पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मड्डा कथा लिंक

http://www.esakal.com/saptarang/marathi-feature-saptaranga-gulab-bisen-105163

झाडीपट्टि आणि शिंगाडा

##  झाडीपट्टि आणि शिंगाडा  ## झाडीपट्टि...... महाराष्ट्राच्या पूर्व टोकावरील भंडारा , गोंदिया , चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांसह नागपूरचा काहि भाग निसर्गाने समृद्ध असा हा भाग. वनसंपदेने नटलला हा भाग तलावांच्या विपुलतेमुळे  " तलावांचा प्रदेश " म्हणून ओळखला जातो. या तलावांमध्ये शिंगाड्याची शेती केली जाते. झाडीपट्टित दिवाळीपासून महिनाभर  " मंडई " हा खास उत्सव साजरा केला जातो. कष्टकर्‍यांचा श्रमपरिहार होवून त्यांच्यात कष्ट करण्याची नविन उर्जा निर्माण व्हावी हा त्यामागचा हेतु. या मंडईमध्ये झाडीपट्टितील लोककलांचा जनु मेळाच भरतो. महिना दोन महिने गावागावात दंडार , जलसा , नाटक , तमाशा , नौटंकी ड्रामा या कार्यक्रमांची रेलचेल सुरू असते. मंडईनिमित्त गावे पाहुण्यापयांच्या गर्दिने फुलुन जातात. माहेरवासिन मुली आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत माहेरी काहिकाळ माहेरपण जगतात. याच मंडईमध्ये खवय्यांच्या नजरा आपसुकच एका पदार्थाकडे वळतात. तो म्हणजे शिंगाडा. मंडईमध्ये शिंगाडा न खाणारा व्यक्ती शोधुनहि सापडणार नाही अशी या भागात शिंगाड्याची ख्याती आहे. चवीला गोडसर लागणारा काळ्या फोलाख...

समय को फेरा

समय को फेरा ( बोलो पोवारी , बाचो पोवारी , लिखो पोवारी ) " देखो , जमानो केतरो बदल गयेव." असो एक बुजरूक अादमी आपल् बुजरूक संगीला असो कवतान् आपन देखजन , पर आता येव जमानो एतरो जोरलक परायरयीसे का आमर् सारक् जवान माणूसलाबी वर्‍यासारको कवनो पळसे. रोजक् रोज जमानो बळ्  तेजीलक बदलत रयेलक पयले तीस च्यालीस सालमा एकान चीज बदलशान नवी चीज देखनला मिल्. आतात् अजकी चीज मयनाभरमाच पूरानी होयजासे. जसो अजको पेपर सकारी पुरानो होयजासे यतरो तेजीलक जमानो बदल रयीसे. आता आपल् घरक् टिवीकोच देखोना , एक जमानो असो होतो का गावमा एक दुयच कारी - पांडरी टिवी रवत अना वय देखनला पूरो गाव एकजाग् आपला कामधंदा सोळशान जमा होय. कार् पांडर् टिवीक् बाद कलर टिवी आवनला थोळो जमानो लगेव. पर आता घरघरमा कलर टिवी आयी. वोक्ंलक बत्तीस इंचीकी एल. इ. डी. टिवी देखनला बेठारका दुयच्यार लोकबी नयी आवत. पयले टिवीवालो घर् सनवार् ईतवार् यात्रा भर् . टिवीवालोघरकी सपरी दुयदिवस सरायी नोहती रवत. आता बुलायशानबी कोणी टिवी देखन घर् नयी आव्. आमर् गावमा जब् टिवीको आगमन भयेव तब् आमी दुय च्यार सालका रया रवज्. तब् टिवीवालं घर् जत्रा भर्. टिवीवाल् कायी...

काव काव

 काव काव काव !!!!!!!!!!!!!!!!!!!! रात्रीचे साडेनऊ वाजले होते. रात्रीचे जेवण आटोपून झोपण्यासाठी मी बेड आवरला. स्वयंपाक खोलीत सौ. ची आवराआवर सुरू होती. चिरंजीवही आपल्या बालक्रिडेत व्यस्त होते. कदाचीत माझ्यासोबत चिरंजीवांनाही झोपेची चाहुल लागली असावी. त्यामुळे तेही काहीसे आवराआवर करताना मला दिसले. झोपी जाण्यापूर्वी थोडं वाचलं तर झोप कधी येते हे कळतही नाही. काॅलेजला असताना रात्री जेवून वाचायला बसलंकी डुलकीवर डुलकी यायची. त्याचीच पुनरावृत्ती करायचे मी ठरवले होते. पुस्तकांच्या गठ्ठ्यातून एक पुस्तक काढुन मी वाचायला लागलो. चिरंजीवही कसल्याशा कामात व्यस्त होते. मला वाचताना बघुन म्हणाले ,  " पप्पा , कोणतं पुस्तक वाचताय ? " " सम्राट अशोक " मी वाचतच म्हणालो. " पप्पा , तुमचं पुस्तक ठेवा. माझं पुस्तक वाचुन दाखवा. "  माझ्या हातात त्यांचं एक पुस्तक देत चिरंजीवांनी फर्मान सोडलं. चिरंजीवांचं फर्मान म्हटल्यावर मी माझं पुस्तक बाजुला ठेवून त्यांनी दिलेलं गोष्टिचं पुस्तक वाचायला लागलो. तर चिरंजीव परत फर्मान सोडल्याच्या तोर्‍यात म्हणाले ,  " पप्पा , मला पुस्तकातली गोष्ट सां...

मूल्यांची रूजवण

मूल्यांची रूजवण मुलांचे शालेय वय संस्कारक्षम असते. अशा वयात मुलांत शालेय जिवनात नैतिक मूल्यांची रूजवण करणे गरजेचे असते. वर्गाध्यापणात मूल्यांच्या अनुसंगाने घडणार्‍या प्रसंगावेळी मुलांशी चर्चा करणे उपयुक्त ठरते. परवा अशिच एक चर्चा वर्गात चालली होती. चर्चेचा विषय होता , " चांगल्या आणि वाईट सवयी ". या विषयावर मुले हळुहळु बोलती झाली. मुलांनी सुरूवातीला मानवी स्वभावाप्रमाणे वाईट सवयी सांगायला सुरूवात केली. माणसाला वाईट लवकर आणि चांगलं उशिरा दिसतं. कुणी म्हणालं , " मी घरच्यांना शिव्या देतो " तर कुणी " मी रस्त्याने येता जाता कुत्र्यांना दगड मारतो." काही वाईट सवई ह्या सर्वांच्या सारख्या होत्या. सर्वांनी प्रामाणिकपणे आपल्या वाईट सवयींवर चर्चा केली. बराचवेळ चर्चा झाल्यावर प्रत्येकाला चांगल्या आणि वाईट सवयी वहित लिहुन काढायला सांगितलं.  मुलांनी लिहुन काढलेल्या त्यांना असलेल्या काही चांगल्या सवयी...... १) दररोज वेळेवर शाळेत जाणे २) अभ्यास वेळेवर करणे ३) शाळेतून घरी गेल्यावर हातपाय धुणे ४) सकाळी लवकर उठणे ५) म्हैसीला पाणी दाखवणे ६) सुट्टिच्या दिवशी शेतात जाणे ७) पुस्तक...

बिना शिक्षण

बिना शिक्षण... एक जमानो होतो , ज्यान घरको माणूस घरच रये येकी काळजी लेयीजात होती. घरकी किसानी करनला घरको सिकेव लिखेव टुरा घरच रव्. असा केतराकजन रयेत जिनला घरकी कास्तकारी कोण करे ? येन् एकच सवालन् घरक् बाहेर नयी जान देयीस. डिवटीपर लगन येतरो शिक्षण लेयस्यान , डिवटीको घर् बुलावा आयस्यानबी घर् रवनेवाला एक जमानोमा बहुसंख्यालक भेटत. पोट भरनसाठी रोजी रोटी घरक् घरच , गावक् गावमाच मिलावनसाठी प्रयास करे जात होतो. पर जमानो बदलेव तसो समाजबी बदलन बसेव. सरप जसो कोस टाकस्यान नविन रूप लेसे तसो नवो रूप लेनको वू प्रयास करन बसेव. पयले ज्याहान डिवटीसाठी लोक घर सोळनला मंग् पुळ् देखत वय , आपल् टुरूपोटुनला स्याळा सिकावनसाठी बाहेर पटावन बस्या. डिवटीत् दुनियामा कहींबी लगनदेव जिल्हा , राज्य , देश , विदेश कहींबी जानला नविन पिढी आता मंग् पुळ् नही देख् .  येव सामाजिक बदल काही सहज भयेव असो नही. येक् मंगंबी मोठो कारण से. जेन् जमानोमा घरबसे डिवटीको बुलावा आव् . वोन् जमानोमा डिवटीपर लगनेवाला पैसा पानीलक मजबूत होन बस्या. अना कास्तकारीवाला मंग् पळनबस्या तबंपासून समाजका डोरा खुलन बस्या. धिरू धिरू शिक्षणसंग् डिवटीकी प्...

