शाळेत आली खारूताई
००० शाळेत आली खारूताई ०००
आज शाळेत निकालाचे काम करत असताना शेजारच्या व्हरांंड्यात बालवाडीतील चिमुकल्यांंचा गोंंगाट अचानक कानावर आला. " खारू ताई , खारू ताई. " बाहेर काय चाललय हे बघायला मी बाहेर आलो तर मुलांंनी गलका केला होता. जवळ जावून बघतो तर एक गुबगुबीत खारूताई जणू मुलांंसोबत खेळत असल्याचा भास झाला. शाळेच्या अवतीभवती आंंबा , फणसाची गर्द झाडी असल्याने त्यावर खारूताईच्या अख्य्या कुळाने संंसार थाटलाय. त्यामुळे खारूताईचे दर्शन नित्याचेच आहे. एका झाडावरून दुसर्या झाडावर , एका फांंदिवरून दुसर्या फांंदिवरचा प्रवास नित्याचाच. परंंतु ती आज जणू नविन शाळेत दाखल व्हायच्या इच्छेने मुलांंच्यात येवून बसली होती. आणि म्हणत होती , " सर , इतर मुलांंसारखंं माझा पण फोटो घ्या. मीपण मुलांंसोबत शाळेला येणार. शिकुण मोठी होणार ! " माणसाच्या वस्तीजवळ राहुन तिलापण कळले असावे की शिक्षणाशिवाय प्रगती नाही. शिकलेल्यालाच जगात किंंमत आहे. अशिक्षिताला कवडीची किंंमत नाही. आणि आजपर्यंंत जगात मोठी झालेली माणसे शिक्षणानेच मोठी झालेत. सावित्रिबाई व जोतिराव फुलेंंनी दिलेला शिक्षणाचा संंदेश तिनेही कुठेतरी ऐकला किंंवा बघितला असावा. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि तो पिणारा गुरगुरनारच हे तिने कदाचित प्रत्यक्ष बघितले असावे........ मी खारूताईची फोटो काढायची हौस पूर्ण करताच ती झपकण आपल्या घरी निघुन गेली. जणू तिला घरी जावून शाळेची तयारी करायची होती ! ......... गुलाब बिसेन (९४०४२३५१९१)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा