सर , आई काम लावत्या
०©० " सर , आई कामं लावत्या " ०©०
शाळेचा परिपाठ संपवून मी घरचा अभ्यास तपासत होतो. एक एक करून मुले अभ्यास तपासायला येत होती. अभ्यास तपासून होताच जागेवर बसत होती. एवढ्यात अभ्यास तपासायला वेदिका आली. ती पुढे येताच मला आठवले. ती काल शाळा चुकवून घरी राहिली होती. ती पुढे येताच मी तिला विचारले ,
"वेदिका , काल शाळेला का आली नाहीस ?"
वेदिका अनुत्तरीत.
मी परत प्रश्न केला.
ती परत अनुत्तरीत.
मी परत प्रश्न केला.
आता मात्र तिच्या डोळ्यातून पाणी वाहु लागले.
अभ्यासात चांगली प्रगती असलेली वेदिका , शाळा कधीच चुकवत नव्हती. त्यामुळे काहितरी गंभीर असल्याचे ओळखुन मी तिला विश्वासात घेवून विचारू लागलो. तेव्हा ति म्हणाली ,
" सर , आई कामं लावत्या."
मि , " घरातल्यांना कामात मदत करणं चांगलं आहे. घरकामात सर्वांनीच मदत करायला पाहिजे."
ति " सर , मी काल सकाळी घरी पाणी भरले. शाळेची तयारी केली. पण घरातली सर्व माणसे सुगी सुरू असल्याने शेतात जातात. जाताना आईने घरातील भांडी धुवायला दिली होती. ति धुताना उशिर झाल्याने मी शाळेला आले नाही."
तिचा केविलवाणा चेहरा बघुन खुप वाईट वाटले. वेदिकाला शिकायची ईच्छा आहे. अभ्यासात हुशार आहे. पण घरच्यांमुळे तिची शाळा बुडते.
आता मुली शिकुन सन्मानाने जगु लागल्या आहेत. स्वत:च्या पायावर उभ्या होऊन जिवन फुलवत आहेत. माहेर आणि सासर असे दोन्हीघर प्रकाशमान करत आहेत. मुली शिकुण पुरूषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. अशा परिस्थितीत घरातील मंडळीच मुलींना घरकामात गुंतवून ठेवत असतील तर यासारखे दुर्दैव दुसरे कोणतेच नाही.... कुंपणच शेत खात असेल तर काय करायचं ?...... गुलाब बिसेन (९४०४२३५१९१)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा