माझा पुस्तक प्रपंच
००० माझा पुस्तक प्रपंच ॰॰॰
पुस्तकाशिवाय दुसरा चांगला मित्र जगात कुठेही सापडणार नाही. पुस्तके आपल्याला परिस्थितीची जाणीव करुन देतात. दुस-यांचे दु:ख बघायला शिकवतात आणि कठीन परिस्थित जगण्याचे बळ देतात.
माझी आणि पुस्तकांची गाठ पडली ती शाळेत गेल्यावरच ! पहिलीत गेल्यापासुन वाचणाची गट्टी जमायला सुरुवात झाली आणि बघता बघता पुस्तकांतील कवीता आणि धड्यांचा आशय तोंडपाठ होवु लागला. माझ्या घरात माझ्या बाबुजींना वाचणाची खुप आवड होती. परंतु त्यावेळी अवांतर वाचणाची पुस्तकेतर सोडाच साधा वर्तमानपत्रही वाचायला मिळत नव्हता. शहरातील पाहुण्यांकडुन आणलेल्या वर्तमानपत्राच्या रद्दिवर बाबुजी आपली बाचनाची तहान भागवत. सहामहीने वर्षभर जुने पेपर वाचुन काढायचे. पेपर वाचुन झाले की आमची पुस्तके वाचुन काढायचे. त्यामुळे त्याचा अप्रत्यक्ष परीणाम माझ्यावर होवुन मलाही वाचणाची गोडी लागली.
काॅलेजला गेल्यावर थोड्याप्रमाणात का असेना अवांतर वाचणाची पुस्तके दृष्टीस पडु लागली. पण वाचायला मिळत नव्हती. आणि खरेदीही करता येत नव्हती. शेवटी तुपाची तहान ताकावरच भागवावी लागली. नोकरीला लागल्यावर हातात पैसे आले आणि पुस्तकांची तहान भागु लागली. कोल्हापुरात गेल्यावर शाहुस्मारक भवनापासुन कोळेकर तिकटि , भवानी मंडप , राजारामपुरी भागातील ग्रंथप्रदर्शन व पुस्तक प्रदर्शनातून आवडीची पुस्तके घेवु लागलो. यामुळे मागील पाच सहा वर्षात जवळजवळ दीडशे पुस्तकांचा संग्रह माझ्याकडे झाला आहे. यात साने गुरुजी , सिंधुताई सपकाळ , साधनाताई आमटे , विश्वास पाटिल , लक्ष्मण माने , सुधा मूर्ती , किरण बेदी , अप्पासाहेब खोत इत्यादी लेखकांच्या दर्जेदार पुस्तकांचा खजिना मी निर्माण करु शकलो. जीवनातील कठीण प्रसंगी ही पुस्तकेच मला जगण्याचा आधार देतात. माझा हा पुस्तक प्रपंच असाच सुरु राहणार अविरत ! .............गुलाब बिसेन ( 9404235191 )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा