पोस्ट्स

डिसेंबर, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

श्रेष्ठ रचनाकार

© निसर्ग शिकवण...भाग-७ © ०©० श्रेष्ठ रचनाकार कोण ? ०©० निसर्ग..... सजिव आणि निर्जिवांचा सुंदर मिलाफ साधणारा निसर्ग....सृष्टिची रचना करणार्‍या विधात्यानं माणवाला अधिक बुद्धिमाण केलं. या बुद्धिमत्तेच्या जोरावर माणवाने सर्व प्राणिमात्रांमध्ये आपलं श्रेष्ठत्व सिद्ध केलं. नवनिर्मितीचा भोक्ता असलेला माणूस या जिवसृष्टिवर अनेक रचना करतोय. कधी भूतलावर तर कधी भूगर्भात तर कधी अनंत पोकळीत. त्यामुळे कदाचित असेल किंवा बुद्धिचा गर्व म्हणून असेल काही मानसे स्वत:ला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजतात .दुसर्‍या जिवांना ते कायम कमी लेखतात. परंतु निसर्गात असे काही रचनाकार आहेत कि त्यांच्यापुढे माणवाची कला फिकी पडते. या सृष्टित असे काही जीव आहेत कि त्यांच्याकडे बघुन त्यांना विचार करणारा मेंदु आहे किंवा नाही असा प्रश्न पडेल. परंतु त्यांची निर्मिती अशी अगाध आहे कि ती माणसालाही तोंडात बोटे घालायला लावते. उदा. (१) सुगरण.... इवलासा पक्षी. आपल्या ईवल्याशा चोचीने गवत गोळा करून त्यांची अशी काही विण करतो कि माणसालाही ती उकलता येणार नाही.<br> (२) वाळवी..... हा ईवलासा किटक... परंतु आपल्या कुटुंबासाठी उन , व...

जाहिरात

सध्याचे युग हे जाहिरातीचे आहे. " न बोलणार्‍याचे गहुही विकत नाहीत , बोलणार्‍याचे मात्र खडेही विकले जातात."  जाहिरात बघितलेरे बघितली कि ती वस्तू घरात आलीच म्हणून समजा. बर्‍याचअंशी जाहिरात बघुनच वस्तू खरेदि करण्याचा कल वाढत आहे. त्यामुळे पूर्वीची सेल्समनची प्रथा आता मोडित निघाली आहे. आॅनलाईनच्या जमाण्यात ती जागा आता डिलीवरी बाॅयने घेतलीय. जाहीरात बघितली कि ती वस्तू आॅनलाईन मागवायची. दोन दिवसात वस्तू घरात पोच. त्यामुळेही खरेदि कमी कष्टाची झालीय. पण बाजारात जावून भाव करून वस्तू घेण्यातील मजा त्यात नाही. तंत्रज्ञानाच्या युगात टिव्ही , इंटरनेटच्या माध्यमातून सरळ ग्राहकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला जातो. प्रत्येकाच्या खिशात असलेल्या स्मार्टफोनमुळे जाहिराती खिशात सामावून गेलेल्या आहेत. ग्रामीण भागातही जाहिरातीसाठी अनेक शक्कल लढवल्या जातात. काळ बदलला तसा जाहिरात करण्याची पद्धतही बदलली. पूर्वी दुकानातील एक व्यक्ती ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठ्याने आरोळी ठोकायची. आता हा प्रकार कमी होवून दुकाणाबाहेर आकर्षक वस्तू , कपडे अडकवत ग्राहकांना आकर्षित केले जाते. काही ठिकाणी ग्राहकां...

सुसंस्काराचे बाळकडु

 सुसंस्काराचे बाळकडु आजची लहान लहान मुले हे उद्याच्या समाजाचे तसेच देशाचे भावी आधारस्तंभ असतात. आजची छोटि बालकेच भविष्यात देशाचे आणि समाजाचे नेतृत्व करणार आहेत. हे नेतृत्व सक्षम असणे खुप गरजेचे आहे. उंच इमारत बांधायचे स्वप्न आपण बघत असू तर त्या इमारतीचा पाया खोलवर तितकाच भक्कम असणे आवश्यक आहे. भक्कम पाया अभावी उंच इमारती पत्यांच्या बंगल्याप्रमाणे कधी जमिनोदोस्त होतात हे कळतही नाही. त्यामुळे मुलांना बालपणीच सुसंस्कारीत करणे आवश्यक आहे. कारण माती मऊ असतानाच तिला योग्य तो आकार देता येतो. ती वाळली कि मग आकार देण्याचा प्रयत्न करण्याचा काय उपयोग ? बालवयातले सुसंस्कार दिर्घकालीन स्वरूपाचे असतात. देशाच्या आणि समाजाच्या नेतृत्वाची धुरा वाहणारे भावी बालके मनाने सुसंस्कारीत असणे खुप गरजेचे आहे. कारण सुसंस्कारांशिवाय नैतिकता माणसाच्या नसात भिणनार नाही. आणि नैतिकतेच्या अभावी माणवाचा घात मानवच करेल. मग समाज आणि देश प्रगती करण्याऐवजी अधोगतीकडे वाटचाल करेल हे नक्की. त्यामुळे बालवयातच मुलांचे मन सुसंस्कारीत होणे आवश्यक आहे. जसे राजमाता जिजाऊंनी शिवबाला बालपणी सुसंस्कारीत केल्यामुळे शिवरायांनी ...

तणावरहित शिक्षणाची गुरूकिल्ली

 तणावरहित शिक्षणाची गुरूकिल्ली शिक्षण हि निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. हि प्रक्रिया बाळ गर्भात असल्यापासून सुरू होते आणि आयुष्यभर अविरत सुरू असते. मूल कुटुंबात , शेजारपाजारात अनौपचारीक शिक्षणाचे धडे गिरवत असतो.अनौपचारीक शिक्षणात मुलावर कुटुंबातील ज्येष्ठांकडून अनेक जिवनोपयोगी संस्कार घडवले जातात. मोठ्यांचा आदर करणे , स्वत:चे काम स्वत: करणे ,इतरांना कामात मदत करणे , वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता ठेवणे, इतरांना गरजेच्यावेळी मदत करणे असे अनौपचारीक शिक्षणाचे धडे बालक गिरवत असतो. हे धडे गिरवत असताना बालकावर कोणतेही बंधन नसते. किंवा वेळेचेही बंधन नसते.त्यामुळे बालक या काळात तणावरहित  शिक्षण घेत असतो. अनौपचारीक शिक्षणाचा टप्पा पूर्ण झाल्यावर मूल जेव्हा औपचारीक शिक्षण घेण्यासाठी शाळेत प्रवेश करतो , त्यावेळी त्याच्यावर शाळा , घर , कुटुंबिय , शेजारी इत्यादिंकडुन अनेक बंधने लादले जातात. शाळेत विशिष्ठ अभ्यास विशिष्ठ वेळेत करण्याचे बंधन बालकावर नकळत घातले जाते. त्यामुळे अनौपचारीक शिक्षण हसत खेळत घेणारे बालक औपचारीक शिक्षणाच्यावेळी तणावाखाली येतो. शाळेतिल विविध विषयांचा अभ्यास , शिकवणी...

तुम्हीच (कविता)

००   तुम्हीच   ०० ( पुस्तकरूपी मित्रांना समर्पीत ) तुम्हीच केलं सताड जागं मी निद्रिस्त असताना तुम्हीच दाखवली आशेची किरणं निराशेचे काळोख असताना तुम्हीच दिली लिहिण्याची प्रेरणा डोक्यात विचार असताना तुम्हीच दिलं मनगटात बळ हात थरथरत असताना तुम्हीच दिला जगण्याला उद्देश मी निरूद्देश असताना तुम्हीच दिली बोलण्याची प्रेरणा मी अबोल असताना तुम्हीच दिली मायेची ऊब मी कुडकुडत असताना तुम्हीच भागवली मेंदूची भूक मी भूकेला असताना ...✍ गुलाब बिसेन (९४०४२३५१९१)  ब्लाॅग - Gulabbisen.blogspot.com

मैत्री पुस्तकांशी

०० मैत्री पुस्तकांशी ०० आज दि. ०६/१२/२०१७ महामानव विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वान दिनाचे औचित्य साधुन आमच्या शाळेत  " मैत्री पुस्तकांशी " या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. या उपक्रमांतर्गत आज  " माझी आत्मकथा " या डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आत्मचरीत्राची ओळख करून देण्यात आली.  उपक्रमाची दोन टप्प्यात विभागणी केली आहे.  टप्पा क्र.  - १ या टप्प्यात मुलांना दररोज एका पुस्तकाची ओळख करून दिली जाईल. तसेच वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी छोटि छोटि पुस्तके दररोज वाचायला दिली जातील. टप्पा क्र. - २ या टप्प्यात मुलांच्या आवडीच्या पुस्तकांचे क्रमश: वाचन परिपाठात केले जाईल.

आजोबांची शिकवण

आजोबांची शिकवण घरातील वडीलधार्‍या मंडळींचा घरच्यांना मोठा आधार असतो. चुकल्या मुकल्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे काम ते करत असतात. आपल्या बर्‍यावाईट अनुभवांच्या शिदोरीतून ते सर्वांना थोडे न थोडे कायमच देत असतात. घरातील बालकांना सुसंस्कारीत करण्यात आजी आजोबांचा मोठा हात असतो. त्यांच्या देखरेखीखाली मुलांचे बालपण सुरक्षित असते. सुसंस्कारांचा ठेवा त्यांच्याकडुनच मिळत असतो. घरातील महत्वाचे निर्णय घेताना घरातील आजी आजोबांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरते. आमच्या घरात आमचे आजोबा कधिही शाळेची पायरी न चढलेले सुशिक्षित व्यक्ति होते. घराशेजारी राहणार्‍या त्यांच्या डाॅक्टर मित्राच्या संगतीत राहुन आजोबा लिहायला वाचायला शिकले.आमचे आजोबा म्हणजे एक जिवंत विद्यापीठच ! इंदिरा गांधी पंतप्रधान असताना काॅंग्रेस सेवादलात काम करत असताना त्यांना भारत भ्रमणाची संधी मिळाली. त्यावेळी त्यांनी राजधाणी दिल्लीसह भारताच्या अनेक भागात भ्रमण केले. आमच्या अख्ख्या गावात भारत भ्रमण केलेले त्यांच्या पिढितील ते एकमेव व्यक्ती होते. साहजिकच त्यांच्याकडे आम्हा नातवंडांना व इतरांनाही सांगायला भरपूर गोष्टि नेहमीच असायच्या. आदर्...