सहप्रवासाचा नवसंकल्प
०० सहप्रवासाचा नवसंकल्प ०००
प्रवास या शब्दाशी भूतलावरील सर्व सजीवांची अशी काही गट्टी जमली आहे की, ती सोडुनही सुटु शकत नाही . उलट ती अधिकच घट्ट होत आहे. जिवनात प्रत्येकालाच प्रवास करावा लागतो. सर्व जीवजंतु पासून मानवापर्यंत सर्वच प्रवास करतात. जगण्याच्या लढाईत प्रवास अटळच झालाय. या प्रवासाला नानाविध कला आहेत. नानाविध कारणे आहेत.
जिवनातील या अटळ प्रवासाला सहप्रवासात रुपांतरीत केल्यास जीवन आनंददायी बनण्यास मदत होईल. एकमेकांच्या हातात हात घालुन सहप्रवासाला निघाल्यास जीवन प्रवास अधिक सुकर होईल. या प्रवासात भेटणा-या प्रत्येक वाटसरुला आनंद वाटत गेल्यास आपल्या जीवनातही आनंदाचा गंध नक्की पसरेल. हा जीवन प्रवास " अनाथांना साथ — गरजुंना मदतीचा हात " देत सहप्रवासात बदलुया.
सहप्रवासाने जीवनमार्गावरील प्रवास सुखकर करण्याचा नववर्षारंभी सहप्रवासाचा नवसंकल्प करुया.
॰॰॰ सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ॰॰॰.......................गुलाब बिसेन

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा