सर , सिस्तात जावा
००० सर , सिस्तात जावा ०००
शाळेची घंंटा वाजली.... चिमुकली मुले शाळेला आली. शाळा मुलांंनी गजबजली. मुलांंबरोबर वरूण राजानेही दररोज हजेरी लावायला सुरूवात केली. कधी सर तर कधी दिवसभर रीपरीप तर कधी नुसताच ऊन सावल्यांंचा खेळ ! दिवसभर गार वारा आणि अधेमधे पावसाचे आगमण ! आजही असाच कार्यक्रम सुरू होता. ऐन शाळा सुटताना वरूनराजाने आपली हजेरी लावून निरोप घेतला. शाळेतील मुलांंसोबत मीही घरी जाण्यासाठी आवराआवर करू लागलो. लगबगीने रेनकोट घालून गाडीवर बसलो. गाडीला किक मारून , मुलांंचा निरोप घेवून निघणार ऐवढ्यात शाळेतल्या इ. ४थीतील गौरी , तनिष्का आणि इ.३ रीतील त्यांंच्या मैत्रीनी मला म्हणाल्या , " सर , सिस्तात जावा. " मुलींंच्या या अचानक आलेल्या सल्य्याने मी थोडा गोंंधळलो. क्षणभर गोंंधळलेल्या अवस्थेतच त्यांंचा निरोप घेवून पुढे आलो. गावाबाहेर आल्यावर आज झालेल्या बारीक पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याचे माझ्या लक्षात आले. मी गाडी हळूहळू चालवत वाट काढू लागलो. आता मला मगाशी मुली " सिस्तीत जावा." अशा का बोलल्या , याचे गुढ उकलले. आपले शिक्षक घरी सुखरुप जावे यासाठी त्यांंनी दिलेला हा सल्ला होता. या चिमुकल्यांंमध्ये एखाद्या मोठ्या माणसालाही लाजवेल अशी संंवेदनशिलता कुठुण आली असेल ? खरच मी स्वत:ला भाग्यवान समजतो कि , घराबाहेर माझी काळजी घेणारे माझे एवढे चिमुकले विद्यार्थी कायम सोबत असतात............ गुलाब बिसेन ( ९४०४२३५१९१ )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा