पक्षीनिरीक्षण
००० पक्षीनिरीक्षण ००० मसाई पठाराच्या पायथ्याशी विस्तिर्ण पसरलेले माळरान.......सगळीकडे पसरलेली गर्द झाडी........वसंताची चाहुल लागल्याने टक्कल पडावी तशी निस्पर्न होत चाललेली वृक्षराजी....... गवत कापल्याणे उघडी पडलेली राने.......फुलांनी मणसोक्त बहरलेला पळस.......मातीच्या कुशीत वर्षानुवर्षे विसावलेली भलीमोठी दगडे.......डोक्यावर तापणारे कडक ऊन.......मधेच थंडीची जाणीव करुन देणारी वा-याची मंद झुळुक.......अशा आल्हाददायी वातावरणात माझी इयत्ता ३री , ४थीची मुले निघाली पक्षी निरीक्षणाला ! .........काळ्या आईच्या अंगाखांद्यावर बागळणारी ही मुले ! ........सारा निसर्गच यांना तोंडपाठ.......डोंगर काय.....नि झाडे काय.......सारे यांचे सोबती......मी बोट दाखवायला अवकाश की , मुले त्या पक्ष्याचे नाव सांगुन मोकळी !........एक ना अनेक.......प्रत्येक जीव न जीव त्यांच्या ओळखीचा. परीसरातील पक्षीवैभव बघताना तहान भूक हरवून गेली.....उंच आकाशात स्वच्छंद विहार करणारी घार......जोडीने फिरणारे पोपट.....सुळक्या मारत उडणारा किवंडा पोपट......पळस फुलांचा मकरंद खाणा-या विविध चिमण्...