तुमरी - आमरी पोवारी बोली

तुमरी - आमरी पोवारी बोली ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷ कोणतीबी भाषा ओक् बोलीभाषाईनलक फलंफुलंसे. गावखेळामा बोलीजानेवाली गावठी भाषा अशुद्ध मानीजासे. पर खरी भाषाको जतन याच गावठी बोली करत रवसे. आपलो समाज जसजसो शिक्षण लेयशान शाहानो होय रयीसे , तसो काजकजान् पर आपल् बोलीपासून दूर दूर जाता दिससे. यव बदलाव आपलंच नयीत् दुसर् समाजमाबी कमी जास्त परमानमा दिससे. नवकरी धंदालक खेळामालक शयरमा बस्या लोक आपली बोली बोलनला सर्मासेत. आपल् बोलीमा बोलनो वूनला कमीपणाको लगसे. परदुसर् आंग् नागपूरसारक् उपराजधानीमा रयस्यानबी आपली पोवारी बोली फलावन फुलावनसाटी दिवसरात राबनारा हातबी सेती. बोली कोणतीबी रव्हं , वोला आपलो इतिहास अना भूगोल रवंसे. पोवारी बोलीकोबी आपलो इतिहास अना भूगोल से. धारमा जल्मी पोवारी अलग अलग रूपमा विदर्भमा आपलो पाय गाळस्यान उबी से. आपलं पुरवजयीनन् बळ् मेहनतलक पोवारीला संभालस्यान ठेयीन. वोको पालनपोषण करीन. आता आपलो कर्तव्य बनसे का वोला संभालस्यान वोको मान संम्मान बढावनो. पर आबंकी परीस्थिती थोळी चिंताजनक से.  सिखेवलिखेव आपलो समाज पोवारी बोलनला अना लिखन बाचनला तयार नयी होय रयीसे. येका बुहु कारण सेती. मानुसपुट...

जिवण समृद्ध करणारी आकाशवाणी

जागतिक रेडीओ दिनानिमित्त काही आठवणी......... जिवण समृद्ध करणारी आकाशवाणी ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷ मी पाच सहा वर्षांचा असेन जेव्हा रेडीओचा आमच्या घरी गृहप्रवेश झाला. त्यावेळी मनोरंजनाची मोजकीच साधने उपलब्ध होती. दूरदर्शन गावात दोन तीनच उपलब्ध होते. रेडीओ दहा पंधरा असतील. त्याकाळात दूरदर्शन संच खरेदि करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होते. अशा परीस्थितीत मनोरंजनाचे सर्वसामान्यांना परवडणारे साधन म्हणजे रेडीओ , हे एकमेव हक्काचे साधन उपलब्ध होते. माझ्या आजोबांना रेडीओचे वेड असल्याने त्यांनी फिलीप्स कंपणीचा रेडीओ खरेदी केला. आमच्या घरी आलेले हे विजेवर चालणारे पहिले उपकरण असल्याने माझ्याबरोबर घरच्या सार्‍या मंडळींना त्याचे वेगळेच आकर्षण होते. त्याकाळी माझ्या दिवसाची सुरूवातच आकाशवाणीवरील मंगल ध्वनीने व्हायची. आजोबा पहाटे पाचला उठल्यानंतर आकाशवाणीचे केंद्र कधी सुरू होते याची वाटच पाहत राहायचे. घड्याळात पाच वाजून पन्नास पंचावण्ण मिनीटे झाली कि , आकाशवाणीच्या पहिल्या सभेला सुरूवात व्हायची. आधी मंगल ध्वनी मग वंदेमातरम त्यानंतर सहा वाजता दिल्ली केंद्रावरील राष्ट्रिय बातमीपत्र असा कार्यकमांचा क्रम ...

जपूया निसर्ग

जपूया निसर्ग नुकताच आमच्या शाळेचा वनभोजन पार पडला. शाळेपासून पाच सहा किमी अंतरावर अलसलेले नांदारी डॅम. निसर्गाने मूक्तहस्त केलेली उधळण आणि तलावाचे नितळ निळे पाणी कुणालाही प्रेमात पडायला लावते. अशा निसर्गरम्य ठिकाणी अमाप उत्साहाच्या तुषारांनी चिंब भिजुन या वनभोजनाचा सर्वांनी आनंद लुटला. निसर्गाच्या सानिध्यात असताना मनावरील मरगळ कुठल्या कुठे पळून जाते. शरीरात उत्साहाचा संचार होतो. नवउर्जेने उर्जीत झालेले मन पुढिल अनेक दिवस ताजेतवाने राहते. नांदारी सारख्या निसर्गरम्य ठिकाणी निसर्गाशिवाय दुसरं काहिही दृष्टिस पडुच नये असं वाटतं. निसर्गात फिरायला जाताना काही नियम पाळणे आवश्यक असते. निसर्गाला कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही. याची काळजी घ्यावी लागते. निसर्गाकडुन भरभरून घेताना त्याला देण्याचीही जाण ठेवावी लागते. परंतु माणूस नावाच्या प्राण्याने अशा निसर्गरम्य ठिकाणी आपल्या विघातक कार्याचा ठसा उमटवला आहे. या परीसरात फेरफटका मारल्यावर याचे पुरावे आपल्या दृष्टिस पडतात. मद्याच्या रिकाम्या बाटल्या , अस्ताव्यस्त पडलेल्या प्लॅस्टिकच्या पत्रावळ्या , पिशव्या निसर्गाचे विदृपिकरण करत आहेत.  सगळिकडे ...

वास्तवातील सुपरहिरो

वास्तवातील सुपरहिरो घरातली लहान मुले बर्‍याचदा दूरदर्शनवरच्या विविध मालिका बघुन आपल्या आवडीच्या सुपरहिरोचा ड्रेस हट्ट करून घेवून मागतात. तो हौसेने घालुन सुपरहिरो चा खेळ खेळत बसतात. त्यांचा तो खेळ बघुन घरच्यांना त्यांचे कौतुक वाटते. लहान मुले टिव्हीतलं बघुन ते वास्तवात करण्याचा प्रयत्न करतात. पण ते ज्या सुपरहिरोच्या शोधात असतात तो सुपरहिरो वास्तवात कधी अस्तित्वाच आलेला नाही. हे त्यांना कुठं ठावूक ! बालमन आपल्या कुवतीप्रमाणे विचार चक्र फिरवून ते खेळात गुंतुन जातात. चित्रपट , मालिका या आभासी जगातून नेहमी दिसणारे सुपरहिरो मुळात वास्तवात अस्तितवातच नसतात. मनोरंजनापुरते त्यांचं अस्तित्व असतं. पण लहान मुले कधीकधी आभासी जगालाच वास्तव जग समजुन त्यात वावरत असतात. लहान मुलांचा हा सुपर हिरो नेमकं काय करतो ?...... तो संकटात सापडलेल्या दिनदुबळ्यांना मदत करतो. दुबळ्यांची इतरांकडुन होणारी पिळवणूक थांबवतो. सर्वसामान्यांची काळजी घेतो. गरजुंना मदत करतो. निराधाराला आधार देतो. आंधळ्याला काठी देतो. एकंदरीत सर्वसामान्यांची तो सदैव काळजी घेतो. असेच सुपरहिरोसारखे काम वास्तवात करणारेही अनेक मंडळी आपल्या अवती...

वर्तमानपत्र बनले कलेचा स्रोत

वर्तमानपत्र बनले कलेचा स्रोत (माझं कलापूर , माझी कलाकृती) आपल्याघरी रोज वर्तमान घेवून येणारं वर्तमानपत्र अनेकांच्या जिवणाचा अविभाज्य अंग बनलेला आहे. दिवसाची सुरूवात वर्तमानपत्र वाचनाने करणारेही बहुसंख्य आहेत. अनेकांनातर वर्तमानपत्राशिवाय सकाळचा चहाही घशाखाली उतरत नाही. असा हा वर्तमानपत्र दुसर्‍या दिवशी मात्र थेट रद्दित जावून पडतो. मग मात्र या वर्तमानपत्राचा वापर हा दुकानात पुड्या बांधण्यासाठी होतो. अशा वर्तमानपत्राच्या रद्दिचा कल्पक वापर करून मी आपले घर समृद्ध करणार्‍या चित्रमय पुस्तकांची निर्मिती केली आहे. असे म्हटले जाते कि , सौंदर्य हे वस्तूत नसून ते बघणार्‍याच्या नजरेत असते. आपल्या सभोवती अशा असंख्य वस्तू असतात ज्यांच्यामधून आपण अनेक अाकर्षक कलाकृतींची निर्मीती करू शकतो. फक्त गरज आहे ती कल्पक दृष्टिची. रोज वाचल्या जाणार्‍या वर्तमानपत्राच्या बाबतीतही तसेच आहे. वर्तमानपत्रात विविध सण उत्सव , कला , संस्कृती , निसर्ग , भूकंप , पूर , अवकाश , प्राणी , पक्षी , ग्रामिण जीवन अशा असंख्य विषयांशी संबंधित प्रसंग दैनंदिन जिवणात कॅमेराबद्ध करून ते छायाचित्र स्वरूपात वर्तमानपत्रांमध्ये वेळोवेळी प...

अशैक्षणिक कामांचे ओझे

लेख - अशैक्षणिक कामांचे ओझे चालू दशकाच्या सुरूवातीला तंत्रस्नेही या गोंडस शब्दाने महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात बाळसं धरलं. आणि अल्पावधितच या शब्दाला एक वलय निर्माण झाले. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रातील उच्चपदस्थ अधिकार्‍यांनी या संकल्पनेला खतपाणी घातलं. त्याचसोबत महाराष्ट्रातील शिक्षण साखळीत सर्वात शेवटचा दुवा असलेल्या शिक्षक या घटकाने तो उचलून धरला. तंत्रस्नेही या शब्दाचा अल्पावधितच महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात चांद्यापासून बांद्यापर्यंत बोलबाला झाला. काही शिक्षकांनी तर या क्षेत्राला वाहून घेतलं. त्यावर झपाटल्यासारखे काम करून डोंगदर्‍यापासून दुर्गम वाड्यावस्त्यांवरील शाळांमध्ये तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अध्यापनाची पहाट उगवली. यामुळे विद्यार्थी अधिक क्रियाशील होवून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अभ्यासातील जटिल समस्या सहजरीत्या सोडवू लागले. ज्या गोष्टी तासनतास घोकंपट्टी करूनही पचनी पडत नव्हत्या , त्या संकल्पना चुटकीसरशी समजू लागल्या. शिक्षकांच्या अध्यापनातील कष्टांची बचत झाली. तरूणांपासून ते पन्नाशी गाठलेल्या अशा सर्वच शिक्षकांनी ही तंत्रस्नेही संकल्पना उचलून धरली. मग त्यासाठी ला...

खाऊचा डबा

खाऊचा डबा - एक आरोग्यदायी उपक्रम आधुनिक युगात जाहिरातींच्या भडीमाराने खाण्यापिण्याच्या बाबतीत प्रसार माध्यमांतील जाहिरातीतून पाश्चात्यांचे होणारे अंधानुकरण यामुळे मुलांचे आरोग्य दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. फास्ट फूड , जंक फूड तसेच चकचकित पॅकिंग करून विकले जाणारे अनारोग्यदायी पदार्थ मुलांच्या आरोग्यावर विपरीत परीणाम करत आहेत. पूर्वी शहरात दिसणारे पदार्थ आता खेडोपाडी पोहचले आहेत. वाडी वस्त्यांवरही असे अनारोग्यदायी पदार्थ सहज उपलब्ध होत आहेत. अशा पदार्थांची सहज होणारी उपलब्धता , आकर्षक वेष्टन आणि आधुनिक जिवनशैलीचे आकर्षण यामुळे शहरापासून खेड्यापर्यंतच्या मुलांमध्ये वेपर्स , चाॅकलेट , कुकिज , कुरकुरे , खारी , बिस्किटे , फुकण्या खाण्याचे प्रमाण लक्षणिय वाढले आहे. अशा अनारोग्यदायी पदार्थांच्या नियमित सेवणाने मुलांच्या पोटाच्या तक्रारी वाढल्या आहेत. सोबतच दात किडणे , रक्ताची कमतरता , हाडे ठिसूळ होणे , लठ्ठपणा , डोळ्यांचे आरोग्य बिघडणे , सारखे पित्त वाढणे यांसारख्या अनेक आरोग्याच्या समस्यांना मुलांना तोंड द्यावे लागत आहे. या दुष्टचक्रातून मुलांची सूटका होवून त्यांचे आरोग्य सुधारावे यासाठी ...

अहो

अहो....... भार्गवला शुक्रवार आणि शनिवार अशी दोन दिवस सुट्टि असल्याने तो शुक्रवारला (दि. १३/१२/२०१९ ) माझ्यासोबत माझ्या शाळेला आला होता. शाळेत प्रवेश केल्यापासून तो बिनधास्त वावरत होता. मुलांच्या गराड्यात तो आनंदात मुक्त संचार करत होता. दिवसभर नुसती मस्ती सुरू होती. या वर्गातून त्या वर्गात , आत बाहेर नुसता धुंडाळा सुरू होता. त्याच्या शाळेत असे स्वातंत्र्य त्याला अभावानेच मिळत असल्याने तो अधिक मूक्तपणे वावरत होता. मुलांच्या सोबत जेवणाचा आनंदही त्याने लुटला. दिवसभराच्या धावपळीप दिवस कसा संपला हे त्याला कळलेच नाही. भार्गव घरी पोहचला तेव्हा पूर्ता थकला होता. रात्री झोपताना त्याच्या मम्मीने दिवसभराच्या मौज मजेचा मागोवा घेताना भार्गव म्हणाला , " मम्मा , पप्पांच्या शाळेतील मुलांना तुमचे आणि पप्पांचे नावच कळत नाहीत." " बेटा , तु आमचे काय नाव सांगितले मुलांना ? " मम्मीने कुतुहलाने विचारले. " मम्मा , मी मुलांना तुमचे नाव "दुर्गा" आणि पप्पांचे नाव "अहो" असे सांगितले. पण मुलांना काही कळतच नव्हते." भार्गवचे हे बोल ऐकुण आम्ही एकमेकांकडे बघत मोठ्...

मनामनात रूजलेले व्यक्तिमत्व : कै. तुकडुजी ठाकरे गुरूजी

मनामनात रूजलेले व्यक्तिमत्व : कै. तुकडुजी ठाकरे गुरूजी व्यापक समाजहीत डोळ्यापुढे ठेवून ज्ञानदानाच्या कार्यातून मनामनात स्वत:चे स्थान निर्माण करणारे रूषीतुल्य व्यक्तिमत्व कै. तुकडु अमृतजी ठाकरे गुरूजी ( सेवानिवृत्त शिक्षक ) कुणाच्याही ध्यानीमनी नसताना दि. ८ फेब्रु. २०२० रोजी काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या अवेळी जाण्याने शिष्यपरीवार , आप्तपरीवाराचे अपरीमित असे नुकसान झाले आहे. त्यांच्या स्मृतींना दिलेला हा उजाळा. मोहाडी तालुक्याच्या पूर्व टोकावर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांच्या सिमेवर असलेल्या जांभोरा गावच्या ठाकरे कुटुंबात जन्मलेले कै. तुकडुजी ठाकरे गुरूजी. परीस्थिचा सामना करत त्यांनी दहावी डि. एड. चे शिक्षण पूर्ण करून पूर्वीच्या भंडारा जिल्हा परीषदेत ते शिक्षक म्हणून रूजु झाले. भंडारा जिल्ह्यातून गोंदिया वेगळा झाल्यानंतर त्यांनी जिल्हाबदली न करता गोंदिया जिल्हापरीषदेतच नोकरी करणे पसंत केले. मुळातच निगर्वी स्वभाव आणि इतरांमध्ये लगेच मिसळुन जाण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे ते अल्पावधितच विद्यार्थीप्रिय शिक्षक झाले. त्यांच्या याच स्वभावामुळे त्यांनी शाळेच्या गावातील पालक आणि सर्वसाम...