अक्षर देणगी
००० अक्षर देणगी ०००
आज विद्यार्थ्यांचा अभ्यास तपासत असताना मी थोडा खिन्न होतो. काही मुलांनी काल रविवार असूनही गृहकार्याची पाटि कोरीच ठेवली होती. अशा मुलांना अपूर्ण गृहकार्य पूर्ण करायला बसवून मी उर्वरीत मुलांचा अभ्यास तपासू लागलो.एवढ्यात इ. ४ थीच्या हर्षदने अभ्यासाची वही माझ्यापुढे सरकवली.ही वही बघताच माझ्या मनातिल खिन्नता कुठल्याकुठे पळून गेली.वाळवंटात अचानक एखादा पाण्याचा स्रोत सापडावा तसे मला झाले.
इ. ४थीत शिकणा-या हर्षदच्या वहीतील हस्ताक्षर बघुन मन आनंदि झाले. वहीतील हस्ताक्षर अगदि दृष्ट लागावी असेच.अक्षर देणगी लाभलेला हर्षद लेखन करताना कमीत कमी चुका करतो. अगदि नाहीच्या बरोबर. टपोरे असलेले अक्षर , शब्दांतील योग्य अंतराने अधिकच आकर्षक होतात.मराठी सोबतच इंग्रजीतही तो सुंदर लेखन करतो..................गुलाब बिसेन

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा