पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मुलांना लागला फुलपाखरांचा लळा

मुलांना लागला फुलपाखरांचा लळा फुलपाखरू.... निसर्गाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती. फुलांतील मकरंद खाण्यासाठी फुलांवर बसलेल्या फुलपाखरांचे सौंदर्य बघणे हे डोळ्यांना सुखद संजीवणीच! शाळेत फुलझाडांवर बसणार्‍या फुलपाखरांना मुले पकडण्याचा प्रयत्न करायचे. कधी कधी नाजुक फुलपाखरं मुलांच्या तावडीत सापडायचे. मुलांना फुलपाखरु पकडल्याचा खुप आनंद व्हायचा. परंतु मुलांच्या आनंदात मात्र फुलपाखराचे पंख फाटायचे आणि त्यांचा जीव जायचा. मुलांमुळे फुलपाखरांचे जीव जाणे मला काळजीत टाकु लागले. त्यामुळे मी मुलांना फुलपाखरांना पकडु नका. तर त्यांचे सौंदर्य बघा असे सांगु लागतो. हळुहळु मुलांनी फुलपाखरांना पकडायचे काम कमी केले. मुलांमध्ये फुलपाखरांविषयी प्रेम निर्माण व्हावे यासाठी मी त्यांना फुलपाखरांच्या विविध खडतर अवस्था व्हिडिओच्या माध्यमातून समजावून सांगितल्या. त्यामुळे मुले हळुहळु फुलपाखरांच्या निरीक्षणाकडे वळुन विविध रंगांचे निरीक्षण करू लागले. एक दिवस एका विर्थ्याने शाळेपाठीमागे रंगीबेरंगी फुलपाखरे उडत असल्याचे मला सांगितले. ते बघण्यासाठी मी मुलांना घेवून शाळेपाठीमागील शेतात गेलो. तर शेतातील बांध...

ढोल , ताशा आणि झांज

ढोल , ताशा आणि झांज     """""""""""""""""""""""""""""""""      शारिरीक शिक्षणाच्या तासात  " झांज पथकाचे " प्रात्यक्षिक करण्यासाठी मुलांची लगबग सुरु होती. साहित्याची जुळवाजुळव होताच वादकांनी ढोल ताशांचा कडकडाट केला. आवाज आसमंतात घुमू लागला. मुलांनी झांजांचा आवाज करत फेर धरला. हा आवाज संपुर्ण गावात वा-यासोबत घुमु लागला. आवाज ऐकुण गावातील बारकी पोरे शाळेकडे धावु लागली. झांजपथकाचा तालबद्ध सराव सुरु होता. एवढ्यात एका लहान चिमुकलीने पायाचा ठेका धरला. बघ्यांची तमा न बाळगता ति सरावात एकरुप झाली. हा प्रकार माझ्या सहका-याच्या लक्षात येताच त्यांनी मला इशारा केला . मी त्या चिमुरडीला पुढे आणले. तिचे कौतुक केले. तिच्या हातात झांज दिला. परंतु त्यांचा वजन तिला पेलवेना. शेवटि तिने रिकाम्या हातांनीच फेर धरला. ढोल , ताशा आणि झांजांनी एका निरागस बाळाला शाळेत आणले..... हेही नसे थोडके !

बुद्धि दे बाप्पा

बुद्धि दे बाप्पा  नुकताच गणेशोत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा झाला. सगळीकडे मंगलमय , भक्तीमय वातावरण ! गणरायांचा हा दहा दिवसांचा उत्सव सर्वांना नविन उमेद , ऊर्जा देतो.   गणरायांना निरोप देताना डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत. अशीच मित्राकडे गणरायांना निरोपाची लगबग सुरू होती. सर्व मंडळी गावाजवळच्या नदिवर जमली होती. थोड्याचवेळात आरतीला सुरूवात झाली. सर्व मंडळी आरतीत मग्न असताना आमच्या पाठीमागे अचानक धबकन आवाज झाला. सर्व दचकुन बघतात तर काय ? काही मंडळी गौरी, गणपती व शंकुरबाला नदिच्या पुलावरुन विसर्जित करत होती. हे बघुन मन खिन्न झाले. आजपर्यंत ज्या गणरायांना आपण विधिवत पुजले. त्यांचा असा निरोप बघुन आपण कुठल्या दिशेने प्रवास करतोय असा प्रश्न पडला...............गुलाब बिसेन

वृक्षबंधु

॰॰॰॰॰ वृक्षबंधु ॰॰॰॰॰       " वृक्षवल्ली आम्हा सोयरे " असे तुकोबाराय सांगतात. जर वृक्ष आमचे सगेसोयरे असतील तर ते एकमेकांचे सगेसोयरे नक्कीच असणार ! असेच आमच्या शाळेतील वृक्षबंधु !      दोघात वयाने तीन वर्षांचा फरक. मोठा भाऊ डेरेदार तर लहान देखणा आणि रूबाबदार. मोठ्याचा शाळा प्रवेशाची कहाणी जरा वेगळीच ! झाले असे , मी तालुकास्तरीय क्रीडास्पर्धेला दोन शाळकरी पैलवान ( विद्यार्थी ) घेवून गेलो. येताना वाटेत मला नर्सरी दिसली. गाडी लावून मी नर्सरीत गेलो आणि मला हवे असलेले चेरीचे रोप शोधु लागलो. परंतु चेरीचे रोपटे काही सापडेना. शेवटि नर्सरी मालकाला विचारले. त्याने एका कोप-याकडे बोट केले. तिकडे बघतो तर मला चांगली सात फुट वाढलेली चार पाच झाडे दिसली.त्यातील एक चांगले रोपटे मी निवडले. परंतु काढायला गेल्यावर रूतुन बसलेल्या मुळ्या काही निघेनात. शेवटी कु-हाडीने मुळ्या कापल्या. आता सात फुटाचे झाड सोबत मुळ्यांना दोनतीन किलो माती. अशा परिस्थितीत २० किमी दुचाकीवरून  तिघेजन पन्हाळगड चढुन कसेबसे शाळेत पोचलो. नियोजित जागेत झाड लावले.    मी झाड लावले खरे ! पण ते ...

नळ , पाणी आणणि निसर्ग

॰॰॰ नळ , पाणी आणि निसर्ग॰॰॰    इयत्ता ३रीच्या परिसर अभ्यास विषयांतर्गत " गावातील नळांची संख्या मोजण्याच्या उपक्रमासाठी "  मी मुलांसोबत गावात गेलो . सोबत ३री व ४थीची मुले होती. सरांसोबत काम करायचे म्हटल्यावर मुलांना खुप आनंद होतो. या उपक्रमासाठी मुले खुप उत्साही होती. मी मुलांचे दोन दोनचे गट करुन त्यांना नेमुन दिलेल्या गल्लीतील नळ कनेक्शनची संख्या मोजायला पाठवले. काही वेळात मुलांनी माहीती गोळा केली. या माहीतीचे विश्लेशन करून  गावातील एकुण नळांची संख्या, काॅक असलेल्या नळांची संख्या , काॅक नसलेल्या नळांची संख्या इ. माहीती गोळा करण्यात आली.        मसाई पठाराच्या कुशीट वसलेल्या या गावाला निसर्गाचे वरदान लाभलय. पठारावरुन बघितल्याससमाधीस्त बसलेल्या एखाद्या रुषीप्रमाणे हे गाव भासते. निसर्गाने गावाला मुबलक पाणी दिलयं. अवघ्या पंचक्रोशीत उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण असताना येथे पाण्याचा सुकाळ होता. गावाला दोन ते तीन झ-यांतुन मुबलक पाणी मिळते. तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होईल या भाकिताच्या पार्श्वभूमीवर बादेवाडीकर खुप नशीबी आहेत. गरज आहे ती फक्त या निसर्गाला...

नवतरी

॰॰॰ नवतरी ॰॰॰      धान पिवळा पडावले लागला का कास्तकाराची धांदल चालु होते. धाब्यावर ठेवलेला सुरकुळा काढ , जुण्या बंधायचा भारा काढ . बंडी कस त धिरा पाय. बंडीलं ओंगण लाव. धान कापावले बाया पाय. बोजे बांधावले माणसं पाय. या सगळ्यायची व्यवस्था झाल्यावर मंग चालु होते  " णवतरीची " धामधुम. धान कापावच्या पयले ख-या तासावचा, त्यालं खुरदावण द्या. मंग शेणानं सारवा. या कामात घरातले पोरंबारंबी वाटाले नाही येत. लहान पोरायले शेण आणवचा , पाणी आणावचा काम. शाळेलं सुट्टि असली का सर्व पोरं बांध्यावर ! बोरा खा. लोखोरीच्या शेंगा , तुरीच्या शेंगा खा. मज्याच मज्या ! नवतरी सरतवरी चांगला मयनाभर हा उद्योग चालत होता.         आधुनिक काळात धान चुरावची मशीन आली . न बैलबंडीना केले जाणारी धानाची चुरणी कमी झाली. आतात खरेच दिसत नाही. या मशीनना कास्तकाराचे दिवसच पालटले. मयनाभर चालणारी चुरणी एका दिवसात होवून रायली. पर  नवतरीची मज्या पुरी निंगुन गेली. थंडीत ख-याच्या बांधीत लाकळाचा खोळ पेटवुन शेकावले मज्या येत होती. ती आता येत नायी. मोळ्यात बंडी फिरवाची मज्या काही वेगळीच !  ...

पाळाचे आंबे

॰॰॰॰॰ पाळाचे आंबे ॰॰॰॰॰        आंब्यायचा नाव घेतला का जसा तोंडाले पाणी सुटते. तशी अंबरायीची आठवण झाली का , पाळाचे आंबे डोळ्यायसमोर नाचावले लागतेत. आमच्या गावाच्या पच्चिमेलं गावाले लागुन गावचा तरा आहे. या त-यालं लागुनच आंब्याची अंबरायी !      अंबरायीत तीन च्यार पिढ्यायपासुन उभी असलेली वीस पंचवीस आंब्याची झाळं. आंब्यायले मोहर लागावले लागला का , या अंबरायीतून येणारा जाणारा वास घेतल्याशिवाय जात नोहता. या मोहराचा रस पिवाले मोहतेलच्या माशाही करपच्या करप घेवून येत. आमी पोरंबारं शाळा सुटली का त-याच्या पारीना अंबरायीत जावु. जाताजाता पारीच्या सदासावली मोळुन झोळपा बनवू. अना झोळप्यायना आंबे पाळु. या झोळप्यायचीबी मोठी गंमत ! कयीकयी झोळपा आंब्याले लागे पर आंबे नोहते पळत. कयीकयी झोळपा झाळावरच लटके त कयीकयी झोळप्याना झोळपाच पळे. झोळपे सरलेच त गोट्यायना आंबे पाळु.     आंबे पाळता पाळता झोळपे एकमेकालेबी लागत. हवा धुंदिना बारआंबे पळत हे आंबे कळु लागत असले तरी आमी आवळीना खावु. आंब्यायले पाळ पळावले लागला का दुपारी भर तपनीत आमी अंबरायीत जावु. घरचे तपनीत जावू द...

कचरामूक्त वर्ग

॰॰॰  कचरामूक्त वर्ग  ॰॰॰       विद्यार्थ्यांच्या ज्ञानउपासना ही वर्गात व शालेय परीसरात होत असते. याठिकाणी स्वच्छता ठेवून वर्ग व परीसर आरोग्यदायी बनवता येतो. ब-याचदा स्वच्छतेची  जबाबदारी विद्यार्थ्यांवर येवून पडते. माझ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीतही तेच घडले. वयोगट लहान असल्याने  वर्ग स्वच्छतेचा ताण मुलांवर येवू लागला. यातुन  काही मुले स्वच्छतेचा नंबर असलेल्या दिवशी उशिरा यायची . ही बाब माझ्या लक्ष्यात आल्यावर मी यावर उपाय शोधन्याचा प्रयत्न केला. शेवटि एक मार्ग सापडला. माझ्या वर्गात दहा बारा कागदि बकेट होत्या. त्या मी दोन मुलां एक याप्रमाने वाटुन दिल्या. त्याचा वापर कचरापेटी म्हणून करण्यास सांगितले. वर्गात जास्त कचरा हा मुलांच्याद्वारे कागदाचे तुकडे,पेन्सिलचे तुकडे इ.चा होतो. हा कचरा मुले प्रत्येकाला दिलेल्या कचरा पेटीत टाकु लागले. हा कचरा दररोज सकाळी गोळा केला जातो. त्यामुळे वर्ग न झाडता वर्ग स्वच्छ राहु लागला. लहान मुलांचे  दररोज वर्ग झाडण्याचे कष्ट वाचले. आता आठवड्यातून  दोन किंवा तीनदाच वर्ग लोटावा लागतो. त्यामुळे हे काम मुले आनंदान...

दगड (कविता )

०००   दगड   ०००   एक होतं दगड   थोडसं वेगळं   फिरे आपला गोल गोल   गल्लीतनं खोलखोल   एकदा झाली गंमत   बसली होती पंगत     पाऊस झाले सुरू   दगड लागले घसरु   धो धो पावसाने धुतला   चिखलात जाऊन रुतला..   ...............            गुलाब  बिसेन

भेट एका ध्येयवेड्याची

००० भेट एका ध्येयवेड्याची...०००     आमचे मित्र व  " गोपाळांची पोरं " या पुस्तकाचे लेखक श्री. अनिल शिणगारे सरांची आज भेट झाली. तशी सरांची आणि माझी भेट नेहमी होत असते परंतु मनसोक्त गप्पा मात्र आज पहिल्यांदा झाल्या.सरांच्या घरी आज अनौपचारीक गप्पा रंगल्या. सरांनी गोपाळांच्या पोरांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केलीय.    सरांसोबत लेखनविषयक मनमोकळी चर्चा झाली.सरांचे सुरू असलेले लेखन कार्य यातून जाणून घेता आले.या चर्चेतून सरांकडुन मला काही टिप्सही मिळाल्या. याचा फायदा माझ्या भावी लेखनात नक्की होईल.......गुलाब बिसेन।

शाळेत आली खारूताई

००० शाळेत आली खारूताई ००० आज शाळेत निकालाचे काम करत असताना शेजारच्या व्हरांंड्यात बालवाडीतील चिमुकल्यांंचा गोंंगाट अचानक कानावर आला. " खारू ताई , खारू ताई. "  बाहेर काय चाललय हे बघायला मी बाहेर आलो तर मुलांंनी गलका केला होता. जवळ जावून बघतो तर एक गुबगुबीत खारूताई जणू मुलांंसोबत खेळत असल्याचा भास झाला. शाळेच्या अवतीभवती आंंबा , फणसाची गर्द झाडी असल्याने त्यावर खारूताईच्या अख्य्या कुळाने संंसार थाटलाय.   त्यामुळे खारूताईचे दर्शन नित्याचेच आहे. एका झाडावरून दुसर्‍या झाडावर , एका फांंदिवरून दुसर्‍या फांंदिवरचा प्रवास नित्याचाच. परंंतु ती आज जणू नविन शाळेत दाखल व्हायच्या इच्छेने मुलांंच्यात येवून बसली होती. आणि म्हणत होती , " सर , इतर मुलांंसारखंं माझा पण फोटो घ्या. मीपण  मुलांंसोबत शाळेला येणार. शिकुण मोठी होणार ! " माणसाच्या वस्तीजवळ राहुन तिलापण कळले असावे की शिक्षणाशिवाय प्रगती नाही. शिकलेल्यालाच जगात किंंमत आहे. अशिक्षिताला कवडीची किंंमत नाही. आणि आजपर्यंंत जगात मोठी झालेली माणसे शिक्षणानेच मोठी  झालेत. सावित्रिबाई व जोतिराव फुलेंंनी दिलेला शिक्षणाचा संंदेश तिनेह...

काटेरी करवंद

००० काटेरी करवंंद ००० जेवण आटोपून दुपारची विश्रांंती सुरू होती. एवढ्यात एक आरोळी कानावर आली , " करवंंद घ्या करवंंद ." बाहेर येवून बघतोय तर एक पन्नाशीतील बाई करवंंदांंची बुट्टि डोक्यावर घेवून , भर उन्हात गल्लोगल्ली फिरून करवंंद विकत होती. शेजार्‍यांंनी हाक देताच ती आमच्या दारात येवून सावलीला बसली. शेजार्‍यांंनी वीस रूपयांंची करवंंद घेतली. काळ्या रंंगाची आंंबट गोड करवंंद बघुन मलाही राहावले नाही.  मीही दहा रूपयाची करवंंद घेवून दारातच खात बसतो. करवंंद खाता खाता मी त्या बाईला विचारले , " मावशी , तुम्ही एवढि करवंंद कधी काढल्यात ?" माझ्या प्रश्नाने ती बाई थोडी  बोलती झाली आणि सांंगु लागली. " घरातली दोन माणसंं दिवसभर उन्हाचंं करवंंद काढत्यात. करवंंदासाठी गावापासुन बरेच लांंब जावे लागते. आज आणलेली करवंंद एक माणूस दुसर्‍या दिवशी  विकायला आणतो. भर उन्हाचंं दारोदार फिरून करवंंद विकावी लागतात. दिवसभराच्या तीन माणसाच्या कष्टात चार पाचशेचा रोजगार होतोय. मध्ध्येच पाउस पडला तर करवंंद बाद होत्यात. त्यामुळंं पाउस नाही तोवरच रोजगार करून घ्यावा लागतो."  मावशी आपला रोजगार सा...

वृत्ती आणि प्रवृत्ती

००० वृृत्ती आणि प्रवृृत्ती ००० रस्त्याने चालत असताना माझी नजर एका भिंंतीवर पडली. येताजाता घरांंच्या भिंंती सर्वांंनाच दिसतात. यात एवढे काय विशेष ? ही भिंंत होती वृृत्ती आणि प्रवृृत्ती यातील फरक अधोरेखीत करणारी ! एका साध्या भिंंतीवर एका चित्रकाराने आपल्या अंंगचे सर्व कौशल्य पणाला लावून.... पैशांंचा मोबदला घेवून.... एका कंंपनीची जाहीरात केली . त्या जाहीरातीमुळे या अडगळीत वाटणार्‍या भिंंतीलाही सौंंदर्य प्राप्त झालंं. हे काम एका चांंगल्या वृृत्तीनंं केलंं.  बरेच दिवस ही भिंंत सुंंदरतेचा आनंंद घेत डौलाने उभी होती. कालांंतराने भिंंतीच्या सौंंदर्याला ग्रहण लागलंं. भिंंतीवर  शेणा मातीचे डाग दिसायला लागले. ग्रहनावेळी चंंद्रही कुरूप दिसायला लागतो. तसेच या भिंंतीचेही झाले. थोड्या दिवसातच सुंंदर भिंंत कुरुप भिंंतींंच्या पंंक्तित जावून बसली. ही कामगीरी एका प्रवृृत्तीने केली. असेच दृृश्य रस्त्यांंवरील दिशादर्शक फलक , कि.मी.च्या दगडांंवरील मजकुर , किल्ल्यांच्या भिंंतींच्या  बाबतीतही घडताना दिसतात. एखाद्या वस्तुत रंंग भरायला अधिक वेळ लागतो का रंंगाचा बेरंंग करायला अधिक वेळ लागतो ? ...

जिवन फुलवणारे झाड

निसर्ग शिकवण...भाग- ६ ०©० जीवन फुलवणारे झाड ०©० झाड.... निसर्गाने माणवाला दिलेला एक वरदाण. माणसाच्या प्राथमिक गरजांपासून ते भौतिक गरजा भागवणारा एक सच्चा साथी. माणसानं माणसाची साथ जरी सोडली तरी झाड मात्र शेवटच्या क्षणापर्यंत अगदि माणसाची राख होईपर्यंत साथ देतो. एवढि लांब पर्यंत साथ इतर कुणाचीही माणसाला मिळत नाही. जिवण जगण्यासाठी , जीवांमध्ये प्राण फुंकण्यासाठी आवश्यक असणार्‍या प्राणवायूचे समृद्ध साठे या झाडांकडे आहेत. पाऊस अडवून पृथ्वीवर नवजिवण फुलवण्याचे काम तो करतो.जमिनिवर पडणार्‍या पावसाला सजिवांसाठी धरतिच्या कुशीपर्यंत पोचवण्याचे काम झाड करतो. धरतीच्या कुशीत पोचलेलं हेच पाणी धरती आपल्या लेकरांना वर्षभर पाजत असते. झाड सजिवांना शितल छाया देतो. प्राणवायूचा मुख्य स्रोत झाडच आहे. फळे , फुले , पाने आणि लाकडे असे आपले सर्वस्व तो माणवाला अर्पण करतो. मानवी जीवनात झाडाचे अनन्यसाधारण महत्व आहे. झाडांशिवाय जिवसृष्टिची कल्पनाच करता येणार नाही. अशा ह्या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे तो जेवढा वर वाढतो किंबहुणा त्यापेक्षा किंचित जास्तच तो जमिनिच्या पोटात मुळ्याच्या रूपात आपला जमिनिवरील भार सांभा...

काळ्या गोर्‍याचा भेद

०©० काळ्या गोर्‍याचा भेद ०©० दुपारचे अडिच वाजले असतिल. मुले जेवन आटोपून मैदानावर खेळत होती. मि शाळेच्या बागेतील झाडांचे निरिक्षण करत पुढे पुढे जात होतो. मधेमधे मुले माझ्याजवळ यायची आणि मी काय करतोय हे बघुन खेळात मग्न व्हायची. मी पुढे पुढे सरकत असताना चार ते साडेचार वर्षाची शाळेशेजारची एक चिमुरडी माझ्याजवळ येवून माझे निरिक्षण करू लागली. मी झाडांचे आणि ति माझे निरिक्षण करत होतो. मि पुढे सरकत असताना ति मला म्हणाली , " सर , तुमचे हात गोरे आहेत." मि न ऐकु आल्यासारखे करत परत विचारले , " काय गं ? " ति , " सर , तुमचे हात गोरे आहेत."  " पिलु , तुझेपण हात गोरे आहेत."  मी म्हणालो. माझे वाक्य संपताच ति हसायला लागली आणि मुलांच्यात खेळायला निघुन गेली. मुळात मी गोरा म्हणण्याएवढा गोरा किंवा काळा म्हणण्याएवढा काळाही नाही. मग ती असं का बोलली असेल ? तिच्या बालमनात हा भेद कसा काय निर्माण झाला असेल ? तीने केलेल्या छोट्याशा विधानाने माझ्या डोक्यात सुरू झालेले विचारचक्र काही थांबता थांबेना. एवढ्या लहान , निरागस , अजुन शाळेतही प्रवेश नसलेल्या चिमुकलीने ...

श्रमसंस्कार - बागकाम

श्रमसंस्कार - बागकाम आॅगष्ट महिण्यात शाळेच्या आवारात लावलेली फुल झाडे व शोभेची झाडे , पावसाळाभर पाणी पिऊन आता स्वत:च्या पायावर उभे झालेत. काहि झाडं वाढली तर काहि झाडं फुलली. वाढलेली व फुललेली झाडे बघुन मन अगदि प्रसन्न होते. झाडांची देखभाल आम्ही मुलांच्या मदतीने करतो. झाडांतील तण काढणे , पाणी घालणे हि कामे मुलेच करतात. त्यामुळे मुलांना झाडांविषयी आपुलकी वाटले. मुले झाडांची काळजी घेतात. त्यांचे नुकसान होण्यापासून रक्षण करतात. ऐन पावसाळ्यात झाडे लावल्याने झाडे चांगली वाढलित.सततच्या पावसामुळे झाडांना पाणी घालायची गरज पडत नव्हती. दिवाळी सुट्टिनंतर पाऊस गेल्यामुळे मुलांनी झाडांना पाणी घालायला सुरूवात केली. पण तिव्र उतारामुळे पावसाळ्यात झाडांभोवतीची माती वाहुन गेल्याने पाणी काहि थांबेना. हि समस्या घेवून मुले माझ्याकडे आले. तेव्हा मि त्यांना झाडांभोवती आळे करण्याचा सल्ला दिला. सोबत प्रात्यकक्षिकही करून दाखवलं. मग काय ... हि मंडळी लागली कामाला. प्रत्येकाने दोन दोनच्या गटात सर्व झाडांना आळे केले. आता पाणी आळ्यात थांबून झाडाभोवती मूरते. त्यामुळे झाडे चांगलीच तरारलित....... गुलाब बिसेन (९...

चिरजिवी वसुंधरा

चिरंजिवी वसुंधरा " हिरवे हिरवे गार गालीचे , हरीत तृणाच्या मखमालीचे "  या बालकवींच्या कवीतेतील ओळींप्रमाणे रिमझीम रिमझीम सरी बरसायला लागताच वसुंधरा हिरवा गालीचा होवून जाते. ति हिरवा शालु नेसुन नखशिखांत नटते. वसुंधरेचे हे लोभसवाने रूप डोळ्याचे पारणे फेडते. या वसुंधरेचा मुख्य अंग वृक्ष आहे. अगदि अश्मयुगापासून झाडे हे माणवाचा आधार आहेत. या वृक्षांनिच मानवाचे जिवण फुलवले. वैदिक काळापासून झाडे हे माणवाला पुजनिय आहेत. वडसावित्रीला वडाची पूजा केली जाते. देवाला विविध झाडांची पाने , फुले व फळे अर्पिली जातात. शुभकार्याप्रसंगी आंब्याच्या पानांचे तोरण दारात लावले जाते. श्रीफळ म्हणून नारळ देवाला वाहीली जातात. असे प्रत्येक धर्मात , पंथात वेगवेगळे वृक्ष पुजणिय आहेत. आजही या परंपरा टिकुन आहेत. असे हे वृक्ष संपूर्ण माणवी जिवण व्यापून आहे. मुळात मानव हा निसर्ग पूजक असून सृष्टितील प्रत्येक जिवाचा यावर अधिकार आहे . असे असले तरी कालौघात माणवाने या वसुंधरेचा एकमेव मालक मीच असल्याच्या आविर्भावात वावरत , सर्वांचे जिवण फुलवणार्‍या या वसुंधरेचा गळा आवळला आहे. माणव विज्ञान युगात गर्जाधिष्टिततेकडून स...

लेखांच्या लिंक

देशोन्नती लेख.. लिंक १) जागली - कथा Gondia Live, 22th Sept Gondia : readwhere http://deshonnati.digitaledition.in/m5/1366488/Gondia/22th-Sept-Gondia#page/6/1 २) शिक्षण प्रवाहातील आवश्यक बदल Gondia Live, 6th Oct Gondia : readwhere http://deshonnati.digitaledition.in/m5/1383955/Gondia/6th-Oct-Gondia#page/6/1 ३) मन प्रसन्न ठेवा Gondia Live, 10th Nov Gondia : readwhere http://deshonnati.digitaledition.in/m5/1425393/Gondia/10th-Nov-Gondia#page/6/1 ४) चिरंजिवी वसुंधरा Gondia Live, 24th Nov Gondia : readwhere http://deshonnati.digitaledition.in/m5/1442318/Gondia/24th-Nov-Gondia#page/6/1 ५)  तणावमूक्त शिक्षणाची गुरूकिल्ली Gondia Live, 08th Dec Gondia Live : readwhere http://deshonnati.digitaledition.in/m5/1459121/Gondia/08th-Dec-Gondia-Live#page/6/1

सर , आई काम लावत्या

०©० " सर , आई कामं लावत्या " ०©० शाळेचा परिपाठ संपवून मी घरचा अभ्यास तपासत होतो. एक एक करून मुले अभ्यास तपासायला येत होती. अभ्यास तपासून होताच जागेवर बसत होती. एवढ्यात अभ्यास तपासायला वेदिका आली. ती पुढे येताच मला आठवले. ती काल शाळा चुकवून घरी राहिली होती. ती पुढे येताच मी तिला विचारले ,  "वेदिका , काल शाळेला का आली नाहीस ?" वेदिका अनुत्तरीत. मी परत प्रश्न केला. ती परत अनुत्तरीत. मी परत प्रश्न केला. आता मात्र तिच्या डोळ्यातून पाणी वाहु लागले. अभ्यासात चांगली प्रगती असलेली वेदिका , शाळा कधीच चुकवत नव्हती. त्यामुळे काहितरी गंभीर असल्याचे ओळखुन मी तिला विश्वासात घेवून विचारू लागलो. तेव्हा ति म्हणाली , " सर , आई कामं लावत्या." मि , " घरातल्यांना कामात मदत करणं चांगलं आहे. घरकामात सर्वांनीच मदत करायला पाहिजे." ति  " सर , मी काल सकाळी घरी पाणी भरले. शाळेची तयारी केली. पण घरातली सर्व माणसे सुगी सुरू असल्याने शेतात जातात. जाताना आईने घरातील भांडी धुवायला दिली होती. ति धुताना उशिर झाल्याने मी शाळेला आले नाही." तिचा केविल...

प्रेरणा छोटि

०० प्रेरणा छोटि ... मोठे काम ०० काल मी सकाळची शाळा करून घरी आलो. मी घरी आल्याचे लक्षात येताच माझा दोन वर्षाचा मुलगा (भार्गव) " पप्पा , पप्पा " म्हणत ओरडु लागला. मी घरी आल्याचे बघुन तो खुप आनंदित झाला होता. मी दारात येताच तो त्याच्या मोडक्या तोडक्या भाषेत मला म्हणाला , " पप्पा , मी तुमच्यासाठी पाणी आणु ?" माझ्या चिमुकल्याचे हे शब्द ऐकुण मलाही थोडं नवलच वाटले. कारण लहान मुलं खायला खाऊ मागताना अधिक दिसतात. तो नेमकं काय करतो , हे बघण्यासाठी मी त्याला लगेच होकार दिला. माझी परवानगी मिळताच , तो स्वयंपाक खोलीत गेला आणि ग्लास शोधुन पाणी घेण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु उंचावर ठेवलेले पाणी त्याला घेता येईना. त्यामुळे त्याने त्याच्या मम्मीला बोलवून ग्लासभर पाणी घेतले आणि मला आणून दिले. पाणी पितच मी त्याचे कौतुक केले. त्यामुळे तो अधिकच खुष झाला. मुलांच्या चांगल्या कृतीचे वेळीच कौतुक केले तर मुलांना प्रोत्साहन मिळुन मुले चांगले काम करायला प्रेरीत होतात. आजची छोटिसी प्रेरणा उद्या मोठ्या कामाला जन्म देयील. हेच हा छोटासा प्रसंग सांगुन गेला..... .... गुलाब बिसेन (९४...

सुगरणिचं पिल्लु

०©० सुगरणिचं पिल्लु ०©० शाळा सुटायची वेळ झाली होती. मी मुलांना घरचा अभ्यास दिला. अभ्यास देवून होताच मुलांनी दफ्तर पाठिवर घेत घरचा रस्ता धरला. मी शाळेला कुलुप लावून त्यांच्या मागोमाग निघालो. मुख्य रस्त्यावर येताच मला मुलांचा दंगा ऐकायला आला. काय झाले हे बघायसाठी मी आवाजाच्या दिशेने बघितले तर रस्त्याच्या कडेला मुलांनी घोळका केला होता. " अरे धरू नको त्याला, चावल ते " " अरे धर , नाही चावत , बारकं हाय लेका.. एवढ्याला घाबरतोस व्हय !" " त्याला पाणी पाजुन , घरट्यात सोडुयाकिरं." मला मुलांचं काय चाललय काहि कळेना. म्हणून मी रस्त्याकडेला गाडी लावली आणि मुलांना बाजुला करत बघु लागलो तर एक सुगरणिचं पिल्लु ! नुकतचं उडायला शिकलेलं , रस्त्याकडेला भोपळ्या वेलीत पानांमध्ये लपण्याचा प्रयत्न करत होता. मुलांच्या दंग्याने तो पुरता घाबरला होता. मी जाताच मुलांचा गोंगाट कमी झाला. त्यामुळे तो थोडा शांत झाला. मि अवतीभवती सुगरण दिसते काय बघितले पण जवळपास कुठलाही पक्षी दिसला नाही. त्यानंतर मुलांकडे जवळपास सुगरणिचं घरटं आहे काय ? याची चौकशी केली. परंतु घरटे तिथुन बरेच लांब...

बांडगुळ

© निसर्ग शिकवण... भाग-५ © ०©०  बांडगुळ प्रवृत्ती  ०©० बांडगुळ हि एक परजिवी वनस्पती.....  दुसर्‍या वनस्पतींच्या जिवावर जगणारी म्हणून प्रसिद्ध आहे. हि वनस्पती अन्न पाण्यासाठी दुसर्‍या वनस्पतींवर अवलंबून असते. मोठ्या झाडांच्या खोडावर वाढुन आपल्या मुळ्यांद्वारे खोडातून अन्नाचे सोशन करते. स्वत: कोणतेही प्रयत्न न करता आयत्या अन्नावर ताव मारणार्‍या या झाडाच्या गुणांमुळे अशा प्रवृत्तीच्या माणसांना बांडगुळ म्हणून ओळखले जाते. अशाच स्वभावाच्या माणसांना म्हणजे दुसर्‍याच्या जिवावर जगणार्‍यांना समाजात बांडगुळाची उपमा दिली जाते. झाडावरील बांडगुळ वेळीच काढला नाही तर तो झाडाला वांझ करतो. बांडगुळ असलेल्या झाडाला फळं लागत नाहीत. कारण बांडगुळ झाडाची हि फळ धारण करण्याची शक्तीच नाहीशी करतो. बांडगुळ म्हणजे पालक झाडाला लागलेली किडच असते. तो पालक झाडाचे अन्न पाणी स्वत: सोशून घेवून स्वत: फोफावतो , वाढतो आणि समृद्ध होतो. मात्र पालक झाडाला दिवसेंदिवस कमजोर करत जातो. त्याची फळे देण्याची शक्ती क्षीण करतो. बांडगुळ  हे पालक झाडातील अन्न पाणी शोशून घेतो आणि त्याला कमकुवत करतो. माणसांमध्...

मन ठेवा प्रसन्न

मन ठेवा प्रसन्न. " जगी सर्व सुखी असा कोण आहे , विचारें मना तुची शोधूनी पाहे."  असे समर्थ रामदासांनी मनाचे श्लोकात म्हटले आहे. जगात सर्वात सुखी कोण आहे ? या प्रश्नाचे उत्तर व्यक्तिपरत्वे वेगवेगळे असेल. कुणी म्हणेल श्रीमंत व्यक्ती सुखी आहे. कारण त्याच्याकडे खुप पैसा असतो. श्रीमंती त्याच्या सभोवती नांदत असते. तर कुणाच्या मते गरिब व्यक्की सुखी आहे. कारण तो उद्याची काळजी करित नाही. परंतु खरच श्रीमंत व गरिब व्यक्ती सुखी असतील का ? श्रीमंताच्या घरी लक्ष्मी नांदते. घर , गाडी , फर्निचर , दागिणे , घरि नोकरचाकर अशी भौतिक सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. एवढ्या सर्व सुख सोयींनी सुसज्ज घरातील माणुस सुखी असेलच असे छातीठोकपणे सांगता येत नाही. कारण उद्याची काळजी श्रीमंतालाही असतेच. गरिबाचेही अगदि तसेच असते. गरिबाच्या घरात भौतिक सोयी सुविधांची वानवाच असते. त्याची जिवण जगण्याची लढाई अखंडित सुरू असते. उद्या चुल पेटुन भाकरि कशी मिळेल या विवंचनेत तो असतो. पैशामुळे थोड्याप्रमाणात भौतिक सोयी सुविधा आपल्याला मिळवता येत असल्या म्हणून त्याला खरे सुख म्हणता येयील का ? त्यामुळे खरा सुखी कुणाला...

शिस्तबद्ध , चिवट मुंगी

© निसर्ग शिकवण... भाग-३ © ००० शिस्तबद्ध , चिवट मुंगी ००० निसर्ग चक्रातील चिमुरडा किटक म्हणजे मुंगी. रात्रंदिवस कामात व्यस्त राहणे हा तिचा स्वभाव. दुसर्‍याकडे लक्ष न देता आपल्या कामात व्यस्त असणारी मुंगी कुणी कळ काढलिच तर चावायलाही मागे पुढे बघत नाही. भल्याभल्यांना अस्मान दाखवायची ताकद इवल्याशा मुंगीत आहे. हत्ती आणि मुंगीची गोष्ट सर्वश्रुतच आहे. अशी हि मुंगी सुगीच्या दिवसात आपल्या वारूळात अन्न गोळा करून ठेवण्याचे काम करत असते. हे काम अगदि सिस्तबद्धपणे चाललेलं असते. मुंगी सहज जरी चालत असली तरी एखाद्या सैनिकांच्या पलटनिप्रमाणे शिस्तबद्धपणे त्या चालत असतात. अन्न गोळा करताना आपल्यापेक्षा जड अन्नाचा कणही ति सहजपणे पेलते. यासाठी तिच्या हिमतीला दाद द्यावी लागेल. इवल्याशा मुंगीचा जिव जड अन्नाच्या कणाच्या वजनाने सहज जावू शकते पण मुंगी मात्र हे काम आपल्या हिमतीच्या जोरावर लिलया पार करते. काडीकचर्‍यातून अनेक अडथळ्यांशी दोन हात करत ति आपले अन्न निवार्‍यापर्यंत पोचवते. मुंगीवर एखादे संकट कोसळल्यावर ति ज्या धैर्याने त्याला सामोरे जाते त्याला तोड नाही. संकट येताच सर्व मुंग्या एक होवून त्याचा ...

एकाग्रतेचा प्रतिक बगळा

© निसर्ग शिकवण... भाग - ४ © ०©० एकाग्रतेचा प्रतिक बगळा ०©० बगळा ... पांढर्‍या रंगाची उपमा द्यावी ती बगळ्यालाच. अन्नाच्या शोधात सकाळी बाहेर पडणारा व सायंकाळी घरट्याकडे परतणारा बगळ्यांचा शिस्तबद्ध थवा बघितला कि सैनिकाची एखादि तुकडीच संचलन करतअसल्याचा भास होतो. आकाशात विहार करणारे बगळ्यांचे मनोहारी दृष्य डोळ्यांना शितलता देतात. एखाद्या शांतीदुताप्रमाणे बगळ्याचा थवा पांढरा रंग लेवून जगाला जणू शांततेचा संदेश देत फिरत असतो. जगाला शांती संदेश देणारा बगळा शेतकर्‍याचा सच्चा मित्र आहे. बगळा शेतातील पिकांवरील किडे खातो. किडे खावून शेतकर्‍याच्या पिकांचे रक्षण करतो. बगळा किड्यांना पिकांचे नुकसान करण्यापासून वाचवतो. शेतकर्‍याच्या सच्च्या मित्राप्रमाणे शेतात डोलणार्‍या पिकांची जणू राखणच करतो. बळीराजाला धनधाण्याने समृद्ध करण्यात खारीचा वाटा उचलतो. अन्नासाठी माशांची शिकार करणारा बगळा शिकारीची वाट बघत पाण्यामध्ये एकाग्र होवून शरिराची कोणतीही हालचाल न करता बराच वेळ शांत उभा असतो. शिकार आपल्या टप्प्यात येईपर्यंत तो आपली एकाग्रता टिकवून ठेवतो. शरिरावर आणि मनावर ताबा ठेवतो. शिकार आपल्या टप्प्यात ये...

वसतिगृह आणि छ. राजर्षी शाहु महाराज

वसतिगृह आणि छ. राजर्षी शाहू महाराज " विद्येवीना मती गेली । मतीविना नीती गेली ।।  नीतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले ।।  वित्ताविना शुद्र खचले । इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।"      असे म्हणत महात्मा जोतिराव फुलेंनी संपूर्ण महाराष्ट्रात ज्ञानज्योत पेटवली. आणि या ज्ञानज्योतीला तेवत ठेवून घराघरात पोचवण्याचे काम केले ते कोल्हापूर संस्थानच्या लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी. शिक्षणाशिवाय गरिबांचा , शूद्रांचा उद्धार होणार नाही. दिनदुबळ्यांचे दिवस पालटायचे बळ हे फक्त शिक्षणातच आहे. हे त्यांनी ओळखले. शूद्रांना माणसात आणायचे असेल तर शिक्षण हा एकमेव उपाय आहे. हे त्यांनी जाणले. यासाठी त्यांनी पहिल्या महायुद्धाच्या काळात  " गाव तिथे शाळा " अशी घोषणा करून गावागावात शाळा उघडण्याचा सपाटाच लावला. यासाठी त्यांनी लोकांना विश्वासात घेतले. त्यांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले. शाहूमहाराजांनी समाजातील अंत्यजापासून ते वंजार्‍यापर्यंत सर्वांच्या शिक्षणाची सोय केली. त्यांना स्वत:च्या हक्कांची जाणिव करून देण्याचे मोलाचे कार्य राजर्षी शाहुंनी केले. राजर्षी शाहु महारा...

शिक्षण प्रवाहातील आश्वासक बदल

 ०० शिक्षण प्रवाहातील आश्वासक बदल ००                                                                                       शिक्षण हि एक अखंडित आणि कायम प्रवाहीतपणे चालणारी प्रक्रिया आहे. आईच्या गर्भातून सुरू झालेली ही प्रक्रिया आयुष्याच्या अखेरपर्यंत न थांबता अविरत सुरू असते. काळानुरूप बदलणे हा माणसाचा स्थायिभाव आहे. काळाबरोबर बदलणाराच काळाबरोबर टिकु शकतो. त्यामुळे बदलत्या काळानुसार शिक्षण प्रवाहात बदल होत असतात. पुराणकाळात गुरूंच्या आश्रमात जाऊन गुरुकुल पद्धतीने शिक्षण घ्यावे लागायचे. कालांतराने त्यात बदल होवून औपचारीक शिक्षण देणार्‍या शाळा स्थापण झाल्या. आणि शाळांतुन शिक्षणाची सुरूवात झाली.   काळ जसा बदलत गेला , तसे शिक्षणाच्या प्रक्रियेतही अनेक बदल होत गेले. पूर्वी शिक्षकांनी शिकवायचे आणि विद्यार्थ्यांनी शिकायचे हा प्रवाह बराच काळ टिकून राहिला. बालक हा ...

जागली

 ० जागली ००           " शांता , मी बांद्यायवर जावून रायलो. "  सेवक ताटावर बसल्याबसल्या हात धुतच चिल्लवला. तशी वाळीत लसणा - कांद्याचे वापे कोळपत बसलेली शांता वापे कोळपावचा  सरूता तेतीच ठेवत घाईघाईना धावतच आली. अना पाण्याची डबकी भरू लागली.शांता सोनेखारीच्या पाटलाची पोरगी ! सेवकसंगा लगण झाल्यावर सितेपारात आली. आज लग्नालं पंचीस साल झाले. सेवकघरी तशी गरीबी होती. पर तिना कयी बापाघरची पाटेलकी दाखवलन नायी. ती सेवकच्या खांद्याल खांदा लावून संसाराचा गाळा चालवत रायली. गरीबीचे दिवसायलं सुखाच्या दिवसात बदलवासाठी ते नवर्‍यासंगा मोठ्या नेटाना कष्ट करत होती. कयी कयी सेवकसंगा नायी पटलां तं ती झगळे , पर सकाळचा झगळा संध्याकाळवरी विसरून जाय. संसारात कमी जास्त तं होतच रायते. संसार मनलाका भांड्यालं भांडा लागतेच. एवळ्यात तिना पाण्याची डबकी भरून तिच्यासंगा एक ईस्टिलचा गिलास देत सेवकलं मनावले लागली , " आज नयझरीचा बजार आये. बांद्यावरून लवकर येजाल. बजाराले जावून तेवळी किलोभर वारली मिरची घेवून येजा. " तसा सेवक तिच्या हातातली पाण्याची डबकी घेवून मान हालवत बांद्यायच्य...

मी पाहिलेला कार्व्हर

॰॰  मी पाहिलेला कार्व्हर  ॰॰      जाॅर्ज वाशिंग्टन काॅर्व्हर , अमेरीकन जागतिक किर्तीचे संशोधक. ज्यांनी शेंगदाण्यांवर संशोधन करून त्यापासून शेकडो खाद्यपदार्थ तयार करून दाखवले. अशा या संशोधकाने अत्यंत हलाखिच्या परिस्थितीत संशोधन करून सर्वसामान्य जनतेची अन्नाच्या कमतरतेपायी होणारी उपासमार थांबवली. असाच एक अवलीया संशोधक महाराष्ट्राच्या पूर्व टोकावर असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील नांदेड या छोट्याशा गावात आपले संशोधन कार्य नेटाने करतो आहे. या महाराष्ट्रियन कार्व्हरचे नाव आहे दादाजी खोब्रागडे. त्यांची भेट २०११ साली नागपूर - कोल्हापूर या रेल्वे प्रवासादरम्यान झाली. दादाजी खोब्रागडे हे वारणानगर येथे वारणा उद्योग सममुहामार्फत आयोजित कृषी प्रदर्शनात विशेष अतिथी म्हणून जात होते. मी गाडीत बसलो असताना मला धोतर , सदरा व डोक्यावर गांधी टोपी घातलेले सुमारे पासष्ट ते सत्तर वर्ष वयाचे गृहस्थ माझ्या शेजारच्या सिटवर बसलेले दिसले. त्यांना बघुन मु बुचकळ्यात पडलो. त्यांना यापूर्वी कुठेतरी बघितल्याचे मला वाटले. क्षणार्धात मी त्यांच्याविषयी वर्तमानपत्रात वाचल्याचे लक्षात ...

अपप्रवृत्ती

© अपप्रवृत्ती © दिवाळी सुट्टित कामानिमित्त गोंदियाला जाणे झाले. तिरोड्यावरून जाण्यासाठी मी बस ऐवजी रेल्वेचा पर्याय निवडला. गोंदियाला रेल्वेने जाण्याची मौज काही औरच ! रस्त्याच्या दोन्हीकडे निसर्गाची मुक्तहस्ते उधळन बघताना मला खुप आनंद होतो. त्यात मेमोने जाण्याची मज्जाच न्यारी ! मेमोचा प्रवास वेळ आणि पैसेही वाचवतो. त्यात बरेच दिवस मेमोचा प्रवास केला नव्हता. तिरोडा स्टेशनमध्ये मेमोत पाय ठेवला. बघतो तर मेमो सगळी मोकळी. मोकळी म्हणजे मोकळी नव्हेच . तर मेमोमध्ये उभे राहायला भरपूर जागा होती. बसायला मात्र एकही सिट नव्हती. नागपूरवरून येणार्‍या प्रवाशांनी सिट फुल्ल होत्या. पण उभे राहायला भरपूर जागा मोकळी असल्याने आम्ही गाडी मोकळीच समजतो. कारण या गाडीत पाय ठेवायलाही जागा शिल्लक राहत नाही. गाडीने स्टेशन सोडलं. मी एका आधाराला धरून उभा होतो. एवढ्यात बारा तेरा वयोगटातली तीन मुलं एकामागोमाग पुढुन येताना मला दिसली. संपूर्ण अंग घाण लागुन कोळशासारखं काळं पडलेल. त्यांच्या अंगाचा घाण वास त्यांच्या मागोमाग घमघमत होता. त्यांनी आंघोळ कधी केली होती त्यांनाच माहित. अंगावर नुसती पॅंट आणि अंगातला शर्ट काढुन क...

कारागीर कोळी

© निसर्ग शिकवण...भाग-२ © ००० कारागीर कोळी ००० विणकाम कारागीरीतील वस्ताद म्हणजे कोळी. रात्रंदिवस विणकाम करणारा कोळी जाळं विणतो.आपल्या शरिरातील स्रवणार्‍या विशिष्ट द्रवाच्या सहाय्याने तो आखिवरेखीव विणकाम करतो.जाळं विणता विणता तो असंकाही कारागीरी करतो कि या जाळ्यातून शत्रूला सुटका करणे अशक्य होवून जातं. कोळ्याचे संपूर्ण जिवण त्याच्या जाळ्याभोवती फिरत असते. खाणे पिणे उठणे बसणे इत्यादि इत्यादि. जागा मिळेल तिथे आपली विणकाम कला बहरवण्याचे काम तो करत असतो. माणसांचा वावर नसलेल्या घरात तर ते अधिकच जाणवते. दोन चार दिवस घरी माणसं नसली कि कोळ्यानं जाळं केलच म्हणून समजा. जाळं विणून सावज टिपणार्‍या कोळ्याला अन्नासाठी अनेक दिवस उपवास सोसावा लागतो. त्याला अन्नासाठी जाळ्यात शिकार अडकण्याची अनेक दिवस वाट पहावी लागते. आणि सावज जाळ्यात अडकताच आपल्यापेक्षा आकाराने मोठ्या असणार्‍या शिकारीचाही तो फडशा पाडतो. परंतु यासाठी त्याला अनेक दिवस वाट पहावी लागते. यासाठी त्याला सहनशीलता दाखवावी लागते. शिकार कधी जाळ्यात अडकेल याची कोणतीच जाणीव किंवा शास्वती नसतानाही सहनशीलतेच्या बळावर तो अनेक दिवस विना अन्न पाणी ...

सुरवंटाचं फुलपाखरू होणं

© निसर्ग शिकवण...भाग-१ © ००० सुरवंटाचं फुलपाखरू होणं ००० फुलपाखरू..... एक सुंदर , सर्वांना आपल्या सौंदर्याने आकर्षित करणारं , सर्वांना हवहवसं वाटणारं...... लेखकांना लिहितं करणारं.... कवींची लेखणी बहरवणारं ... एक किटक ! सौंदर्य म्हणजे काय असतं हे त्याच्याकडे बघितल्यावर कळतं.... सुंदरतेचं सर्वोच्च शिखर म्हणजे फुलपाखरू.... याचा जन्म तेवढाच कष्टप्रद... वेदनादायी... जेवढं त्याचं सौंदर्य मोहक तेवढच त्याचं सौंदर्य प्राप्त करणं कष्टप्रद. टाकिचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही. याचीच प्रचिती हा फुलपाखरू करून देतो. अळीने अंड दिल्यापासून हा प्रवास सुरू होवून , अंड्यापासून सुरवंट , सुरवंटातून अळी , अळितूपासून कोष आणि कोषापासून फुलपाखरू.... हा प्रवास प्रेरणादायी असाच आहे. कुरूप सुरवंटातून सुंदर फुलपाखरू पर्यंतचा प्रवास माणसासाठी प्रेरक आहे. किळसवाणा सुरवंटाची आठवणही अंगावर काटा आणते. परंतु हा सुरवंट कुणाच्याही हिनवण्याला भिक न घालता आपला प्रवास सुरूच ठेवतो आणि एक दिवस सौंदर्याचे शिखर गाठतो. दैनंदिन मानवी जिवनातही अनेक अडचणी येत असतात , पावलोपावली हिनवणारी मंडळींचं टोळकं डिवचत असतो. ...

बाग चिमुकली

०० बाग चिमुकली , फुले उमलली ०० शाळेत येणारी बालके शाळेत मनाने रमावित व अध्ययन - अध्यापन प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी शाळेतील वातावरण हे आनंददायी असावे लागते. शाळेतील वातावरण आनंददायी व आकर्षक होण्यासाठी अनेक गोष्टिंची आवश्यकता असते. त्यापैकी एक म्हणजे शालेय बाग. ती छोटि असो वा मोठी. बाग आणि बागेतील फुलांनी लगडलेली फुलझाडे मुलांना शाळेकडे आकर्षित करतात. शाळेत अशीच बाग फुलवण्यासाठी आम्ही जुलै महिन्यात आम्ही फुलझाडे लावली. मुले झाडांची काळजी घेवू लागले. वरूणराजाच्या कृपेने आणि मुलांच्या प्रेमाने फुलझाडांनी वाढिला वेग धरला. बघता बघता सर्व झाडे जगली. वेळोवेळीघेतली जाणारी काळजी आणि मुलांना झाडांचा लागलेला लळा यातून झाडे फुलण्याच्या दिशेने जोमाने प्रवास करू लागली. झाडांनाही भावना असतात. हे विज्ञानाने सिद्ध केले आहे. झाडांना प्रेम दिलं तर झाडेही त्याला प्रतिसाद देतात. मायेने चांगली काळजी घेतली तर चांगली वाढतात आणि फुलतात. याचाच प्रत्यय आम्हाला आला. मुलांच्या मेहनतीने झाडे वाढली. पाऊस संपताच मुक्तहस्ते आपले रंग उधळु लागली. बागेतील छोटि छोटि झाडे फुलली. हे सर्व बघुन मन प्रसन्न होते......... ...

स्वच्छता भिनावी नसतात

००० स्वच्छता भिनावी नसानसात ००० काल  सायंकाळी  मित्रासोबत बाजारात फिरायला गेलो होतो. सोबत त्यांचा मुलगा व माझा मुलगा होता. बाजारात गेल्यावर खाऊचे दुकान दिसताच मित्राच्या मुलाने चिप्स घेण्यासाठी हट्ट धरला. त्यामुळे खाऊच्या दुकानातून चिप्स पॅकेट व माझ्या मुलासाठी बर्फि घेतली. दोन्ही वस्तू प्लॅस्टिक पॅकेटमध्ये असल्याने प्लॅस्टिक फाडुन दोन्ही मुलं आपापला खाऊ खावू लागले. थोडावेळाने खाऊन झाल्यावर मित्राने वेपर्सचे पाकिट तिथेच उघड्यावर न टाकता ते पाकिट घरी घेवून जाण्यासाठी गाडीच्या मिटरच्या खोबणीत ठेवले. हे दृश्य बघुन मला मनापासून खुप आनंद झाला आणि मित्राचा अभिमान वाटला. स्वच्छतेचे उपदेश करणारे उपदेशक गल्लोगल्ली सापडतील परंतु स्वच्छता नसानसात भिनलेली माणसे क्वचितच दिसतात. संत गाडगेबाबा , महात्मा गांधी यांनी लोकांना नुसता उपदेश न करता , आपल्या कृतीतून समाजाला स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. संत गाडगे महाराज तर किर्तनाचे मैदान स्वत: खराटा घेवून स्वच्छ करायचे. अशा थोर महात्म्यांचा वारसा लाभलेल्या आपण सर्वांनी स्वच्छतायुक्त जिवण अंगीकारल्यास समाज रोगमूक्त होण्यास मदत होईल... या थोरपुरू...

शुभेच्छापत्र

००० शुभेच्छापत्र ००० आज शाळेत गेल्यागेल्या इयत्ता ४ थी च्या तनिष्काने माझ्या हातात काही कागदं आणि पाकिटं दिली. मि म्हणालो " कुणी दिलय ? "   " सर , बादेवाडीच्या मुलांनी तुमच्यासाठी पाठवलय." ती म्हणाली. बादेवाडी ही माझी पूर्वीची शाळा. नोकरीची सुरूवात इथेच झाली. अनेक प्रयोग मी याच शाळेत केले आणि ते पूर्णत्वासही नेले. सलग नऊ वर्षे सेवा देवून मी नुकताच एप्रिल महिन्यात वेखंडवाडी शाळेत आलो. त्यामुळे बादेवाडीचे विद्यार्थी अजुनही डोळ्यासमोरून बाजुला सरलेले नाहीत. उत्सुकतेपोटि मी ती कागदं हातात घेतली आणि पाकिटं उघडली. पाकिटं म्हणजे काही दुकाणातून आणलेलं छापिल पाकिट नव्हे तर वहीचं पान फाडुन डिंकानं चिकटलेलं ! पाकिटात मुलांनी दसरा सणाच्या शुभेच्छा लिहून पाठवल्या होत्या.सद्द्या इयत्ता ४ थीत शिकणारी दिया बुरसे , करण पाटिल , कुणाल गवड , शुभम खोत , श्रावणी बुरसे या चिमुकल्यांनी चित्रकलेच्या वहीतील पाणावर छानसं हस्तलिखित भेटकार्ड करून पाठवलं होतं. प्रज्वल चिलेनी तर एक छोटेखाणी पत्र पाठवून भेटायला घरी येण्याचं निमंत्रणच पाठवलं. मागील नऊ वर्षाच्या बादेवाडी शाळेतील सेवेत अनेक ...

परिसर स्वच्छता

००० परिसर स्वच्छता ००० सततच्या पावसामुळे सगळिकडे हिरवे हिरवे झालं असतानाच शाळेच्या मैदानातील तणालाही उधान आले. मनसोक्त पाऊस पिऊन तोही चिव्यासारखा  वाढला. मैदानातील हे तण पावसामुळे काढायला अडचण झाली होती.काल पाऊस उघडुन ऊन पडल्याने मुलांनाही खेळण्याचा मोह आवरेणा. बिचार्‍या मुलांनाही सततच्या पावसामुळे वर्गात सण्याशिवाय गत्यंतर नव्हता. कालच्या उन्हामुळे मुले बर्‍याच दिवसांनी मैदानात खेळायला उतरली. थोळावेळ खेळून झाल्यावर मैदानातील तण काढण्याचे त्यांच्या मनात आले. मग काय ? क्षणाचाही विलंब न करता सगळे तण काढायला लागले. त्यांच्यासोबत मिही तण काढु लागलो. मुले हाताने तण काढत असल्याने मुळ्यांनी घट्ट जम बसवलेलं तण काढायला खुप कष्ट घ्यावे लागत होते. शेवटि निघेल तेवढा कचरा काढुन काम थांबले. संपूर्ण तण काढण्यात मुलांना यश आलं नाही. परंतु आपला परीसर स्वच्छ असावा ही भावना त्यांच्या बालमनात निर्माण झाली. त्यासाठी त्यांनी थोडेफार कष्ट करण्याची तयारी दाखवली . हेही काही कमी नाही. या छोट्याशा प्रसंगाने मुलांमध्ये स्वच्छता का करावी ? तिची खरेच गरज आहे का ? किंवा स्वच्छतेचा फायदा नेमका काय होतो ? आपल...

गुरू आणि सोहमची जोडी

००० गुरू आणि सोहमची जोडी ००० गुरू आणि सोहम .... आमच्या शाळेतील इयत्ता दुसरीत शिकणारी गोड जोडी. शाळेत नम्र वागणारे हे दोघं गावात आपला पराक्रम गाजवतात. त्यामुळे शाळेपेक्षा गावात अधिक फेमस. मी शाळेत हजर झाल्यावर पहिली तक्रार या गोडजोडीतील गुरूची. " सर , याला चांगला बडवा. घराम मोठ्यांना शिव्या देतोय. उलटं बोलतोय. चांगली अद्दल घडवा  थोड्याफार प्रमाणात अशीच तक्रार सोहमचीही. हि गोडजोडी गावात प्रसिद्ध आहे .... ति शिवी देणे , खोड्या करणे , उनाडक्या करणे, अभ्यास न करणे , गावातुन हुंदडण्यासाठी. अनेकांनी प्रयत्न करून बघितले त्यांना वळणावर आणायचे पण व्यर्थ ! अशा जोडीची माझ्याकडे तक्रार आल्यावर मलाही घाम फुटल्यागत झाले. यापूर्वीही असे अनेक प्रसंग मी हाताळले होते. त्यामुळे मुलांना मारून , दमदाटि करून प्रश्न सुटणार नाही. हे मला पक्के माहित आहे. मुले हि काही मातिचा गोळा नसतात कुंभारसारखं कसही घडवायला. तर प्रत्येक मुलाला स्वत:च मन , मेंदु असतो. त्याच्या सभोवति घडणार्‍या प्रत्येक घटनांचा तो आपल्या कुवतीप्रमाणे विचार करून अर्थ लावत असतो. त्यामुळे दोन्हींचा वेगळा विचार करणे गरजेचे होते. ; यापूर्व...

सर , मी स्वत: अभ्यास काढलाय

००० " सर , मी स्वत: अभ्यास काढलाय " ०००  आर्या ..... इयत्ता पहिलीत शिकणारी माझी विद्यार्थीनी. बोलायला गोड.. कायम हसतमुख ! शाळेत प्रवेश घेताना काहीशी गोंधळलेली..... काही दिवसात शाळेची सवय झाली. शाळेला इतरांपेक्षा काहीशी उशीरा येणारी पण शाळा न चुकवणारी. एक दिवस मी विद्यार्थ्यांचा अभ्यास तपासत असताना तिही घरचा अभ्यास (Homework ) दाखवायला आली. अभ्यास तपासायसाठी मी तिची वही हातात घेवून अभ्यास तपासु लागलो. अभ्यास तपासत असताना मला तिच्या वहीत अक्षरांमध्ये बदल दिसला. याबद्दल मी तिला विचारल्यावर तिने उत्तर द्यायचे टाळले. पहिलीला....नविन...असल्याने मीही त्याकडे दुर्लक्ष केले. थोड्या दिवसांनी परत अक्षरांत बदल दिसला. मी तिला परत विचारले ... ती परत अनुत्तरीत ! असा प्रकार दोन दिनदा घडला... वहीतील ते अक्षर पौढ व्यक्तीचे वाटत असल्याने मी त्याची सहनिशा केली. तेव्हा घरी थोडा अभ्यास पालकांनी काढुन दिल्याचे समजले.  हा प्रकार मुलांच्या अध्ययन प्रक्रियेत अडथळा निर्माण करणारा आहे..... पुढे पालकांकडून अभ्यास काढुन घ्यायची सवय हीतावह नाही. त्यामुळे मी नाईलाजाने तिच्यावर रागावलो आणि नंतर आपण आप...

श्रीगणेशा डिजीटल शाळेचा

॰॰॰ श्रीगणेशा डिजीटल शाळेचा ॰॰॰ विद्यामंदिर वेखंडवाडी शाळेत आल्यापासून सारखी एक रूखरूख मनाला लागुन राहीली होती. ती म्हणजे आधुनिक डिजीटल साधनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकता यावे याची. परंतु शाळेत संगणक , प्रोजेक्टर यांसारखे कोणतेच आधुनिक साधन उपलब्ध नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली. मी व माझे सहकारी दोघेही यासाठी धडपडत होतो. कुणा संस्थेला अर्ज कर तर कुणाची भेट घे. मंडळांना भेटलो. लोकवर्गणी जमवण्याचाही प्रयत्न केला. पण ही महागडी साधनं घ्यायला ते प्रयत्न अपुरे पडले. कुठल्याच बाजुने जुळवाजुळव होईना. शेवटि हा नादच सोडुन द्यावा असं वाटलं. कारण सर्व सोंग घेता येतात परंतु पैशाचं सोंग घेता येत नाही. पण माझं मन मला शांत बसु देत नव्हतं. सारखी शाळेतली निरागस मुलं डोळ्यासमोर दिसायची. त्यांनाही आधुनिक शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. आधुनिक काळात आधुनिक साधणांद्वारे शिक्षण मिळायलाच पाहीजे. तंत्रज्ञानाची विद्यार्थ्यांना ओळख होणे गरजेचे आहे. त्यांच्यासाठीतरी प्रयत्न चालु ठेवणे भाग होते.  आशेच्या किरणांभोवती सर्वत्र काळोख पसरलेल्या अशा निरूत्साही वातावरणात महाराष्ट्रातील तंत्रस्नेही मित्रांन...

कल्पक जुगाळ

कल्पक जुगाळ एप्रिल महिना सुरू होता. सर्वांची पेपर तपासणे , निकाल तयार करण्याची धावपळ सुरू होती. यावेळी मुलांचा अभ्यास हा काहीसा सिथील झाला होता. शाळेत मुले विविध बैठे खेळ.. मनोरंजक खेळ.. पुस्तक वाचन .... अवांतर लेखन अशा विविध गोष्टि करत. काही मुले आंबे , फणस , करवंद अशी फळे शाळेत आणून खात. असा एकंदरीत मजेत विद्यार्थ्यांची निकालापूर्वी गंमतशाळा चालली होती. अशाच एक दिवस माझ्या वर्गातील काही मुलांनी शाळेपाठीमागील आंब्याच्या झाडाच्या कैर्‍या तोडुन आणल्या. त्या कैर्‍या कापूण सर्व मुलांनी त्यात चटणी घालुण आस्वात घेतला. आंबे खात असतानाच मी मुलांना उंचावरील आंबे तोडण्यासाठी घरच्याघरी टाकावू वस्तुंपासून आंबे तोडण्याचे साधन बणवण्याची कल्पना सांगीतली. मुलांना ही कल्पना खुप आवडली. वर्गातील तीन चार मुले लगेच घरी गेली. साहित्याची जुळवाजुळव करून मी सांगितल्याप्रमाणे टाकावू साहित्यातून आंबे तोडण्याचे साधन बनवून आणले. मुलांच्या कल्पकतेला वाव दिल्यास त्यांच्याहातून नवनविन आविष्कार नक्की जन्म घेतील. यातूनच भविष्यातील संशोधक घडतील.......... गुलाब बिसेन (९४०४२३५१९१)

जिवन शिक्षण

००० जिवन शिक्षण ....... बुटाची लेस घालणे व बांधणे ००० शाळेत मुलांना मिळालेले बुट मुलांनी स्वातंत्र्यदिनी पहिल्यांदाच घातले. आज सर्व मुले शाळेत बुट घालुन आले. वर्गात बसतेवेळी बूट वर्गाबाहेर काढुन ठेवले. एखाद दुसरा मुलगा सोडला तर कुणी बुट वापरत नसल्याने कुणालाही बुटाची लेस बांधता येत नव्हती. त्यामुळे बहुतेक मुलांना घरच्यांनी बुट घालुन दिलेला होता. जिथे मुलांना चप्पल मिळणे जिकरीचे तिथे बुटांची वानवाच ! अशा मुलांना बुट घालायची सवय नसल्याने लेस बांधता येणे शक्यच नाही. त्यामुळे दुपारच्या सुट्टित मुलांना बुट घालताना मोठी अडचण झाली.लवकर जेवन उरकुण खेळायच्या तयारीत असलेल्या मुलांची संपूर्ण सुट्टि लेस बांधण्यातच निघुन गेली.लेस बांधुन दमलेली काही  मुले माझ्याकडे बुट घेवून आले. " सर , आमच्या बुटाची लेस बांधुन द्या." सगळी एका सुरात बोलली. मी बर्‍याच वेळापासून हा कार्यक्रम बघत होतोच. बुटाची लेस बांधायला कुणालाच जमेना.  त्यामुळे मी सर्वांना एकत्र घेतले आणि लगेच सर्वांना बुटची लेस बांधायचे प्रात्यक्षिक करून दाखवले. त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात निम्म्या मुलांना यश आले.त्यांच्यावर राहिलेल्...

सर , सिस्तात जावा

००० सर , सिस्तात जावा ०००   शाळेची घंंटा वाजली.... चिमुकली मुले शाळेला आली. शाळा मुलांंनी गजबजली. मुलांंबरोबर वरूण राजानेही दररोज हजेरी लावायला सुरूवात केली. कधी सर तर कधी दिवसभर रीपरीप तर कधी नुसताच ऊन सावल्यांंचा खेळ ! दिवसभर गार वारा आणि अधेमधे पावसाचे आगमण ! आजही असाच कार्यक्रम सुरू होता. ऐन शाळा सुटताना वरूनराजाने आपली हजेरी लावून निरोप घेतला. शाळेतील मुलांंसोबत मीही घरी जाण्यासाठी आवराआवर करू लागलो. लगबगीने रेनकोट घालून गाडीवर बसलो. गाडीला किक मारून , मुलांंचा निरोप घेवून निघणार ऐवढ्यात शाळेतल्या इ. ४थीतील गौरी , तनिष्का आणि इ.३ रीतील त्यांंच्या मैत्रीनी मला म्हणाल्या , " सर , सिस्तात जावा. " मुलींंच्या या अचानक आलेल्या सल्य्याने मी थोडा गोंंधळलो. क्षणभर गोंंधळलेल्या अवस्थेतच त्यांंचा निरोप घेवून पुढे आलो. गावाबाहेर आल्यावर आज झालेल्या बारीक पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याचे माझ्या लक्षात आले. मी गाडी हळूहळू चालवत वाट काढू लागलो. आता मला मगाशी मुली  " सिस्तीत जावा." अशा का बोलल्या , याचे गुढ उकलले. आपले शिक्षक घरी सुखरुप जावे यासाठी त्यांंनी दिलेला हा सल्ला ह...