगशाळाच ठरली. या प्रयोगशाळेत मी रोज नवनविन प्रयोग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यावर करत होतो. कधी मुलांच्या अभ्यासाव...

अपेक्षांचे ओझे

##   अपेक्षांचे ओझे  ## सकाळचे सात सव्वासात वाजले असतील , सुट्टिचा दिवस असल्याने आंघोळ करून चहाचा आस्वाद घेत मी खुर्चीत बसलो होतो. रेडिओवर सुमधुर भावगीतांचा कार्यक्रम सुरू होता. "जिवन गाणे गातच रावे , जिवन गाणे."  प्रसन्न सकाळी सुमधुर गितांनी आणखिनच प्रसन्न वाटत होते. अशात एकाएक माझा मोबाईल खणाणला. मी मोबाईल उचलुन बोलणार एवढ्यात मला समोरून आवाज आला ,  " सर , आपल्या गावातील " विक्रम " मरण पावला." समोरच्याचे बोलणे ऐकुन मला काहि सुचेनाच. मी त्यातच त्याला विचारायला लागलो , " हे असं अचानक कसं काय घडलं ? "  " सर , नोकरीच्या निराशेतून घरच्यांशी थोडा वाद होवून त्यानं आत्महत्या केली बघा." असं म्हणत पुढच्या व्यक्तीने मोबाईल ठेवला. सकाळी सकाळी मिळालेल्या या दु:खद वार्तेने सकाळचे प्रसन्न वातावरण दवबिंदु जसे सूर्यकिरणांच्या उष्णतेने क्षणात विरून जातात तसे क्षणार्धात हवेत विरून गेले. त्यात शेवटच्या वाक्याने मी सून्नच झालो. वीस बावीस वर्षाचा तरूण असं कसं करू शकतो ? तो एकदोनदा अपयशी झाला असेल , म्हणून काय झालं ! जगात शेकडोवेळा अपयश पचवत आपले ध...

जबाबदारी तुमची आमची

##  जबाबदारी.... तुमची....आमची  ## एप्रिल महिण्यात मी कोल्हापूरला राजारामपुरी पाचबंगला परिसरात फळांच्या दुकानात उभा असताना रेल्वे फाटकाजवळ अचानक धुराचे लोट आकाशात उठु लागल्याने परिसरातील सगळी जनता तिकडे बघु लागली. सुरूवातीला कुणीतरी कचरा पेटवला असेल असे समजुन मी तिकडे दुर्लक्ष केले. परंतु क्षणाक्षणाला वाढत जाणारा एवढा धुर साध्या कचर्‍याने निर्माण होणे शक्य नाही. हे लक्षात आल्यावर मी जवळ जावून बघितले तर कुणीतरी तिथे थर्माकाॅल पेटवून पसार झालेला होता. हा धुर जवळजवळ पंधरा मिनिटे आकाशाकडे धाव घेत होता. थर्माकाॅलची विल्हेवाट लावण्याची हि पध्दत आणि ठिकाण त्या महाभागाच्या असंवेदनशीलतेचे दर्शन घडवून गेली. भर वस्तीत एवढा वायू प्रदुषण करताना त्या महाभागाने कुठलाही विचार केला नव्हता हेच यातून प्रतित होत होते. कोल्हापूर शहरातील हा वर्दळिचा भाग. परीसरात रेल्वे स्टेशन , बसस्थानक तसेच दवाखाने आहेत. अशा ठिकाणी कचरा पेटवणं नक्कीच हितकारक नाही. अशा वस्तुंची विल्हेवाट लावणे सर्व सामान्यांसाठी खुप अवघड होवून बसत असले तरी ते भर रस्त्यावर पेटवून विल्हेवाट लावण्याचे कुणीही समर्थन करू शकत नाही. ...

रस्ता आणि प्रवास

रस्ता आणि प्रवास प्रवास........ प्रत्येकाच्या वाट्याला कमी अधिक प्रमाणात येतोच. कुठल्या न कुठल्या कारणाने प्रत्येकाला प्रवास करावा लागतो. प्रवासाला निघालेला प्रवाशाला रस्त्याने प्रवास करत असतानाना कधी चढ तर कधी उताराचा सामना करावा लागतो. प्रवासात अनोळखी रस्ता असल्यास तो कसा असेल याचा कुणालाच पत्ता नसतो. अनोळखी मार्गावर कुणी ओळखीचा भेटेल हेही सांगणे कठीणच ! असा अनोळखी रस्ता कधी काटाकुट्यांनी भरलेला तर कधी शितल छायेचाही असू शकतो. सगळेच रस्ते काही वळणावळणाचे नसतात. तसेच सगळेच रस्ते सरळही नसतात. वळणदार रस्त्यावर चालकाचे कसब पणाला लागत असते. वळण संपले कि सरळ रस्ता लागतोच लागतो. कधी कधी रस्ता बहुपदरीही असतो. त्यावर कधी वळण , कधी खाचखडगे तर कधी सरळ ! मानवी जिवनही असे अनेक पदरी रस्त्याप्रमाणे आहे. जिवनाच्या वाटेवर अनेक खाचखळगे , वळणे येतच असतात. अशावेळी मानसाच्या धैर्याचे कसब पणाला लागते. रस्त्यात येणारे खाचखळगे कायमच येत नसतात. या खाचखळग्यांना धैर्याने तोंड दिलं कि चांगला रस्ता सापडतो आणि जिवन प्रवास अधिक सुखकर होतो. वाट सरळ असो वा वळणावळणाची तिला कुठलीतरी दिशा नक्कीच असते. एका ठिकाण...

माया लावणारी माणसं

##  माया लावणारी माणसं  ## एका शिक्षकाच्या जिवनामध्ये विद्यार्थ्यांचं अस्तित्व जसं कधीही अस्ताला न जाणार्‍या सूर्यासारखं असतं , अगदि तसच पालकांचही असतं. शाळेचा संबंध केवळ विद्यार्थ्यांशीच नसतो. तर तो गावाशी आणि तेथील प्रत्येक पालकांशीही असतो. शाळेच्या गावात शिक्षक म्हणून वावरताना विद्यार्थी आणि पालक यांचा सारखा संपर्क येत असतो. यातून विद्यार्थी विकास आणि शाळाविकासाचा मार्ग प्रशस्त होत जातो. यातूनच काही न विसरता येणारी नातीही निर्माण होतात. या नात्यांना कोणतीही उपमा , नाव देता येत नाही. बादेवाडी / वेखंडवाडी सारख्या डोंगरकपारीतील शाळेत काम करत असताना अनेक चांगल्या , शुद्ध मनाच्या व्यक्तींचा सहवास मला लाभला. यामुळेच असेल कदाचित हि माणसे मला हाक मारताना बर्‍याचदा मी त्यांच्या गावच्या शाळेतील शिक्षक आहे हे विसरून जावून मी जणू त्यांच्या घरातील सदस्य असल्यासारखे मला वागणूक द्यायचे. हे त्यांचे निरपेक्ष प्रेम मला सर्व गोष्टिंपेक्षा श्रेष्ठ वाटते. अशाच एक आजी आपल्या नातवंडांच्या अभ्यासासंबधी अडचणी घेवून बर्‍याचदा शाळेत यायच्या. शाळेत आल्यावर आपल्या नातवंडांचा अभ्यास झाला नाही म्ह...

बाप माया कास्तकार (कविता)

#®#  बाप माया कास्तकार   #®# ( झाडीबोलीतील माझी कविता ) बाप माया कास्तकार कयीच शिकला नायी शाळा आपल्या घामाच्या धारायना त्याना पिकवलन मळा । बाप माया कास्तकार कयीच शिकला नायी शाळा कास्तकारीच्या हिसोबात त्याचा चुकला नायी फाळा । बाप माया कास्तकार कयीच शिकला नायी शाळा पोरा - पोरीले केलन शायने शिकवून सारकिच शाळा । बाप माया कास्तकार कयीच शिकला नायी शाळा इमानदारीच्या जोळिना बांदलन मोठाडगर वाळा । बाप माया कास्तकार कयीच शिकला नायी शाळा माणूसकीच्या भरवशावर जमवलन गोतावळा । बाप माया कास्तकार कयीच शिकला नायी शाळा नायी मानपान त्यालं बाप माया सादाभोळा । ......... गुलाब बिसेन (९४०४२३५१९१)

भजो घरको खाजो

===  भजो घरको खाजो ( कथा ) === ( भजो घरको खाजो या माझ्या  "पोवारी बोलीतील " कथेतून )   आलु बगणकी भाजी बनायशान सेवागनबाई तावापर रोटी टाकता टाकता विजुला कवबसी , " भाऊ , तोरं मामाजीला फोन लगायदेक भरा. बहुत रोज को फोन नयी आयी से." तसो मोटांगं मोबाईल इचकत बसेव विजु मोटांगलक फोन धरशान लायनांग आयव. " आई , गये हप्तामा मोला मामाजीको फोन आयेतो. धान कटाई चालु से कवत होता मामाजी. तोला सांगनकी ख्यालच नयी रयी." असो बोलत बोलतच विजु आपलं मामाजीला फोन लगावन बसेव. सेवागनबाईकी आखरीकी रोटी तावापर शिजत होती. बांधीपरलक धानको पळेव सर्वा बेचशान थकिभागी आयी सेवागनबाईला जोरकी भूक लगीती. ओकलक अज लवकर सयपाक करशान जेवनको उनको बिचार होतो. विजुबी शाळामालक थकेव भागेव उपाशीच होतो. " आई , मामाजीको फोन कवरेजकं बायेर सांगसे!" यनं विजुकं आवाजलक सेवागनबाईकी तंद्री टुटी... " रवनदे आबं. बादमा लगायदेकजो."  जेवणला ठाव मंडावता मंडावता सेवागणबाई कवन लगी. तसो विजु हात धोयशान आयव अना दुयी मायबेटा गरम गरम जेवनला बशा. दुय सालकं पयले अकाली नवरा जायेपासून वा आपलं...

बहुपयोगी मोह

००  आमच्या शेतातील बहुपयोगी मोहाचे (मोह) झाड  ०० ( फोटो - पानगळ सुरू असताना ) १) मोहफुलाच्या रसापासून " राब " नावाचा मधासारखा घट्ट पदार्थ बनवतात. जे चपातीला , भाकरीला लावून खाल्ले जाते. रक्तवाढिसाठी रामबाण उपाय असल्याने बाळंतीनीला खायला दिले जाते. २ ) मोहफुलापासून दारू तयार केली जाते. ३) मोहफुले वाळवून जनावरांना चारली जातात. ४) वाळवलेले मोहफुल चटणी मीठ लावून भाजुन खातात. ५) मोहफुलाच्या बियांपासून काढलेले तेल रोजच्या जेवनात वापरले जाते. ६) मोहाच्या पानांची पत्रावळ तयार करतात. ७) सावलीसाठी या झाडाचा मोठा उपयोग होतो. काही शब्द......                 १) मोऊ - मोहाचे फूल                 २) टोरूंबा - मोहाचे फळ                 ३) टोरी - मोहाचे बी                 ४) कुची - मोहाच्या फुलाची कळी - गुलाब बिसेन ( ९४०४२३५१९१ )

खरवीसचा डबा

बिनरक्ताची नाती ( भाग - १ ) खरवीसचा डबा दि.१५/०९/२०१७...... मी नेहमीप्रमाणे शाळेच्या कामात व्यस्त होतो. वर्गात विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू होता. एवढ्यात शाळेपुढे गाडी थांबल्याचा आवाज आला. त्यामुळे बाहेर डोकावून मी बघु लागलो. गाडीवरून माझा बादेवाडी शाळेतील विद्यार्थी विशाल गवड (सध्या तो बारावीत आहे ) शाळेत येताना दिसला. त्याच्या हातात एक स्टिलचा डबा होता. वर्गात येताच ,  "नमस्कार सर " म्हणत , हातातला डबा टेबलावर ठेवत म्हणाला ,  " बाबांनी ( आजोबा ) तुमच्यासाठी खरवीस पाठवलाय."  विशाल हा माझा प्राथमिक शाळेतील विद्यार्थी. तो बारावीला असल्याने त्याच्या अभ्यासाबद्दल विचारपूस केली. तो काॅलेजला जायच्या गडबडीत असल्याने जास्तवेळ न थांबता लगेच निघुन गेला. विशाल आणि त्याचा लहान भाऊ दोन्ही भावंडं माझ्याकडे शिकायला होती. तेव्हा त्यांचे आजोबा नातवांच्या अभ्यासाच्या चौकशीसाठी नेहमी शाळेत यायचे. कधी आठवड्यात , कधी पंधरा दिवसात त्यांची चक्कर शाळेकडे असायची. या आजोबांचा आपल्या नातवंडांवर अधिकच जीव ! त्यांनी शाळेत नियमीत अभ्यास करावा , यावर त्यांचा लक्ष असायचा. ते त्यांना कोणत्य...

जिवन प्रवास

००० जिवण प्रवास  ००० संध्याकाळचे साडेपाच वाजले असतील , थंडीचे दिवस असल्याने वार्‍यातून थंडी बोचत होती. सूर्य मावळतीला लागल्याने आभाळ संध्याकाळची चाहुल लागुन चहुकडे रंग उधळित होता. मी नेहमीच्या वाटेने शाळेतून घरी जायला परतीच्या मार्गाला लागलो होतो. रस्त्यात भेटणार्‍या ओळखीच्या व्यक्तींना , झाडांना , पानाफुलांना हात दाखवत , दिवसभर मुलांच्यात राहुन एक अलौकिक समाधान घेवून मी आपल्याच नादात चाललो होतो. रस्त्यात मध्येच लागलेल्या गावात रस्त्यावर आडव्या येणार्‍या कोंबड्यांना चुकवत मी रस्ता कापत होतो. एवढ्यात एका अनोळखी व्यक्तीने गाडीवरून येण्यासाठी हात दाखवला. मी स्वभावाप्रमाणे गाडी थांबवली. या रस्त्यावर बस किंवा वडापची सोय नसल्याने कुणाही गाडीवानाला हात दाखवत गाडी थांबवून प्रवास करावा लागतो. त्यामुळे या रस्त्याने जाताना मला कुणी हात दाखवला तर मी गाडी थांबवतो. ते गृहस्थ गाडीवर बसले आणि आमचा दोघांचा प्रवास सुरू झाला. पन्नाशी पार केलेली , दाढी वाढलेली व्यक्ती अनोळखी असल्याने मी काहीच बोललो नाही. प्रवास सुरू होताच ते गृहस्थ माझ्याकडे बघत म्हणाले , " तुमी सर हायसा ? " मी , "...

भार्गवचे रविवारीय वाचन

००  भार्गवचे रविवारीय वाचन  ०० रविवार सुट्टिचा दिवस.... रविवारी कसं सगळं निवांत... आमच्या गृहिणीला सोडलं तर कुणालाच कशाचीच लगबग नसते. अशा सकाळी सकाळची कामे आटोपून भार्गवसोबत मौजमज्जा सुरू होती. अजुन वर्तमानपत्र आलेला नसल्याने काहितरी वाचावे म्हणून पुस्तक शोधु लागलो. तेव्हा माझ्या पिशवीत किशोरचा एक दिवाळी अंक सापडला. तो चाळायला लागताच भार्गव   " पप्पा मला , पप्पा मला."   करत ओढु लागला. मग काय ? बालहट्टापुढे कुणाचे काही चालत नाही. मी किशोर त्याच्या हातात सोपवला. किशोर हाती येताच , भार्गव एक एक पान चाळत , " पप्पा , हे काय - ते काय ? " म्हणत म्हणत संपूर्ण किशोर नजरेखालुन घातला. वाचनाचा गंध या वयात त्याला नसला तरी चित्रवाचनाची आवड मात्र त्याला नक्की लागली आहे. कुठलेही पुस्तक हाती पडले कि , त्याचा मुखपृष्ठापासून मलपृष्ठापर्यंत चित्रांचे निरीक्षण तो करत असतो. चित्र निरीक्षणाकडुन वाचनाकडे मुले वळायसाठी किशोरसारखी बालमासिके मुलांच्या हाती पडणे गरजेचे आहे. वाचनाचा आनंद मिळण्यासाठी लहान मुलांना बालमासिके उपयुक्त ठरतात......... गुलाब बिसेन (९४०४२३५१९१ )

माजी विद्यार्थी

०००  माजी विद्यार्थी  ००० शिक्षकाचं आयुष्य शाळा आणि विद्यार्थी यांच्या अवतीभवती कायम फिरत असतं............  चांगले विद्यार्थी घडवणे हे प्रत्येक शिक्षकाचे स्वप्न असते. त्यासाठी  अहोरात्र प्रयत्न सुरू असतात. या कष्टांचा शिक्षकाला कधी त्रास होत नाही............  कारण विद्यार्थी हिच खरी संपत्ती अाहे.  विद्यार्थी घडवल्यावर तो जेव्हा एखाद्या सन्मानजनक पदावर पोचतो , तेव्हा त्या विद्यार्थ्याच्या कुटुंबियांना होणार्‍या आनंदाएवढाच किंबहुना त्यापेक्षाही जास्त आनंद त्या शिक्षकाला झालेला असतो......... शिक्षकाची हिच बाजु इतर व्यवसायिकांपासून शिक्षकाचे स्थान वेगळे ठेवण्यात कारणीभुत ठरते. शिक्षकाचा जिवन प्रवासच विद्यार्थ्यांच्या जिवनात आनंद पेरण्यासाठी सुरू असतो.......  माजी विद्यार्थी कधीतरी अचानक येवून भेटले कि , त्यांच्याशी हितगुज करताना मिळणारा आनंद अवर्णनिय असतो.......  मुलांची प्रगती बघणे , सुख दु:ख जाणून घेणे हि शिक्षकांसाठी आनंदयात्राच ठरते......  यातून मुलांसाठी केलेल्या कष्टांचे चिज झाल्याचे समाधान मिळते. त्यामुळेच एका शिक्षकाच...

नंबर प्लेटचे वाचन

००  नंबर प्लेटचे वाचन  ०० काल व्यवसाय भेटिसाठी गावात मुलांसोबत गेलो होतो. जाताना रस्त्याला बरीच वाहने उभी होती. यामध्ये दुचाकीपासून चारचाकी , टेम्पो या वाहनांचा समावेश होता. कामावरून घरी परतलेली मंडळी दुचाकि दारात लावतात.पण मोठी वाहने जागेअभावी मोकळी जागा बघुन रस्त्याकडेला लावतात. अशी वाहने कायमच रस्त्याकडेला वाहतुकीला अडथळा न करता लावलेली असतात. त्यामुळे वाहनधारकांना जागेअभावी होणारी गैरसोय टाळली जाते. काल मी मुलांसोबत व्यवसायभेटिला जात असल्याने मुलांनाही खुपच आनंद झाला होता. तो आनंद त्यांच्या चेहर्‍यावर ओसंडुन वाहताना जाणवत होता. सगळं काही नेहमीचच ! तोच रस्ता , तिच घरे , तेच दुकान परंतु शिक्षक सोबत असले कि , मुलांचा तोरा काही औरच असतो. नवनविन शिकण्यातील मुलांचा आनंद वाखानण्याजोगा होता. याचा अनुभव मला पावलापावलावर येत होता. काही मुले माझ्यासोबत , काही उत्साहात माझ्या पुढेपुढे करत चालताचालताच गाड्यांच्या नंबर प्लेट वाचु लागले. सुरूवातीला ते फक्त शेवटचे चार अंकच वाचत असल्याचे माझ्या लक्षात आले. नंबर प्लेटवरील शेवटचे चार अंक म्हणजे पूर्ण नंबर नसून त्यापूर्वीच्या प्रत्येक अक...

नियम पाळायचे कुणी ?

नियम पाळायचे कुणी ? रस्त्याने येजा करताना मध्येच अचानक कुणी आडवा आला , कुणी जागा नसताना ओव्हरटेक करू लागला , सायलेंसर काढुन गाडी पळवू लागला , जोरजोरात हाॅर्न वाजवू लागला कि , तळपायाची आग एकदम मस्तकातच जाते. बर्‍याचदा माणसांची आपापसात हमरीतुमरी होते. रस्त्यावर विनाकारण अडवणूक होते. त्यामुळे इतर प्रवाशांना त्याचा नाहक त्रास सोसावा लागतो. असे प्रकार उद्भवू नयेत यासाठी रस्तावाहतुकिचे असंख्य कायदे आणि नियम अस्तित्वात आहेत. पण एवढे सगळे कायदे नियम असूनही प्रवासावेळी वरीलप्रकारचा त्रास काही थांबत नाही. रस्तानियमांचे उल्लंघन करण्याची अनेक कारणे असतील त्यापैकी काही कारणे म्हणजे नियम तोडणार्‍याला जबर शिक्षा न होणे , यंत्रणेकडुन नियमांचे योग्य अमलबजावणी न होणे , अलिकडेच एक नविन अस्तित्वात आलेला कारण म्हणजे नियम तोडणे हे प्रतिष्ठेचे समजले जाणे. उदा. गाडीच्या नंबर प्लेटवर फॅन्सी नंबर घालणे नियमात बसत नसतानाही अनेक दादांची ओळख हि फॅन्सी नंबरवरूनच लवकर पटते. गाड्यांच्या धुर सोडणे आणि कर्कश आवाज करणे यावर बंदि असतानाही अनेकदा गाड्यांचे सायलेंसर काढुन मोठ्या दिमाखात गाड्या फिरवल्या जातात. आणि बघण...

सावधान , मुले शिकत आहेत

सावधान...... मुले शिकत आहेत दुपारचे दिड वाजले असतील , त्यादिवशी भूक लागल्याने मुलांचे अभ्यासात लक्ष नव्हते. सूचना देवूनही मुलांची चुळबुळ सुरूच होती. त्यामुळे मुलांची परिस्थिती बघुन दुपारचे जेवन येईपर्यंत मी मुलांचा गप्पांचा तास घ्यायला सुरूवात केली. गप्पांचा तास म्हणजे मुलांशी अनौपचारीक गप्पा करत त्यांना बोलतं करणं. मुलांनी सगळे दफ्तर आवरले आणि गप्पांचा तास सुरू झाला. खेड्यातील मुले म्हटल्यावर साहजीकच त्यांच्या दैनंदिन उपक्रमांपासून शेतशिवारापर्यंत चर्चा रंगु लागली. मधे मधे प्रश्न विचारत मी त्यांना बोलतं ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. दुपारचे जेवन येइपर्यंत मला किल्ला लढवायचा होता. त्यामुळे मुलांना बोलतं ठेवत मी किल्ला लढवत होतो. चर्चा रंगात आली असतानाच मी मुलांना एक प्रश्न केला , " मुलांनो तुमच्यापैकी कोण कोण आईला कामात मदत करतो ? " यावर सर्व मुले आपआपले उत्तर सांगु लागले. धुणी भांडीपासून अगदि जनावरांना धुण्यापर्यंतची कामे मुले सांगु लागली. मुलांचा गप्पांतील सहभाग बघुन मला खुप आनंद झाला. मुले स्वत:हुन या गप्पांमधुन व्यक्त होत होते. "सर , आणि प्रश्न विचारा." अ...