कारागीर कोळी

© निसर्ग शिकवण...भाग-२ ©

००० कारागीर कोळी ०००

विणकाम कारागीरीतील वस्ताद म्हणजे कोळी. रात्रंदिवस विणकाम करणारा कोळी जाळं विणतो.आपल्या शरिरातील स्रवणार्‍या विशिष्ट द्रवाच्या सहाय्याने तो आखिवरेखीव विणकाम करतो.जाळं विणता विणता तो असंकाही कारागीरी करतो कि या जाळ्यातून शत्रूला सुटका करणे अशक्य होवून जातं. कोळ्याचे संपूर्ण जिवण त्याच्या जाळ्याभोवती फिरत असते. खाणे पिणे उठणे बसणे इत्यादि इत्यादि. जागा मिळेल तिथे आपली विणकाम कला बहरवण्याचे काम तो करत असतो. माणसांचा वावर नसलेल्या घरात तर ते अधिकच जाणवते. दोन चार दिवस घरी माणसं नसली कि कोळ्यानं जाळं केलच म्हणून समजा.

जाळं विणून सावज टिपणार्‍या कोळ्याला अन्नासाठी अनेक दिवस उपवास सोसावा लागतो. त्याला अन्नासाठी जाळ्यात शिकार अडकण्याची अनेक दिवस वाट पहावी लागते. आणि सावज जाळ्यात अडकताच आपल्यापेक्षा आकाराने मोठ्या असणार्‍या शिकारीचाही तो फडशा पाडतो. परंतु यासाठी त्याला अनेक दिवस वाट पहावी लागते. यासाठी त्याला सहनशीलता दाखवावी लागते. शिकार कधी जाळ्यात अडकेल याची कोणतीच जाणीव किंवा शास्वती नसतानाही सहनशीलतेच्या बळावर तो अनेक दिवस विना अन्न पाणी शिकार जाळ्यात अडकण्याची वाट पाहत असतो. भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितल्याप्रमाणे... कर्म करा परंतु फळाची अपेक्षा करू नका. या तत्वाचेच जणू पालन तो करत असतो. अशी सहनशीलता दाखवणारी व्यक्ति आपल्या जिवनात ध्येय्यापर्यंत निश्चितच पोहचते.

सहनशीलतेचा अंत पाहणे असा वाक्प्रचार मराठीत प्रचलित आहे. त्या सहनशिलतेच्या अंताच्या पलीकडील सहनशीलता या कोळ्याच्या अंगात आहे. या सहनशीलतेच्या बळावरच तो निसर्ग चक्राच्या फेर्‍यातही आपले अस्तित्व टिकवून ठेवतो आणि आपली प्रगती साधतो. हिच सहनशीलता माणसाने आपल्या अंगात भिनवली तर या धकाधकिच्या जिवनातही मनुष्य आपले इप्सित साध्य करू शकतो.आधुनिक काळात माणसाच्या अंगी सहनशीलतेची कमतरता प्रकर्षाने जाणवते. छोट्या छोट्या कारणांवरून आपापसात भांडण , चिडचिड , ताणतणाव या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या दुष्टचक्रव्हूवहात सापडलेल्या माणसाला कोळ्याची सहनशीलता नक्कीच तारू शकेल........... गुलाब बिसेन (९४०४२३५१९१)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

कवलकी बंडी (नहानपनको खेल)

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा