पोस्ट्स

ऑगस्ट, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वेतन आयोगाचे गुर्‍हाळ

##   वेतन आयोगाचे गुर्‍हाळ   ## नुकताच राज्य सरकारी तृतिय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांनी सातव्या वेतन आयोगासाठी तीन दिवस ( ७ , ८ व ९ आॅगष्ट २०१८ ) संप पुकारला. या संपातून कर्मचार्‍यांना सहानुभुतीपूर्वक विचार करण्याचे शासनाने दिलेले आश्वासन किती पाळणार हे वेळच ठरवेल. परंतु या संपाच्या निमित्ताने सर्वसामान्य जनतेत सरकारी कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग दिल्यास सरकारच्या तिजोरीवर किती बोजा पडेल हे पसरवण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. ( महाराष्ट्राच्या बिचार्‍या गरिब राज्यकर्त्यांनी स्वत:चे वेतन , भत्ते आणि पेन्शन वाढवून घेतले तेव्हा मात्र राज्याच्या तिजोरीवर कुठलाही बोजा पडला नाही. असो... ) कर्मचारी शासनाचा कणा कुठलेही शासन हे त्यांच्या कर्मचार्‍यांच्या जिवावर चालत असते. शासनाची ध्येय , धोरण , विविध लोकोपयोगी योजना प्रत्यक्षात राबवण्याचे आणि त्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला सेवा देण्याचे काम शासकिय कर्मचारी करत असतात. म्हणजेच शासनाचे मनुष्यबळ हेच शासनाचा कणा आहे. राज्यकर्ते बदलले तरी शासन सुरळित चालवण्याचे काम अधिकारी व कर्मचारी करत असतात. ज्या कण्याच्या जिवावर हे शासन चाल...

बोवा

##   बोवा   ## ( "बोवा" या माझ्या झाडीबोलीतील कथेतून ) रस्त्याना फटफटि ढकलत जाणार्‍या देवराम बोवाले रावजी हाका मारू लागला. " बोवा , इकळं येजाल. थोळा कुटाराचा पोतातं उचलु लागाजी. "  तसा बोवाना आपली फटफटी रावजीच्या डयलं बायेर लावून तो रावजीलं कुटाराचा पोता उचलु लागला. " कोटि चालल्यातं पैदल पैदल फटफटि ढकलत ?" रावजी कुटाराचा पोता धरून शिडीवर चंगत मनला. " चाललोजी बसटापवर गाळित पेट्रोल भरावलं." असा मनत बोवा आपली फटफटि ढकलत बसटापवर जावालं नयराच्या रस्त्यालं लागला. देवराम बोवा तसा कायी रावजीचा गनगोत नोय. तो होय , मोठ्या टोलीवरच्या सकरू गोंडाचा मंजला जवाई. बोवा जरी गोंडाचा जवाई असला तरी सार्‍या गावात अना गावातल्या घरा घरात त्याची उठबस होती. कोणालेबी तो आपलाच जवाई वाटे. देवराम बोवा मंजे गावबोवा............... गुलाब बिसेन (९४०४२३५१९१)