बाळा , आमचं गाव सोडुन जावू नको रं
००० बाळा , आमचं गाव सोडुन जावु नको रं ! ०००
शाळेत प्रवेश करतो न करतो ते माझ्या वर्गातील मुले मला शाळेच्या प्रवेशद्वारावरच कचरा झाडुन काढताना दिसली. मी दिसताच त्यांनी माझ्याभोवती गलका करत म्हणाले , " सर , आमची पाळी नसताना आम्ही लोटुन काढलय." मी त्यांच्या कामगीरीबद्दल त्यांना शाबासकी दिली. त्यांच्याशी चर्चा करतच मी शाळेच्या पाय-या चढु लागलो. एवढ्यात " बाळा , आमचं गाव सोडुन जावू नको रं ." असा आर्त आवाज ऐकु आला. मला वाटलं , कुणीतरी आपापसात बोलत असतील. मी आवाजाकडे दुर्लक्ष करत पुन्हा शाळेच्या पाय-या चढु लागलो. एवढ्यात तोच आर्त आवाज , त्याच सुरात ऐकु आला. यावेळी मी त्याकडे दुर्लक्ष करु शकलो नाही. मी आवाजाच्या दिशेने बघु लागलो.
एक साठीतील आजी घरची जणावरे शाळेच्या पाय-यांना लागुन असलेल्या ओढ्याच्या वाटेने हाकीत चालली होती. मी शाळेत आल्याचा बघुन ती पाय-यांजवळ आली. आणि माझ्याकडे बघत म्हणाली , " बाळा , आमचं गाव सोडुन जावू नको रं ! " मला तिच्या बोलण्याचा अर्थ कळेना. मी बुचकळ्यात पडलो. " बाळा , तु आमच्या पोरांना जीव लावलस. त्यांना चांगलं वागायला शिकवलस . आमचं गाव सोडुन कवाबी जायाचं नायी." आजी माझ्याकडे बघत बोलत होती. आजीच्या या बोलण्याने मला थोडा अर्थ लागला. मी या शाळेतुन बदली करून जावू नये असा त्यांचाएकंदरीत सुर होता. " आजी ,नाही जाणार मी गाव सोडुन ." असे म्हणत पाय-या चढत शाळेत आलो. आजीच्या बोलण्याणे मी थोडा अंतर्मूख झालो. आजीचा तसा शाळेशी फारसा संबंध नव्हता. मग ती मला असं का बोलली ?...... माझ्या मनात विचाराचे काहुर माजले......मी आजपर्यंत शासनाने नेमून दिलेले काम प्रामाणिकपणे केलेय........भाकरीशी गद्दारी करू नये, या नियमाचे मी तंतोतंत पालन करतोय.......माझे विद्यार्थी हेच माझे दैवत मानून काम करतोय.......विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास व्हावा यासाठीच झटतोय.........आजीचे वरील बोलणे कदाचीत याच कामाचे बक्षीस असेल.......परंतु या आजीला कोण समजावेल की , पृथ्वीवरील कोणतीही गोष्ट कायम राहु शकत नाही. येणा-याला एक ना एक दिवस परत फिरावेच लागते......आपले काम पूर्ण करून......हाच निसर्गाचा नियम आहे...............गुलाब बिसेन

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा