पोस्ट्स

2026 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विद्यार्थ्यांच्या काव्यमय निर्मितीचा सुंदर अविष्कार - वायगावची बालकविता

इमेज
विद्यार्थ्यांच्या काव्यमय निर्मितीचा सुंदर अविष्कार - वायगावची बालकविता        गोंदिया जिल्ह्यातील सितेपार या गावचे आदर्श शिक्षक गुलाब बिसेन हे सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील वायगाव या शाळेत कार्यरत आहेत. त्यांची आजपर्यंत सात पुस्तके प्रकाशित आहेत. यात सृजनशाळा, खोपळीमाकी दिवारी, फिपोली, नवतरी, गावतर, बाबांची सायकल आणि वायगावची बालकविता या पुस्तकांचा त्यात समावेश आहे. त्यांना आजपर्यंत अनेक नामवंत साहित्य संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचा नुकताच वायगावची बालकविता हा त्यांच्या विद्यार्थ्यांचा संपादित केलेला बालकवितांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता व सृजनशीलतेला प्रोत्साहन देऊन त्यांनी त्यांच्याकडून काव्य निर्मिती करून घेतली आहे. ही बाब विशेष कौतुकास्पद आहे.         गुलाब बिसेन हे एक संवेदनशील साहित्यिक आहेत. त्यांनी आपल्या शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वनिर्मित कवितांना प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडून वेगवेगळ्या विषयावर काव्य निर्मिती करून घेतली आहे. या बालकाव्यसंग्रहात एकूण 26 कवितांचा समावेश आहे. यात झाड, फुल...

वाचनसंस्कृती रुजवणारा बालचित्रकथासंग्रह - वाचनगंध

इमेज
वाचनसंस्कृती रुजवणारा बालचित्रकथासंग्रह - वाचनगंध           लेखिका कवयित्री प्रीती जगझाप यांचे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून प्रकाशित झालेले "वाचनगंध' हे सुरेख असे पुस्तक. बालवयातल्या संस्कारक्षम वयामध्ये  मुलांना वाचन लेखनाची गोडी लागण्याची गोष्ट सांगणारे हे पुस्क. संपूर्ण सचित्र असलेले हे पुस्तक वाचकाचे लक्ष वेधून घेते. या पुस्तकातून आपला अथर्व आणि आरोही ही गावातील जिल्हा परिषद शाळेत शिकणारी गोड जोडी भेटते. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारी ही जोडी आपल्या अभ्यासातील हुशारीने सर्वांच्या कौतुकास पात्र होते.            आरोही आणि अथर्व हे दोघे नुसते अभ्यासातच हुशार नाहीत तर ते आपल्या अंगातील विविध कलागुणांमुळेही त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण करतात. आरोहीला कुंचला आणि रंगांच्या सहाय्याने सुंदर चित्रे रेखाटायला आवडतात. वाचनाची प्रचंड आवड असणारा अथर्व आणि आरोहीच्या वाचनवेडाचा परिणाम शाळेतील इतर विद्यार्थ्यांवर होऊन त्यांनाही वाचनाची गोडी लागते. संपू...

निरागस बालपणाचा सोबती - दोस्त ऋतू

इमेज
निरागस बालपणाचा सोबती - दोस्त ऋतू                 कथा, कविता, समीक्षा इत्यादी माध्यमातून बालसाहित्यात मोलाची भर घालणारे ज्येष्ठ बालसाहित्यिक विश्वास वसेकर यांचा बालमनाला भुरळ घालणारा "दोस्त ऋतू" हा बालकविता संग्रह नुकताच प्रकाशित झालाय. रंगीत चित्रे, आकर्षक मुखपृष्ठ आणि दर्जेदार कविता असलेला हा बालकवितासंग्रह बघताक्षणी कुणालाही भुरळ पडेल असाच आहे. या बालकवितासंग्रहाची शिर्षक कवितेने झालेली सुरुवात अत्यंत समर्पक असल्याचे कविता वाचल्यावर जाणवते. दोस्त ऋतू या कवितेत कवी आपल्या खास शैलीत ऋतुंचे वर्णन करताना लिहितात,  थंडी असते चक्क गुलाबी  हेमंताचा थाट रूबाबी  पानगळीचा रंग बदामी  ऋतूच्या अंतर्यामी                कळी आणि फूल यांच्यातील नातं तर अगदी हळूवार अलगडत कवीने कळी आणि फूलाचे नाते अधिक परस्पर जिव्हाळ्याचे केले आहे. त्याचे वर्णन वाचताना वाचकाला फुलांच्या विश्वात गेल्याची अनुभूती येते. बाळ झोपी जातो तेव्...

