संवेदनशीलता हरवत चाललीय का ?

 ००० संवेदनशीलता हरवत चाललीय का ? ००

  आज शाळेला जात असताना मी जेऊर फाट्यावरून मुख्य रस्ता सोडुन वळणावळणाच्या व तीव्र चढ असलेल्या रस्त्याला लागलो. रस्ता वळणावळणाचा व तिव्र चढाचा असल्याने गाडीचा वेग खुपच कमी होता. माझ्यासोबत माझ्या गाडीवर माझे सहकारी होते. तीव्र चढ चढुन गाडी जरा सपाट रस्त्याला लागल्यावर मला समोर रस्त्यावर काटक्या पडलेल्या दिसल्या . शेतक-यांनी भाताची मळणी करून पिंजराची होळी रस्त्याकडेला करून  पिंजर जनावरांनी खावू नये यासाठी बाभळीच्या काटक्या लावल्या होत्या. त्यातील एक मोठी काटकी वा-याने उडुन रस्त्यावर पडली होती. या काटकीने एका वेळी एकच दुचाकी जाईल एवढाच रस्ता मोकळा सोडला होता. येणारे जाणारे सर्व प्रकार बघून निघून जात होते. परंतु कुणीही काटकी बाजुला करण्याची तसदि घेतली नाही. परिस्थिती बघुन माझे सहकारी गाडीवरून ऊतरले आणि काटकी बाजुला करून आम्ही मार्गस्थ झालो.आजच्या प्रसंगाने माणूस फक्त स्व:तचाच विचार करून बघुनही न बघितल्याचे सोंग घेतो हे अधोरेखीत झाले...........गुलाब बिसेन

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

कवलकी बंडी (नहानपनको खेल)

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा