बाग चिमुकली

०० बाग चिमुकली , फुले उमलली ००

शाळेत येणारी बालके शाळेत मनाने रमावित व अध्ययन - अध्यापन प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी शाळेतील वातावरण हे आनंददायी असावे लागते. शाळेतील वातावरण आनंददायी व आकर्षक होण्यासाठी अनेक गोष्टिंची आवश्यकता असते. त्यापैकी एक म्हणजे शालेय बाग. ती छोटि असो वा मोठी. बाग आणि बागेतील फुलांनी लगडलेली फुलझाडे मुलांना शाळेकडे आकर्षित करतात.

शाळेत अशीच बाग फुलवण्यासाठी आम्ही जुलै महिन्यात आम्ही फुलझाडे लावली. मुले झाडांची काळजी घेवू लागले. वरूणराजाच्या कृपेने आणि मुलांच्या प्रेमाने फुलझाडांनी वाढिला वेग धरला. बघता बघता सर्व झाडे जगली. वेळोवेळीघेतली जाणारी काळजी आणि मुलांना झाडांचा लागलेला लळा यातून झाडे फुलण्याच्या दिशेने जोमाने प्रवास करू लागली. झाडांनाही भावना असतात. हे विज्ञानाने सिद्ध केले आहे. झाडांना प्रेम दिलं तर झाडेही त्याला प्रतिसाद देतात. मायेने चांगली काळजी घेतली तर चांगली वाढतात आणि फुलतात. याचाच प्रत्यय आम्हाला आला. मुलांच्या मेहनतीने झाडे वाढली. पाऊस संपताच मुक्तहस्ते आपले रंग उधळु लागली. बागेतील छोटि छोटि झाडे फुलली. हे सर्व बघुन मन प्रसन्न होते......... गुलाब बिसेन (९४०४२३५१९१)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

कवलकी बंडी (नहानपनको खेल)

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा