पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उपवासाचं खाणं

##  उपवासाचं खाणं  ## ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷ उपवास म्हणजे सर्वसामान्यांसाठीचा ईश्वरभक्तीचा सर्वात जवळचा आणि सोपा मार्ग. उपवासात होणारा शारिरीक आणि मानसिक त्रास हा तपच मानला जातो. प्रत्येक धर्मात कमी अधिक प्रमाणात उपवास केला जातो. उपवासाला जसे धार्मिक महत्व आहे. तसेच त्याचे वैज्ञानिक कारणही सांगितले जाते. रोजचे अन्न खाण्याने ठराविक अन्नधान्यावर ताण पडतो तो ताण कमी होण्याच्या उद्देशानेही उपवास केला जातो.  उपवास करण्याची रीत धर्मपरत्वे भिन्न आहे. तसे त्याची नावेही भिन्न आहेत. उपवास कुणी साधा तर कुणी कडक करतो. कुणी फलाहार करून , कुणी खिचडी खावून तर कुणी केवळ पाणी पिऊन करतात.  काही मंडळी आठवड्यातून ठरावीक दिवस तर कुणी सलग काही दिवस करतात. नवरात्रीत नऊ दिवस , श्रावणात सोमवारचा उपवास तर रमजानमध्ये सलग महिनाभर उपवास केले जातात. काही मंडळी संकष्टि , चतुर्थी , कुणाचा शनिवार तर कुणाचा मंगळवार. आठवड्यातला रविवार सोडला तर जवळ जवळ सर्वच वारांना उपवास केले जातात. यामागे प्रत्येक व्यक्ती आपल्या धार्मिक परंपरा किंवा आपल्या श्रद्धेनुसार उपवास करत असतात. उपवास करतेवेळी उपवासाचे व...

जुनी पेन्शन

##  जुन्या पेन्शनसाठी नविन कर्मचार्‍यांचा एल्गार  ## निवृत्तीनंतर निवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना संरक्षण देणारी १९८२ ची पेन्शन योजना शासनाने नोव्हेंबर २००५ पासून बंद करून अंशदायी पेन्शन योजना (dcps) शासनाने कायदा न करताच कर्मचार्‍यांवर लादली. हि योजना लागु होवून एक तप पूर्ण होवूनही या योजनेची कार्यवाही करण्याची पद्धत शासनाने अजुनही आखलेली नाही. याचा फटका नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या मयत व सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना बसत आहे. मयत कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांना कर्मचारी मयत होवून दोन दोन , तीन तीन वर्षे लोटुनही शासनाकडुन कुठलेही योजनेचे आर्थिक लाभ मिळालेले नाही. तसेच सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना सेवानिवृत्तीनंतर शासनाची महिन्याला मिळणारी पेन्शन तर सोडाच साधी एक दमडीही मिळालेली नाही. ज्या कर्मर्‍यांच्या जिवावर हे राज्य चालते. त्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. याचा सर्वात जास्त फटका २००५ नंतर सेवेत आलेल्या राज्य शासकिय व निमशासकिय तरूण कर्मचार्‍यांना बसत आहे. निवृत्ती वेतन हि भीक नसून कर्मचार्‍यांचा हक्क आहे. याच हक्कासाठी महाराष्ट्रात कर्मचार्‍यांनी १९८२ ची कुट...

गोपाल - एक आठवण

##   गोपाल.......एक आठवण   ## आमच्या शालेय दिवसात कुठेही एखादा कार्यक्रम असला ( उदा. लग्न , तेरवी , सपटा इ. ) कि , तिथे एका व्यक्तिचे दर्शन हमखास व्हायचे. ती व्यक्ती म्हणजे " गोपाल ".  साडे चार पाच फुटाचा , सळपातळ बांध्याचा , डोक्यावर मळकट पांढरी टोपी आणि मळलेला शर्ट , पॅंट घातलेला , महिनोनमहिने आंघोळ न केलेला गोपाल गावात आलाकी , त्याच्याभोवती लहान मुलांचा गलका व्हायचा. " गोपाल आला , गोपाल आला " असे ओरडत मुले संपूर्ण गावाला गोपाल आल्याची वर्दि द्यायचे. मिळेल ते खायचे आणि मिळेल तेव्हा खायचे , गावातील मंदिरात रात्र काढत परत पुढचा प्रवास सुरू करायचा. हाच त्याचा दिनक्रम असायचा. गावातील मुलांना बघायला मुलांची झुंबड उडायची. तो जिकडे जाईल तिकडे लहान मुलांची टोळकी जायची. मग कुणी त्याला डिवचण्याचा , त्याची टोपी काढुन घेण्याचा प्रयत्न करू लागला कि , गोपाल मग अस्सल पोवारीमध्ये शिव्या देत त्यांच्या सात पिढ्यांचा उद्धार करायचा. गोपाल गावात आला तर तो कुणाच्याही घरी जात नसे किंवा  पोटात भूक असली तरी तो कुणालाही खायला मागत नसे. त्यामुळे कित्येक दिवस त्याचा उपवास घडायचा. एखाद्य...

तान्हापोळा

# झाडीपट्टिचा लोकोत्सव .... तान्हापोळा  # :::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::: पोळा कास्तकारांचा कष्टकरी मित्र बैलांच्या उपकारातुन उतराई होण्याचा सण. या सणाला बैलांना सजवून , नटवू थटवून सवाद्य मिरवणूक काढली जाते. गावाबाहेर मोकळ्या मैदानात किंवा गावाच्या चौकात बेलांची विधिवत पूजा केली जाते. पारंपारीक झळत्या म्हणून पोळ्याची सांगता होते. घरी आलेल्या बैलांचे पूजन करून त्यांना पंचपक्वान्न खावू घातले जातात. हा बैल पोळ्याचा सण संपूर्ण राज्यात बळिराजा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पूर्व महाराष्ट्रात ( झाडीपट्टि ) बैल पोळा सणाला जोडुन  " तान्हापोळा "  साजरा केला जातो. पोळ्याचा दुसरा दिवस बच्चेकंपणीच्या आनंदाला उधाण आणणारा असतो. आठवडाभरापासून घराघरात तान्हापोळ्याची लगबग सुरू होते. बैलपोळ्याच्या दुसर्‍या दिवशी लहान मुले आपले लाकडी नंदि (बैल) सजवण्यात व्यस्त असतात. हे लाकडी नंदि घासून , पुसुन , धुवून स्वच्छ केले जातात. घरातील मोठी मंडळीही यात सक्रिय सहभागी असतात. लाकडी नंदिला रंगरंगोटि करून सजवले जाते. लहान मूल असलेल्या घरात खात्याकडुन (सुतार) ल...

आमरी माय

##  आमरी माय  ## :::::::::::::::::::::::::::::::::::::::::::: आमरी माय (आजी) बायाबाई. आंबा खानला मोठी पटाईत. माय आंबाकं घातं सकारी सकारी बांधिपर जायशान  खुलं टाकनला हवाधुंदलक पळ्या आंबा बेचशान आणं. अना तपनबेरा पावशी धरशान आंबा सिलन बसं. आंबा सिलता सिलता आंबा केतोबी आंबट रवनां , आंबिकी फोळी खायंबिगर  माय नोहती रवत. मायला आंबट आंबा खाता देख देखनेवालोका दात आंबत. पर मायका दात नोहता आंबत. आमरं मायकं डिक्सनरीमा बुधवार येव दिवस कवनलां नोहतो जमत. मायकं मामंसुसरोको नाव बु लका चालु होत होतो. ओनं जमानोना मामंसुसरोको नाव लेता नोहतो जमत , ओकलका माय बु लका चालु होणारा कोणताच नाव नोयती लेत. मंग मायला कबी बुधवार कवनको भयव तं माय कशी कवं ,....   " बळेगावकं बजारकं दिवस तोरो मामाजी गावं आवनको से."  ( मन्जे कोणतंबी वाक्य मा बुधवारकं जागं.... "बळेगावको बजारको दिवस " लगावं ) ओकलक आमी बळेगावको बजार कबी देख्या नयी पर बळेगावको बजार बुधवारं भरसे यव आमला पाठ भयगयेतो. आमरी माय शिकि नोहती पर देखाशिकिलक मायला कामपुरतो हिसाब तोंडपाठ करता आवं. माय जसी हिसोबमा पक्कि होती. तशी माय ...