प्रेरणा छोटि

०० प्रेरणा छोटि ... मोठे काम ००

काल मी सकाळची शाळा करून घरी आलो. मी घरी आल्याचे लक्षात येताच माझा दोन वर्षाचा मुलगा (भार्गव)

" पप्पा , पप्पा "

म्हणत ओरडु लागला. मी घरी आल्याचे बघुन तो खुप आनंदित झाला होता. मी दारात येताच तो त्याच्या मोडक्या तोडक्या भाषेत मला म्हणाला ,

" पप्पा , मी तुमच्यासाठी पाणी आणु ?"

माझ्या चिमुकल्याचे हे शब्द ऐकुण मलाही थोडं नवलच वाटले. कारण लहान मुलं खायला खाऊ मागताना अधिक दिसतात.

तो नेमकं काय करतो , हे बघण्यासाठी मी त्याला लगेच होकार दिला. माझी परवानगी मिळताच , तो स्वयंपाक खोलीत गेला आणि ग्लास शोधुन पाणी घेण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु उंचावर ठेवलेले पाणी त्याला घेता येईना. त्यामुळे त्याने त्याच्या मम्मीला बोलवून ग्लासभर पाणी घेतले आणि मला आणून दिले.

पाणी पितच मी त्याचे कौतुक केले. त्यामुळे तो अधिकच खुष झाला. मुलांच्या चांगल्या कृतीचे वेळीच कौतुक केले तर मुलांना प्रोत्साहन मिळुन मुले चांगले काम करायला प्रेरीत होतात. आजची छोटिसी प्रेरणा उद्या मोठ्या कामाला जन्म देयील. हेच हा छोटासा प्रसंग सांगुन गेला.....
.... गुलाब बिसेन (९४०४२३५१९१)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

कवलकी बंडी (नहानपनको खेल)

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा