विद्यार्थ्यांच्या काव्यमय निर्मितीचा सुंदर अविष्कार - वायगावची बालकविता
विद्यार्थ्यांच्या काव्यमय निर्मितीचा सुंदर अविष्कार - वायगावची बालकविता गोंदिया जिल्ह्यातील सितेपार या गावचे आदर्श शिक्षक गुलाब बिसेन हे सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील वायगाव या शाळेत कार्यरत आहेत. त्यांची आजपर्यंत सात पुस्तके प्रकाशित आहेत. यात सृजनशाळा, खोपळीमाकी दिवारी, फिपोली, नवतरी, गावतर, बाबांची सायकल आणि वायगावची बालकविता या पुस्तकांचा त्यात समावेश आहे. त्यांना आजपर्यंत अनेक नामवंत साहित्य संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचा नुकताच वायगावची बालकविता हा त्यांच्या विद्यार्थ्यांचा संपादित केलेला बालकवितांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता व सृजनशीलतेला प्रोत्साहन देऊन त्यांनी त्यांच्याकडून काव्य निर्मिती करून घेतली आहे. ही बाब विशेष कौतुकास्पद आहे. गुलाब बिसेन हे एक संवेदनशील साहित्यिक आहेत. त्यांनी आपल्या शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वनिर्मित कवितांना प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडून वेगवेगळ्या विषयावर काव्य निर्मिती करून घेतली आहे. या बालकाव्यसंग्रहात एकूण 26 कवितांचा समावेश आहे. यात झाड, फुल...