महाराष्ट्राच्या बालसाहित्याचा समग्र ज्ञानकोष 'चांदा ते बांदा’ समीक्षा ग्रंथ

इमेज
महाराष्ट्राच्या बालसाहित्याचा समग्र ज्ञानकोष 'चांदा ते बांदा’ समीक्षा ग्रंथ समीक्षक - गुलाब बिसेन मराठी बालसाहित्यातील एक संवेदनशील लेखक बबन शिंदे हे कथा - कवितांच्या माध्यमातून बालसाहित्यात आपले मोलाचे योगदान देत आहेत. त्यांनी लेखन करणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांच्या लेखनाचे संपादित ग्रंथ काढत लिहित्या हातांना बळ दिले आहे. महाराष्ट्रातील आघाडीचे बालसाहित्यकार बबन शिंदे यांची तीस पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या एकूण साहित्याला नामवंत संस्थाचे अठेचाळीस राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. अनेक कार्यक्रमातून ते कविता गाऊन आणि बहारदार कथाकथन करून श्रोत्यांची मने जिंकून घेतात. यापूर्वी त्यांचा 'मराठवाड्याचे बालसाहित्य आकलन आणि समीक्षा' हा समीक्षाग्रंथ प्रकाशित झाला आहे. त्यात मराठवाड्यातील एकूण पंचाहत्तर बालसाहित्यकारांच्या साहित्याचा समावेश आहे. बालसाहित्यात भरीव काम करणारे लेखक बबन शिंदे यांचा बालसाहित्याचा समीक्षाग्रंथ 'चांदा ते बांदा' नुकताच प्रकाशित झाला आहे. आजपर्यंत अनेक नामवंत लेखकांनी बालसाहित्याची समीक्षा केली आहे. अनेक समीक्षाग्रंथ प्रकाशित झालेल...

लहानग्यांसाठी आनंद, साहस आणि संस्कारांचा खजिना - चिंटू अस्वल आणि त्याचे घर

इमेज
 लहानग्यांसाठी आनंद, साहस आणि संस्कारांचा खजिना - चिंटू अस्वल आणि त्याचे घर - गुलाब बिसेन, ब्रम्हपुरी कविता, कथा, कादंबरी, ललित, बालसाहित्य अशा विविध लेखनप्रकारांमध्ये सकस लेखन करणारे प्रसिद्ध लेखक, कवी रवींद्र जवादे यांचा 'चिंटू अस्वल आणि त्याचे घर' हा बालकांसाठीचा कथासंग्रह वाचनात आला. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांची प्रस्तावना असलेला हा बालकथासंग्रह मुलांच्या भावविश्वाला पुरक असलेल्या कथा, सुंदर मुखपृष्ट आणि संपूर्ण रंगीत सचित्र मांडणी यामुळे अधिकच आकर्षक झाला आहे. या पुस्तकामध्ये 'चिंटू अस्वल आणि त्याचे घर' या शिर्षक कथेसोबत एकूण सहा कथांचा समावेश आहे. चिंटू अस्वल आणि त्याचे घर, पूर, प्रवेश निषेध, चारुलता शाळेत जाते, डिनो, जादूचा कंपास या सहाही कथांमध्ये विषयांची विविधता आहे. शिर्षक कथेतील चिंटू अस्वल त्याचे मित्र ससोबा आणि मयंक नावाच्या हरिणासोबत जंगलात राहतो. एक दिवस जोराच्या वादळाने तो ज्या झुडुपाच्या आडोशाने राहायचा ते झुडूपच उखडून नेलं. त्यावेळी त्याला स्वतः च्या घराची जाणीव झाली. त्यावेळी त्याला आपले जिवाभावाचे मित्र...

अवकाशातील अद्भुत दुनियेची सफर घवणारा बालकवितासंग्रह - आकाश कोडी

इमेज
अवकाशातील अद्भुत दुनियेची सफर घवणारा बालकवितासंग्रह - आकाश कोडी बालसाहित्यिक प्रा. देवबा पाटील यांनी त्यांच्या लेखनातून मनोरंजनासोबत वाचकांना विज्ञानाची गोडी लावण्याचा सतत प्रयत्न केला आहे. कथा, कविता, कोडी इत्यादी लेखन प्रकारातून आजवर बालवाचकांसाठी बालसाहित्याची सुबक अशी मांडणी त्यांनी केली आहे. बालसाहित्यातून त्यांनी निखळ मनोरंजनासोबतच वैज्ञानानिक दृष्टीकोन ‌निर्माण व्हावा, यासाठी अवतीभवती घडणार्‍या घटनांतील विज्ञान त्यांनी सोप्या पद्धतीने बालवाचकांपर्यंत पोहचवले आहे. 'आकाश कोडी' हा प्रा. देवबा पाटील यांचा बालकविता संग्रह नावाप्रमाणेच अनंत आकाश पोकळीत सामावलेल्या अद्भुत जगाची सफर घडवणारा आहे. कोड्यांच्या माध्यमातून आकाशातील अद्भुत जगाची उकल या कवितासंग्रहातून कवीने सुंदर शब्दांत केली आहे. या कवितासंग्रहामध्ये एकुण तेवीस कवितांचा समावेश आहे. प्रत्येक कवितेच्या शिर्षकात ओळखा या शब्दाची गुंफण केली आहे. यातून वाचकाची उत्कंठा आपसुकच वाढते. या कविता वाचताना सहज पद्धतीने अवकाशातील सुंदर जगाची ओळख होते. कवीने या कवितासंग्रहाची सुरुवात करताना, आपणास जरी दिसते निळे  ते विशा...

मनोरंजन आणि सुसंस्काराचा सुंदर मेळ - खारुताईचे जंगल आणि इतर गोष्टी

इमेज
मनोरंजन आणि सुसंस्काराचा सुंदर मेळ - खारुताईचे जंगल आणि इतर गोष्टी समीक्षक - गुलाब बिसेन. 'माझे गाणे आनंदाचे', 'जाणिवांची फुले', 'आई, मी पुस्तक होईन' यांसारख्या दर्जेदार बालसाहित्याचे लेखक प्रसिद्ध साहित्यिक डॉ. कैलास दौंड यांचा 'खारुताईचे जंगल आणि इतर गोष्टी' हा लाडोबा प्रकाशनने प्रकाशित केलेला बालकथा संग्रह. बालकांचे भावविश्व आणि बालसुलभ भाषा यांचा उत्तम मेळ या कथासंग्रहात लेखकाने घातला आहे. या कथासंग्रहामध्ये एकुण बारा कथांचा समावेश आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक आणि शिक्षणतज्ञ डॉ. न. म. जोशी यांची आटोपशीर प्रस्तावना या संग्रहाचे साहित्यमूल्य वाढवते. 'खारूताईचे जंगल झाणि इतर गोष्टी' या कथासंग्रहामध्ये खारुताईचे जंगल, आजी आणि चिमणी, कॉल केला की हजर, दोन चिमण्या, आभाळाची फुले, कापसाची पोर, मधुने वाचवला वड, मोहिम फत्ते अशा वाचनीय कथांचा समावेश आहे. लेखक डॉ. कैलास दौंड यांची बालसाहित्यावर असलेली पकड या कथांच्या मांडणीवरून लक्षात येते. बालसुलभ विषयांना मूल्यांची दिलेली जोड ही या कथासंग्रहाची जमेची बाजू म्हणावी लागेल. शीर्षक कथा असलेल्या ...

बालमनाचा जिवलग काव्यमित्र - बालमित्र

इमेज
बालमनाचा जिवलग काव्यमित्र - बालमित्र           कवी बाबा जाधव यांचा ‘बालमित्र’ हा पहिलाच बालकविता संग्रह आहे. यापूर्वी त्यांचा भूक आणि अवीट गोडवा चारोळ्यांचा हे प्रौढ कवितासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या वर्तमानपत्र आणि दिवाळी अंकातून यापूर्वी या संग्रहातील कविता वाचकांपर्यंत पोहचलेल्या आहेत. या सर्व कविता पुस्तकरूपाने आता बालवाचकांसाठी ‘बालमित्र’ या पुस्तकातून भेटायला आल्या आहेत. सुंदर मुखपृष्ठ आणि संपूर्ण सचित्र मांडणी यामुळे हा बालकवितासंग्रह खूपच आकर्षक झाला आहे. लेखक आनंदहरी यांची सविस्तर प्रस्तावना तर या बालक‌वितासंग्रहासाठी साहित्यिक बा. स. जठार यांनी पाठराखण दिली आहे. एकूण चौतीस बालकवितांचा समावेश असलेल्या आणि न्यू अथर्व पब्लिकेशनने प्रकाशित केलेले हे पुस्तक छोट्या दोस्तांसाठी वाचनाची पर्वणी घेऊन आला आहे.            ‘बालमित्र' या बालकवितासंग्रहाची सुरुवात 'पक्ष्यांचा मेळा' या कवितेने झाली आहे. चिऊ काऊच्या गोष्टीत रमत बालपण समृद्‌ध होत जाते. अ...

शोर्य, त्याग आणि बलिदानाची गौरवगाथा - लढाई

इमेज
शोर्य, त्याग आणि बलिदानाची गौरवगाथा - लढाई   हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थाप‌ना केली, ती आपल्या मावळ्यांच्या एकनिष्ठेच्या बळावर. अशा एकनिष्ठ मावळ्यांनी स्वराज्यासाठी शेकडो लढाया लढल्या आणि जिंकल्याही. अशा शिवकालीन लढायांतील निवडक पंचवीस लढायांची प्रेरक गाथा लेखक संजय येरणे 'लढाई' या पुस्तकातून बालवाचकांसाठी घेऊन आले आहेत. शिवरायांच्या मावळ्यांची शौर्यगाथा सोप्या शब्दांत हे पुस्तक सांगत आहे. कोल्हापूरच्या अभिनंदन प्रकाशनने प्रकाशित केलेल्या या पुस्तकामध्ये हळद- बेळसूरच्या लढाईपासून ते भूपाळगड लढाईपर्यंतच्या लढाया मोजक्या शब्दांत बालवाचकांसाठी मांडल्या आहेत. प्रस्तुत पुस्तक हे ऐतिहासिक असले तरी स्वराज्याच्या विविध लढाया समजून घेण्याच्या दृष्टीने लेखकाने बालकांचा विचार करून सोप्या भाषेत मांडल्या आहेत. स्वराज्याची पहिली लढाई हळद- बेळसरच्या लढाईचे वर्णन वाचताना शिवरायांच्या मावळ्यांचे धैर्य आणि शौर्याची प्रचिती येते. शिवरायांच्या गणिमी कावा या युद्धतंत्रांची या लढाईतून ओळख वाचकाला होते. वयाच्या सोळाव्या वर्षी स्वराज्यस्थापनेची प्रत...

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा

इमेज
मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा गुलाब बिसेन, ब्रम्हपुरी (जि. चंद्रपूर) 'सागरलाटा' हा डॉ. श्रीकांत पाटील यांचा नवाकोरा बालकविता संग्रह अलीकडेच प्रकाशित झाला आहे. डॉ. श्रीकांत पाटील हे बालकुमारांसाठी लेखन करणारे आघाडीचे लेखक/कवी आहेत. त्यांच्या बाल‌साहित्याला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही प्राप्त झाला आहे. बालकादंबरी, नाट्यछटांनंतर त्यांचा हा बालकविता संग्रहही वाचकांच्या पसंतीस उतरला आहे. डॉ. सतीश तराळ यांची प्रस्तावना असलेल्या या कवितासंग्राची पाठराखण ल. म. कडू यांनी केली आहे. नंदू वानखेडे यांनी काढलेले मुखपृष्ठ बालकांच्या भावविश्वाला पुरक असल्याने तो वाचकांचे लक्ष वेधून घेतो. संपूर्ण सचित्र असलेल्या या कवितासंग्रहामध्ये सत्तावीस कवितांचा समावेश आहे. 'सागरलाटा' या बालकवितासंग्रहाची सुरुवात गाणे गाऊया या कवितेने झालेली आहे. आपल्या अवती भवती असणारे झाडे, वेली, फळे, फुले, प्राणी, पक्षी, नदी, ओढे यांचे गाणे गाऊया अशी सुंदर कल्पना कवीने या कवितेतून मांडली आहे. डोंगराच्या कुशीत वसलेल्या गावाचे वर्णन 'डोंगरदर्‍यांच्या कुशीत' या कवितेत करत...

औरंगजेबाला रोखणाऱ्यांची पोवारी बोली

इमेज
पोवारी बोली.... (दैनिक सकाळ सप्तरंग पुरवणी  दि. 1 जून 2025 मध्ये प्रकाशित लेखक गुलाब बिसेन यांच्या 'औरंगजेबाला रोखणाऱ्यांची बोली' या लेखामधून साभार)       पोवारी बोली महाराष्ट्र राज्याच्या पूर्वेला असलेल्या भंडारा, गोंदिया आणि लगतच्या मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट आणि सिवनी जिल्ह्यांत बोलली जाते. एकेकाळी आपल्या तलवारीने रणांगण गाजवणार्‍या पोवार सरदारांनी गोंड राजा बख्त बुलंदशहा यांच्या विनंतीवरून विदर्भात येत औरंजेबाच्या सैन्याचा बंदोबस्त केला. पुढे मराठा सैन्यात (नागपूरकर भोसले) कटकपर्यंत धडक देत पराक्रम गाजवला. त्यानंतरच्या काळात हातात नांगर धरत शेतीसोबत नोकरी आणि व्यवसायात रमलेल्या पोवार (पंवार) समाजाची ही ‘पोवारी’ बोली आहे. पोवारी बोली पोवार समाजाची बोली असली तरी दिर्घकाळापासून पोवार समाजाच्या संपर्कात असलेल्या इतर जाती धर्माचे लोकही पोवारी बोली बोलतात. इ. स. १६९१ ते १७७५ या कालावधीत मालवातून (मध्यप्रदेश) विदर्भात मोठ्याप्रमाणात स्थलांतरीत झालेल्या पोवार (पंवार) समाजासोबत पोवारी बोली महाराष्ट्रात आली. त्यामुळे हिंदीची उपभाषा असलेल्य...

जागली (ग्रामिण कथा)

इमेज
 जागली... लेखक - गुलाब बिसेन   " शांता , मी बांद्यायवर जावून रायलो. "  सेवक ताटावर बसल्याबसल्या हात धुतच चिल्लवला. तशी वाळीत लसणा - कांद्याचे वापे कोळपत बसलेली शांता वापे कोळपावचा  सरूता तेतीच ठेवत घाईघाईना धावतच आली. अना पाण्याची डबकी भरू लागली.शांता सोनेखारीच्या पाटलाची पोरगी ! सेवकसंगा लगण झाल्यावर सितेपारात आली. आज लग्नालं पंचीस साल झाले. सेवकघरी तशी गरीबी होती. पर तिना कयी बापाघरची पाटेलकी दाखवलन नायी. ती सेवकच्या खांद्याल खांदा लावून संसाराचा गाळा चालवत रायली. गरीबीचे दिवसायलं सुखाच्या दिवसात बदलवासाठी ते नवर्‍यासंगा मोठ्या नेटाना कष्ट करत होती. कयी कयी सेवकसंगा नायी पटलां तं ती झगळे , पर सकाळचा झगळा संध्याकाळवरी विसरून जाय. संसारात कमी जास्त तं होतच रायते. संसार मनलाका भांड्यालं भांडा लागतेच. एवळ्यात तिना पाण्याची डबकी भरून तिच्यासंगा एक ईस्टिलचा गिलास देत सेवकलं मनावले लागली , " आज नयझरीचा बजार आये. बांद्यावरून लवकर येजाल. बजाराले जावून तेवळी किलोभर वारली मिरची घेवून येजा. " तसा सेवक तिच्या हातातली पाण्याची डबकी घेवून मान हालवत बांद्यायच्या रस्त्यालं ला...

मानवी संवेदना जागवणारा कथासंग्रह - आगळ्या वेगळ्या कथा

इमेज
  मानवी संवेदना जागवणारा कथासंग्रह - आगळ्या वेगळ्या कथा - गुलाब बिसेन आपल्या सशक्त लेखनीने बालसाहित्य समृद्ध करणारे तसेच लिहित्या हातांना सर्जनाचे पंख देणारे प्रसिदध साहित्यिक बबन शिंदे यांचा 'आगळ्या वेगळ्या कथा' हा कुमारकथांचा वाचनीय असा कुमारकथासंग्रह आहे. कथा - कवितांसोबत शाळकरी हातांमध्ये लेखनाचे बळ पेरणारे बबन शिंदे यांच्या कथा म्हणजे वाचकांसाठी एक पर्वणीच असते. दिलीपराज प्रकाशनने प्रकाशित केलेला हा कथासंग्रह कथांची मांडणी, पुस्तकाची रचना आणि समर्पक चित्रांसह आकर्षक मुखपृष्ठामुळे अधिक वाचकप्रिय झाला आहे. या कुमारकथासंग्रहामध्ये दहा कथांचा समावेश आहे. शब्द हे शस्त्र, चूक माझीच, जीवाचे सार्थक, श्रद्धा असावी पण.., खरचं मी अपंग नाही, प्रामाणिक गोपाळ, मोठ्या मनाची माणसं, वाचवा रे वाचवा, प्रसंगावधानता, कृष्णा या कथांचा संग्रहामध्ये समावेश आहे. चित्रकलेची वही चोरीला गेल्याच्या संशयावरून आपल्या जिवलग मित्राला नको ते वाईट बोलणाऱ्या राजूला आई शब्द हे शस्राप्रमाणे असतात, याची जाणीव करून देते. कथा वाचताना शब्दांचे महत्व वाचकाला कळते. शाळेचा गणवेश आणि गृह‌पाठ नसल्याने शिक्षकांचा ओरड...

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

इमेज
धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन  डॉ. कैलास दौंड  विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये शिक्षक आणि शाळांचे मोठे योगदान असते. विद्यार्थ्यांना येथे आकार मिळत असतो, येथूनच त्यांचे व्यक्तिमत्व फुलायला, आकारास यायला सुरुवात होते. बौद्धिक वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाबरोबरच व्यक्तिमत्व विकासाला पोषक ठरणाऱ्या गुणविशेषावर लक्ष ठेवणाऱ्या आणि त्यासाठी उपक्रम राबवणाऱ्या शिक्षकांचा देखील विद्यार्थ्यांवर मोठा प्रभाव असतो. गुलाब बिसेन यांनी त्यांच्या शिक्षकी पेशाला २००७ च्या उत्तरार्धात सुरुवात केली. कोल्हापूर जिल्ह्यातील निसर्गाच्या कुशीत असलेल्या पन्हाळा तालुक्यातील बादेवाडी येथे ते रुजू झाले. इयत्ता ४थी पर्यंतचे वर्ग असलेल्या शाळेत त्यांनी अनेक उपक्रम राबवले. साहजिकच विद्यार्थ्यांना शाळेबद्दल गोडी निर्माण झाल्यामुळे या शाळेचे उच्च माध्यमिक शाळेत रुपांतर झाले. हा बदल गुणात्मक आणि संख्यात्मक अशा दोन्ही प्रकारचा होता. बादेवाडीतील शाळेमध्ये त्यांनी अनेकानेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. विद्यार्थी बँक, स्कूलशॉप, हस्ताक्षरवीर, पाणपोई, बालचित्रपट महोत्सव, पत्रसंवाद, तरंग वाचनालय, आनंद बा...

वैज्ञानिक दृष्टीकोन पेरणार्‍या कथा - मुलांसाठी विज्ञान कथा

इमेज
वैज्ञानिक दृष्टीकोन पेरणार्‍या कथा - मुलांसाठी विज्ञान कथा विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात जगणारी आजची पिढी विज्ञान तंत्रज्ञानाच्या अद्भुत अविष्कारांच्या सहवासात वाढत आहे. सभोवतीचा निसर्ग आपल्या विविध कलांनी बालमनाला अचंबित करत असतो. हा निसर्ग रोजच्या घडणार्‍या घटनांतून कुतुहल जागृत करत असतो.  वाहणारे वारे, नित्यनेमाने बरसणारा पाऊस, ऋतुंमध्ये होणारा बदल आपण नेहमीच अनुभवत असतो. परंतु ते बदल का होतात याचा खोलवर विचार आपण करतोच असे नाही. लहान मुलांना तर या साऱ्या गोष्टींचे कुतुहल वाटत असते. त्यांना त्यासंदर्भात नानाविध प्रश्न पडतात. परंतु त्या प्रश्नांची उकल होतेच असे नाही. ही उकल कथांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न प्रा. देवबा पाटील यांनी ‘मुलांसाठी विज्ञान कथा’ या कथासंग्रहातून केला आहे. या कथासंग्रहामध्ये एकुण आठ कथांचा समावेश आहे. बर्‍याचदा विज्ञान हे समजायला अवघड जाते. मुलांना समजायला अवघड जाणार्‍या संकल्पना कथेच्या माध्यमातून सोप्या पद्‌धतीने सांगण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. त्यामुळे बालकांना आपल्या सभोवती घडणारे विज्ञान कथेच्या माध्यमातून समजून घेणे सहज साध्य होई...

निरागस भावनांचा सुरेल स्वर - आई, लॉकडाऊन म्हणजे काय?

इमेज
 निरागस भावनांचा सुरेल स्वर - आई, लॉकडाऊन म्हणजे काय? साहित्य, कला, संस्कृती आणि शैक्षणिक क्षेत्रात आपले बहुमूल्य योगदान देणारे, लेखक प्राध्यापक डॉ. धनराज खानोरकर यांचा ‘आई, लॉकडाऊन म्हणजे काय?' हा बालसाहित्यातला नितांत सुंदर असा बालकविता संग्रह आहे. लॉकडाऊनच्या काळातील आठवणी जागवणाऱ्या कवितासंह सुंदर कवितांनी हा क‌वितासंग्रह सजले‌ला आहे. प्रा. धनराज खानोरकर यांनी प्रौढ साहित्यामध्ये अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे. 'संजोरी' हे अलिकडे प्रसिद्ध झालेले पुस्तकाचा  गोंडवाना विद्यापीठाच्या पाठ्यपुस्तकात समावेश झाला आहे. लेखक प्रा. धनराज खानोरकर यांनी के ३३ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यपद भूषवलेले आहे. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांची प्रस्तावना आणि पाठराखण असलेला हा बालकविता संग्रह समीक्षा पब्लिकेशनने प्रकाशित केला आहे.  कवी प्रा. धनराज खानोरकर यांनी प्रस्तुत काव्यसंग्रहामध्ये आमची समू, खारूताई, कॅलेंडरचे दिवस, चांदोमामा उपाशी, चिऊताई सांभाळ जीव, बाहुलेदादा लगीन का रे मोडले? अशा बावण्ण कवितांचा संग्रहात समावेश केला आहे. प्रसिद्ध चित्रकार संत...