पोस्ट्स

सप्टेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शिक्षकांच्या सामाजिक बांधिलकीचा वेगळा पैलू

 शिक्षकांच्या सामाजिक बांधिलकीचा वेगळा पैलू संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचा केंद्रबिंदू असलेला विद्यार्थी सध्या कोरोनाच्या कहराने घरातच बंदिस्त झालाय. मुलांच्या किलबीलाटाने गजबजणार्‍या शाळा ओस पडल्यात. त्याचा परीणाम विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनावर होत आहे. तसे बघितले तर विद्यार्थी हा केवळ शाळेतच शिकतो असे नाही. परंतु विद्यार्थ्यांना काही गोष्टी जाणिवपूर्वक शिकवाव्या लागतात. त्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज असते. त्या गोष्टी शाळांमधून शिकवण्याचे काम शिक्षक करत असतात. त्यामुळे वैश्विकीकरणाच्या या काळात शिक्षकांची भूमिका अधिक व्यापक झाली आहे. कोरोनामुळे शाळाच बंद असल्याने शिक्षकांचे अध्यापन बंद झाले. परंतु विद्यार्थ्यांचे शिक्षक अखंडीत सुरू राहावे. शिक्षण बंद पडू नये यासाठी शिक्षक धडपडत आहेत. कुणी आॅनलाईन तर कुणी आॅफलाईन , कुणी गट कार्यातून तर कुणी समुह अध्यापनाद्वारे धडे देण्यात गुंतले. "शाळा बंद , शिक्षण सुरू" या धेय्याने प्रेरीत शिक्षक सर्वत्र धडपडताना दिसू लागले. कोरोनामुळे परिस्थिती अधिकच बिकट होत गेली. तसे शासनाचे सर्व विभाग कामाला लागले. अशावेळी शिक्षण विभाग कसा मागे राहील. मग शि...

कथा - बाबांची सायकल

 कथा - बाबांची सायकल टेंभर्‍यांची सुषमा अभ्यासात खुप हुशार होती. शाळेत परीपाठापासून बालसभेपर्यंतची धुरा तीच सांभाळायची. शाळेत सामान्यज्ञानाची परीक्षा असो कि भाषणांची स्पर्धा , तिने पहिला नंबर कधिच सोडला नाही. अभ्यास असो वा खेळ तिचा पहिला नंबर ठरलेला ! त्यामुळे साहजिकच ती शाळेतील सर्व शिक्षकांची आवडती विद्यार्थीनी होती. यावर्षीच्या शाळेचा आदर्श विद्यार्थ्याच्या बक्षिसासाठीही तिचंच नाव शिक्षकांनी निश्चित केलं होतं.  सुषमाचा अभ्यास आणि इतर सर्व घडामोडींवर तिचे वर्ग शिक्षक बोपचे सरांचे बारीक लक्ष असायचे. बोपचे सरांना तिच्या हुशारीचा खूप हेवा वाटायचा. कुणाच्याही पोटी पोरं जन्मावी तर अशी ! गरीबाची लेक आपल्या घराचं नाव उज्वल करणार , यावर त्यांचा दृढ विश्वास होता. सुषमाची दिवसेंदिवस होणारी प्रगती त्यावर शिक्कामोर्तब करत होती. सुषमा तशी खात्यापित्या घरची मूलगी परंतु आजोबांच्या दारूच्या व्यसनापाई ते कुटुंब देशोधडीला लागले होते. एकेकाळी गावात श्रीमंतांच्या यादित असणारे हे कुटुंब मोलमजुरी करून पोट भरायचे. सुषमाला एक लहान भाऊ होता. तो दुसर्‍या वर्गात शिकत होता. तोही सुषमासारखाच हुशार होता....

आॅनलाईन शिक्षण - एक मृगजळ

 आॅनलाईन शिक्षण - एक मृगजळ कोविड १९ या महामारीच्या संकटामुळे संपूर्ण जग एक बंदिशाळा झालेले अाहे. शहरी भागापासून ग्रामिण भागापर्यंत सर्वत्र कोविड १९ ने आपली पाळेमुळे पसरली आहेत. याचा शेतीपासून व्यापारापर्यंत अशा सर्वच क्षेत्रांना कधी नव्हे एवढा फटका बसलाय. यातून शिक्षण क्षेत्रही सुटु शकलेले नाही. देशातील शाळा , काॅलेज , विद्यापीठांना कुलुपबंद व्हावे लागले आहे. विद्यार्थ्यांविना शाळा ओस पडल्या आहेत. औपचारीक शिक्षणाचे महत्वाचे केंद्र असलेल्या शाळाच बंद असल्याने साहजिकच मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासन आणि शिक्षकांकडुन प्रयत्नही केले जात आहेत. त्यात घरबसल्या ठिकाणी करता येणारे आॅनलाईन शिक्षण महत्वाचे आहे. सध्याच्या घडीला विद्यार्थ्यांना घराबाहेर न पडता शिक्षण घेण्याच्या दृष्टिने आॅनलाईन शिक्षण हे माध्यम उपयुक्त ठरणारे आहे. त्यामुळे आॅनलाईन शिक्षणाचे महत्व वाढत आहे. याद्वारे अध्ययन - अध्यापन हि क्रिया घरबसल्या घडतात. शहरी भागासोबतच ग्रामिण भागातही आॅनलाईन शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवण्याचे प्रयत्न होत आहेत. परंत...