सुरवंटाचं फुलपाखरू होणं
© निसर्ग शिकवण...भाग-१ ©
००० सुरवंटाचं फुलपाखरू होणं ०००
फुलपाखरू..... एक सुंदर , सर्वांना आपल्या सौंदर्याने आकर्षित करणारं , सर्वांना हवहवसं वाटणारं...... लेखकांना लिहितं करणारं.... कवींची लेखणी बहरवणारं ... एक किटक ! सौंदर्य म्हणजे काय असतं हे त्याच्याकडे बघितल्यावर कळतं.... सुंदरतेचं सर्वोच्च शिखर म्हणजे फुलपाखरू.... याचा जन्म तेवढाच कष्टप्रद... वेदनादायी... जेवढं त्याचं सौंदर्य मोहक तेवढच त्याचं सौंदर्य प्राप्त करणं कष्टप्रद.
टाकिचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही. याचीच प्रचिती हा फुलपाखरू करून देतो. अळीने अंड दिल्यापासून हा प्रवास सुरू होवून , अंड्यापासून सुरवंट , सुरवंटातून अळी , अळितूपासून कोष आणि कोषापासून फुलपाखरू.... हा प्रवास प्रेरणादायी असाच आहे. कुरूप सुरवंटातून सुंदर फुलपाखरू पर्यंतचा प्रवास माणसासाठी प्रेरक आहे. किळसवाणा सुरवंटाची आठवणही अंगावर काटा आणते. परंतु हा सुरवंट कुणाच्याही हिनवण्याला भिक न घालता आपला प्रवास सुरूच ठेवतो आणि एक दिवस सौंदर्याचे शिखर गाठतो.
दैनंदिन मानवी जिवनातही अनेक अडचणी येत असतात , पावलोपावली हिनवणारी मंडळींचं टोळकं डिवचत असतो. परंतु अशा मानसिकतेच्या चमच्यांना भिक न घालणारा सुरवंट एक दिवस आपले सौंदर्याचे शिखर गाठण्याचे स्वप्न साकार करतो. हे सगळ्याच सुरवंटांच्या नशीबी असते असे नाही. काही सुरवंट रस्त्यातच जीव सोडतात. म्हणून काय प्रयत्नच करणे सोडायचे ? आपल्या अथक प्रयत्नांतून सुरवंट कुरूपतेचा लागलेला कलंक पुसुन काढतो. हाच भाव प्रत्येकाने स्वत:मध्ये भिनवल्यास प्रगतीचे शिखर नक्कि गाठता येईल. त्यासाठी गरज आहे ती सुरवंटासारख्या कुणाच्याही चेष्टेची तमा न बाळगता अथक परिश्रम करण्याची.......... गुलाब बिसेन (९४०४२३५१९१)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा