पोस्ट्स

मार्च, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सितेपारचा शिमगा

००० सितेपारचा शिमगा ००० निसर्गाने मुक्तहस्ते केलेली रंंगांंची उधळण , घाणमाकडीचा किर्र किर्र आवाज आणि रात्री उशीरापर्यंंत चंंद्राच्या शितल प्रकाशात चालणारे पोराबारांंचे , आयामायांंचे पारंंपारीक खेळ या सर्वांंच्या  मिलाफाने सितेपारच्या शिमग्याला वेगळाच रंंग यायचा. शिमग्याची चाहुल लागली की गावातील शाळकरी पोराबारांंची घाणमाकडी तयार करायची तयारी सुरु व्हायची. घाणमाकडीसाठी पळसाच्या किंंचीत वाकलेल्या  खांंद्याचा शोध सुरु व्हायचा. कारण पळसाच्या मउपणामुळे घाणमाकडी मोडायची शक्यता कमी व्हायची. असा लाकुड सापडल्यावर त्याला कुर्‍हाडीने थोडी खाच पाडुण त्याला जमीनीत गाडलेल्या खुंंटावर ठेवले की झाली घानमाकडी तयार.मग काय ? संंध्याकाळ झाली की , मुले आपापल्या शेजार बेठारातल्या घाणमाकडीवर स्वार होवून खेळाचा आनंंद लुटायचे.अशा सितेपार गावभरात आठ दहा घाणमाकड्या असायच्या. घाणमाकडीच्या खेळासोबतच "डंंडा" हा खेळ खेळला जायचा. मंंदिरजवळचा डंंडा गावात फेमस होता. मातीच्या रस्त्यावर पाण्याने तर कधी चुलीतील राखेने उभ्या आडव्या रेषा ओढुन मैदान तयार व्हायचा. दोन संंघात हा खेळ चुरशीने खेळला जायचा. या खेळा...

वणवा आणि ते तिघं

०००   वणवा आणि ते तिघंं  ००० दुपारची वेळ ..... डोक्यावर तापणारा सूर्य आग ओकत होता. अशा दुपारी मी सकाळची शाळा आटोपून घरी येत होतो. वळणावळणाच्या रस्त्याने मी  चाललो होतो. खींंडीत पोचताच मला रस्त्याच्या डाव्या बाजुला धुराचे लोट  वाहताना दिसले. जवळ गेल्यावर लक्षात आलंं की हि आग शेतकर्‍यांंनी लावलीय. दरवर्षी शेतकरी रानातील गवत कापून झाले की , पुढच्यावर्षी गवत चांंगले यावे यासाठी गवताच्या राहीलेल्या खुंंट्या पेटवतात. अशीच कुणीतरी ही आग लावली होती. दुपारच्या कडक उन्हाने वाळलेल्या गवताच्या खुंंट्या प्रचंंड वेगाने पेटत होत्या. वाटेत येईल त्याची राख करण्याची स्पर्धाच जणुसुरू होती. तु पुढंं की मी अशा त्वेशाने वणवा वार्‍याच्या साथीने पुढे पुढे येईल त्याला गिळंंकृृत करत चालला होता. असा वणवा या दिवसात सगळीकडेच लावला जात असल्याने याकडे कुणाचेच हक्ष नव्हते. याच शेताच्या एका टोकाला रस्त्यापासून पन्नासेक फुटावर  विज वितरण विभागाचे ट्रांंसफार्मर होते. या ट्रांंसफार्मरच्या खालचे व सभोवतीचे गवत तसेच होते. कदाचीत सुरक्षिततेच्या कारणास्तव शेतकर्‍याने कापले नसावे. वार्‍यामुळे वाळल...

आनंदाचे क्षण पेरणारे माझे विद्यार्थी

००० आनंंदाचे क्षण पेरणारे माझे विद्यार्थी ००० दि. १० मार्चे २०१७ ( शुक्रवार ) . माझ्या आयुष्यातील काही खास दिवसांंतील एक. हा दिवस खास केला तो माझ्या आजी - माजी विद्यार्थ्यांंनी. चांंगले शिक्षक मिळणे ही विद्यार्थ्यांंसाठी भाग्याची गोष्ट मानली जाते. कारण गुरू जिवनप्रवास सुकर करण्याची उर्जा देतो. तसेच चांंगले विद्यार्थी मिळणंं हेही भाग्याचेच असते. १० मार्च ला माझा एकतीसावा वाढदिवस. त्यामुळे सकाळपासूनच मोबाईल , व्हाॅॅट्सअॅॅप , फेसबूकवर शुभेच्छा संंदेशांंची रेलचेल सुरु होती. मित्रांंकडुन शुभेच्छांंचा वर्षाव सुरु होता. असे असले तरी हा भाग फक्त शुभेच्छा देण्यापर्यंंतच मर्यादित होता. माझा वाढदिवस कार्यक्रम घेवून कधीही साजरा झाला नाही आणि कुणी केलाही नाही. माझ्या बालपणी तशी पद्धतही नव्हती. वाढदिवस यायचे तसे निघुन जायचे. परंंतु एकतीसावा वाढदिवस या सर्वांंना अपवाद ठरला आणि तो अपवाद ठरवला माझ्या विद्यार्थ्यांंनी. त्यादिवशी मी नेहमीप्रमाने शाळेत गेलो. गावच्या प्रवेशावरच काॅॅलेजला असलेल्या माझ्या माजी विद्यार्थ्यांंनी मला थांंबवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तोपर्यंंत मी शाळेला आल्याचे समजत...

भूक वाचनाची

००० भूक वाचणाची ००० माझे जोडवर्गावर अध्यापण सुरू होते. इ.४ थी ला अभ्यास देवून मी इ.३ री कडे वळलो. मी अध्यापणाला सुरुवात करणार एवढ्यात इ.३ रीच्या प्रज्वलने वर्गातील एका खोक्यातून थोडी पुस्तके काढुण माझ्यापुढे ठेवली. ही सर्व पुस्तके संंस्कारक्षम गोष्टिंंची , साहसकथांंची होती. यात शेरलाॅॅक होम्सच्या साहसकथा , तेनालीराम , अकबर बीरबल , जातक कथा इत्यादी पुस्तके होती. इयत्ता ३ रीची मुले इ. २ रीत असताना त्यांंना वाचनाची गोडी लागावी यासाठी मी प्रत्येक विद्यार्थ्याला दर आठवड्या एक पुस्तक वाचायला देत होतो. हे पुस्तक आठवडाभर विद्यार्थ्याकडे असायचे. त्यामुळे माझ्याकडे उपलब्ध  असलेल्या गोष्टिंंच्या पंंधरा ते वीस पुस्तकांंना विद्यार्थ्यांंनी वर्षभरात दहा बारा वेळा वाचून काढले होते. ही मुले इ. ३ रीत आल्यावर मला वाचनासाठी गोष्टिंंची पुस्तके मागु लागली. त्यामुळे मी काही दिवसांंपासुन नविन पुस्तकांंच्या शोधात होतो. वर्गातच मला नविन पुस्तके सापडली. मग काय..... मुलांंचा आनंंद गगनात मावेनासा झाला. पुस्तक हातात पडताच मुलांंनी एका बैठकीत वाचुन काढले. मुलांंना वाचनाची लागलेली भूक बघुन मलाही मनस्वी आनंं...

या चिमण्यांनो

००० या चिमण्यांंनो....... ००० चिमणी हा इवलासा पक्षी. लहानपणी घरी केलेल्या घरट्यातून हळुच बाहेर डोकवायची आणि अंंगणातील दाने वेचुण आपल्या पिलांंना भरवायची.हे दृृश्य बघताना मन हरकुन जायचंं. पिलांंचा चिवचीवाट ऐकल्याशीवाय दिवसाची सुरुवातच व्हायची नाही. कधी कधी घरट्यातून चिमणीची अंंडी खाली पडुन फुटायची. ही फुटलेली अंंडी मनाला क्लेश द्यायची..... आता सिमेंंची जंंगले चिमण्याचा निवारा हिरावताना बघुन क्लेश होतोय... या चिमण्यांंना जगवण्याची , त्यांंना सुरक्षित निवारा .... पोटभर अन्न..पाणीदेण्याची गरज ओळखुन...... हे बालमनावर रुजवण्यासाठी काही दिवसांंपूर्वी आमच्या शाळेत मी मुलांंच्या मदतीने पक्ष्यांंसाठी पाणपोयी उभारली....झाडावर स्वंंच्छंंद विहार करणार्‍या चिमण्यांंनी सुरूवातीला पाणपोयीकडे पाठ फिरवली. पाणपोयी त्यांंची हक्काची आहे हे समजल्यावर त्या हळुहळु याकडे वळल्या. पाण्याबरोबर त्यांंचा पोटाचा प्रश्न मिटावा यासाठी अन्नाची सोय केली गेली.......त्याचाही  आस्वाद आता चिमण्या घेताहेत. एकाच ठिकाणी अन्न , पाणी व सुरक्षित निवार्‍याची सोय आम्हाला करता आली..... याचे समाधान वाटते..... आमचा हा छोटासा ...

श्रमसंस्कार

००० श्रमसंंस्कार ००० मी नेहमीप्रमाने शाळेत गेलो. मुलांंना किल्या देत वर्ग उघडून घेतले. सर्व मुले आपापल्या कामाला लागली. ठरल्याप्रमाणे कुणी वर्ग स्वच्छता, कुणी मैदान स्वच्छता , कुणी बागेला पाणी , कुणी फळ्यावर परीपाठ लिहु लागले. सर्व कामकाज व्यवस्थित सुरू होते. थंंडी असल्याने मी उन्हाचा आसरा घेत बागेच्या कट्यावर बसलो. इयत्ता ५ वीच्या दोन मुली मैदान लोटत होती. संंपूर्ण मैदानात फरशी बसवली असल्याने , हे काम मुले आनंंदात करुत होती. एवढ्यात मला मैदानात मध्यभागी कुत्र्याने शी केलेली दिसली. मी मुलींंना ती शी काढण्याच्या सूचना दिल्या. मुलींंनी मान  हलवत होकार दिला. मी वर्तमानपत्र वाचत बसलो. चार पाच मिनीटांंनी मी मैदानाकडे बघितल्यावर मला ती घान होती तिथेच दिसली. मुली घाण तशीच ठेवून लोटत पुढे गेल्या होत्या. मी मुलींंना परत घाण उचलण्याची सूचना केली. मुलींंनी परत मान हलवत होकार दिला. मी परत पेपर वाचु लागलो. परत पाच मिनीटांंनी मैदानाकडे बघितल्यावर मला ती घाण तशीच दिसली. आता त्या दोन मुली आपापसात कुजबूजु लागल्या. दोघीत घाण कुणी काढायची यावर त्याच्याती एकमत होईना. हा प्रकार माझ्या लक्षात येताच ,...

दहाला अर्धा किलो

००० दहाला अर्धा किलो.......पंधराला एक किलो ००० बाजारात फेरफटका मारत असताना , " दहाला अर्धा किलो.......पंधराला एक किलो " अशी आरोळी आपल्याला हमखास ऐकायला येते. असा प्रकार भाजी बाजारात सरसकट दिसून येतो. मुळात जी वस्तू दहा रूपयात अर्धा कालो विकली जाते ति वस्तू वीस रूपये किलो दराने विकली जाने अपेक्षित आहे. परंतु ब-याचदा वरील आरोळी कानी पडते. अशा जाहीरातीला भूलून खरेदि केल्यास नुकसान ग्राहकाचे होण्याची शक्यता असते. कारण असल्या व्यवहारात ग्राहक  गरजेपेक्षा जादा वस्तूची खरेदि करून बसतो. शिवाय व्यापारी असल्या व्यवहारातून कमी दर्जाचा माल खपवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे खरेदि करताना जाहीरातीला न भूलता डोळसपणे खरेदि करणेच हिताचे ठरेल...............गुलाब बिसेन