स्वच्छता भिनावी नसतात
००० स्वच्छता भिनावी नसानसात ०००
काल सायंकाळी मित्रासोबत बाजारात फिरायला गेलो होतो. सोबत त्यांचा मुलगा व माझा मुलगा होता. बाजारात गेल्यावर खाऊचे दुकान दिसताच मित्राच्या मुलाने चिप्स घेण्यासाठी हट्ट धरला. त्यामुळे खाऊच्या दुकानातून चिप्स पॅकेट व माझ्या मुलासाठी बर्फि घेतली. दोन्ही वस्तू प्लॅस्टिक पॅकेटमध्ये असल्याने प्लॅस्टिक फाडुन दोन्ही मुलं आपापला खाऊ खावू लागले. थोडावेळाने खाऊन झाल्यावर मित्राने वेपर्सचे पाकिट तिथेच उघड्यावर न टाकता ते पाकिट घरी घेवून जाण्यासाठी गाडीच्या मिटरच्या खोबणीत ठेवले. हे दृश्य बघुन मला मनापासून खुप आनंद झाला आणि मित्राचा अभिमान वाटला.
स्वच्छतेचे उपदेश करणारे उपदेशक गल्लोगल्ली सापडतील परंतु स्वच्छता नसानसात भिनलेली माणसे क्वचितच दिसतात. संत गाडगेबाबा , महात्मा गांधी यांनी लोकांना नुसता उपदेश न करता , आपल्या कृतीतून समाजाला स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. संत गाडगे महाराज तर किर्तनाचे मैदान स्वत: खराटा घेवून स्वच्छ करायचे. अशा थोर महात्म्यांचा वारसा लाभलेल्या आपण सर्वांनी स्वच्छतायुक्त जिवण अंगीकारल्यास समाज रोगमूक्त होण्यास मदत होईल... या थोरपुरूषांना हीच खरी आदरांजली ठरेल........ गुलाब बिसेन (९४०४२३५१९१)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा