जाहिरात
सध्याचे युग हे जाहिरातीचे आहे. " न बोलणार्याचे गहुही विकत नाहीत , बोलणार्याचे मात्र खडेही विकले जातात." जाहिरात बघितलेरे बघितली कि ती वस्तू घरात आलीच म्हणून समजा. बर्याचअंशी जाहिरात बघुनच वस्तू खरेदि करण्याचा कल वाढत आहे. त्यामुळे पूर्वीची सेल्समनची प्रथा आता मोडित निघाली आहे. आॅनलाईनच्या जमाण्यात ती जागा आता डिलीवरी बाॅयने घेतलीय. जाहीरात बघितली कि ती वस्तू आॅनलाईन मागवायची. दोन दिवसात वस्तू घरात पोच. त्यामुळेही खरेदि कमी कष्टाची झालीय. पण बाजारात जावून भाव करून वस्तू घेण्यातील मजा त्यात नाही.
तंत्रज्ञानाच्या युगात टिव्ही , इंटरनेटच्या माध्यमातून सरळ ग्राहकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला जातो. प्रत्येकाच्या खिशात असलेल्या स्मार्टफोनमुळे जाहिराती खिशात सामावून गेलेल्या आहेत.
ग्रामीण भागातही जाहिरातीसाठी अनेक शक्कल लढवल्या जातात. काळ बदलला तसा जाहिरात करण्याची पद्धतही बदलली. पूर्वी दुकानातील एक व्यक्ती ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठ्याने आरोळी ठोकायची. आता हा प्रकार कमी होवून दुकाणाबाहेर आकर्षक वस्तू , कपडे अडकवत ग्राहकांना आकर्षित केले जाते. काही ठिकाणी ग्राहकांचे हास्यवदनाने स्वागत केले जाते. प्रसार माध्यमांचा जाहीरातींसाठी मोठा वापर केला जातो. टिव्ही , इंटरनेट , ध्ननीक्षेपक , पाॅम्प्लेट्सचाही वापर केला जातो. सार्वजनिक , धार्मिक कार्यक्रमांतही जाहीरातीचे फलक बघायला मिळतात. जिथे गर्दि तिथे जाहिरात हे समिकरणच बणलय. एकंदरीत स्मार्ट जाहीरातीवर अधिक भर दिला जात आहे.
बाजारातून सहज फेरफटका मारताना कपड्यांच्या दुकानासमोर आपल्याला प्लॅस्टिक फायबरचे विविध मानवी पुतळेही दिसतात. या पुतळ्यांना कुठे शर्ट पॅट तर कुठे टि-शर्ट , जिंस नेसवलेले असते. मुलांबरोबरच मुलींचे कपडे परीधान केलेले पुतळेही दिसतात. लहान मुलांचेही असे पुतळे आता सगळीकडेच दितात.
कपड्यांच्या जाहिरातीची पुतळ्यांची क्लुप्ती खुपच यशस्वी ठरते. कारण कुठला ड्रेस कुठल्या माणसाला शोभेल याचे जिवंत उदाहरण ग्राहकापुढे उभे केले जाते. काळे गोरेही पुतळे बघायला मिळतात. जशी फॅशन तसे कपडे घालणारे हे पुतळे बच्चे कंपणीला खुपच आकर्षित करतात.
आमचा भार्गव कपड्यांच्या दुकानात गेला कि हमखास असे पुतळे शोधतो. त्यांचे निरीक्षण करतो. त्यांचे हात हलवतो. आणि मला , " पप्पा फोटो काढा ना !" म्हणत फोटोसाठी पोज देतो. मीही मोबाईलने फोटो काढत त्याचा बालहट्ट पूर्ण करतो.
दहा पंधरा वर्षापाठीमागे असा काळ होता कि , कपडे घ्यायला लहान मुलांना नेले जायचे नाही. घरातील वडीलधार्यांनी दुकानदाराला मुलाचं वय सांगायचं. आणि वयानुसार घरच्यांनी कपडे आणायचे. मग घरात मुलांना घालुन बघायचे. कपड्याचे माप बसले तर ठिक नाहीतर दुसर्या बाजारला कपडे बदलले जायचे.
आता मात्र काळ बदलला तशा पद्धतीही बदलल्या. लहाना पासून मोठ्यांपर्यंत कपडे घेताना त्या व्यक्तीलाच दुकानात नेले जाते. (काही अपवाद वगळता) आणि " तुझ्या पसंतीनुसार घे." असा शब्द दिला जातो. मग खरेदि करणारी व्यक्ती दुकानातच ट्रायल रूममध्ये कपडे घालुन बघुनच दुकानाच्या बाहेर पडते.
एकंदरीत काळ बदलला तसे जाहीरातीचे प्रकार बदलले आणि माणसांच्या सवयीही बदलल्या. नवीन काळात माणूस स्वत: ला काळानुसार ठेवण्याचा प्रयत्न करतोय. ते गरजेचेही आहे. कारण काळ कुणासाठी थांबत नाही. थांबला तो संपला. सतत बदल हाच सृष्टिचा नियम आहे.
..... गुलाब बिसेन (९४०४२३५१९१)
ब्लाॅग - Gulabbisen.blogspot.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा