वृक्षबंधु
॰॰॰॰॰ वृक्षबंधु ॰॰॰॰॰
" वृक्षवल्ली आम्हा सोयरे " असे तुकोबाराय सांगतात. जर वृक्ष आमचे सगेसोयरे असतील तर ते एकमेकांचे सगेसोयरे नक्कीच असणार ! असेच आमच्या शाळेतील वृक्षबंधु !
दोघात वयाने तीन वर्षांचा फरक. मोठा भाऊ डेरेदार तर लहान देखणा आणि रूबाबदार. मोठ्याचा शाळा प्रवेशाची कहाणी जरा वेगळीच ! झाले असे , मी तालुकास्तरीय क्रीडास्पर्धेला दोन शाळकरी पैलवान ( विद्यार्थी ) घेवून गेलो. येताना वाटेत मला नर्सरी दिसली. गाडी लावून मी नर्सरीत गेलो आणि मला हवे असलेले चेरीचे रोप शोधु लागलो. परंतु चेरीचे रोपटे काही सापडेना. शेवटि नर्सरी मालकाला विचारले. त्याने एका कोप-याकडे बोट केले. तिकडे बघतो तर मला चांगली सात फुट वाढलेली चार पाच झाडे दिसली.त्यातील एक चांगले रोपटे मी निवडले. परंतु काढायला गेल्यावर रूतुन बसलेल्या मुळ्या काही निघेनात. शेवटी कु-हाडीने मुळ्या कापल्या. आता सात फुटाचे झाड सोबत मुळ्यांना दोनतीन किलो माती. अशा परिस्थितीत २० किमी दुचाकीवरून तिघेजन पन्हाळगड चढुन कसेबसे शाळेत पोचलो. नियोजित जागेत झाड लावले.
मी झाड लावले खरे ! पण ते जगेल याची शास्वती नव्हती. कारण सात फुटाचे जुने रोप , मुख्य मुळी कापलेली आणि शिळाय लावले तेही जानेवारी महिन्याच्या शेवटि शेवटि. त्यामुळे जोतो सल्ले देवू लागला. " पावसाळ्यात लावायला हवं होतं , जरा घाईच केली." एक ना अनेक !
मी मात्र ठरवलं होतं. काही झाले तरी झाडाला जगवायचेच !
सकाळी शाळेत गेल्या गेल्या दोन बादल्या पाणि व शाळा सुटताना एक बादली पाणी . अधेमधे युरियाचा खुसाक. विद्यार्थी व शिक्षक सर्वांनी मिळुन त्याची काळजी घेटली. आणि बघता बघता हा आमचा मित्र हिमतीने स्व:तच्या पायावर उभा झाला.
आता मोठ्याच्या जोडीला लहान शाळेत हळुच प्रवेशला. त्याला मोठ्यापासुन १५ फुटावर जागा देण्यात आली. दोघांच्या मधुन शाळेच्या पाय-या . दोघेही आता हातात हात घेवून शाळेत येणा-या जाणा-यांचे स्वागत करतात. मुले शाळेला येताना दिसली की पानांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करतात. शाळा सुटताना भावूक होतात. आपल्या अंगाखांद्यावर शेकडो पाखरांना खेळवत उद्याची सुंदर स्वप्ने दाखवत आहेत.............गुलाब बिसेन ( 9404235191 )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा