परिसर स्वच्छता

००० परिसर स्वच्छता ०००

सततच्या पावसामुळे सगळिकडे हिरवे हिरवे झालं असतानाच शाळेच्या मैदानातील तणालाही उधान आले. मनसोक्त पाऊस पिऊन तोही चिव्यासारखा  वाढला. मैदानातील हे तण पावसामुळे काढायला अडचण झाली होती.काल पाऊस उघडुन ऊन पडल्याने मुलांनाही खेळण्याचा मोह आवरेणा. बिचार्‍या मुलांनाही सततच्या पावसामुळे वर्गात सण्याशिवाय गत्यंतर नव्हता. कालच्या उन्हामुळे मुले बर्‍याच दिवसांनी मैदानात खेळायला उतरली. थोळावेळ खेळून झाल्यावर मैदानातील तण काढण्याचे त्यांच्या मनात आले.

मग काय ? क्षणाचाही विलंब न करता सगळे तण काढायला लागले. त्यांच्यासोबत मिही तण काढु लागलो. मुले हाताने तण काढत असल्याने मुळ्यांनी घट्ट जम बसवलेलं तण काढायला खुप कष्ट घ्यावे लागत होते. शेवटि निघेल तेवढा कचरा काढुन काम थांबले. संपूर्ण तण काढण्यात मुलांना यश आलं नाही. परंतु आपला परीसर स्वच्छ असावा ही भावना त्यांच्या बालमनात निर्माण झाली. त्यासाठी त्यांनी थोडेफार कष्ट करण्याची तयारी दाखवली . हेही काही कमी नाही. या छोट्याशा प्रसंगाने मुलांमध्ये स्वच्छता का करावी ? तिची खरेच गरज आहे का ? किंवा स्वच्छतेचा फायदा नेमका काय होतो ? आपल्या जिवनाशी स्वच्छतेचा संबंध कसा निर्माण होतो ? हे प्रश्न त्यांना नक्किच पडले असतिल..........गुलाब बिसेन (९४०४२३५१९१)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

कवलकी बंडी (नहानपनको खेल)

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा