आकृतिबंध

००० आकृतिबंध ०००

 विद्यार्थ्यांचा घरचा अभ्यास तपासत असताना मुलांची कुजबुज सुरू असल्याचे मला दिसले.
  " काय चाललय मुलांनो ?"
 " सर , आम्ही आकृतिबंध तयार केलाय."
मी मुलांकडे बघत म्हणालो , " कुठे आहे आकृतिबंध ?"
 " सर , आमच्या ओळी बघा." मुले एका सुरात म्हणाली.
मी अभ्यास तपासायला ओळीत उभ्या असलेल्या मुलांकडे बघितले , तर मुले ओळीत एक मुलगी त्या पाठीमागे मुलगा या क्रमाने उभी होती.
   मुलांनी गणितातील आकृतिबंध प्रत्यक्षात आणला हे बघुन मला खुप आनंद झाला. आकृतिबंध या घटकाच्या अध्ययनावेळी विद्यार्थ्यांनी परीसरातील व घरातील आकृतिबंध शोधुन काढले होते. शालेय अभ्यासाची परीसरातील ज्ञानाशी सांगड घातल्याने विद्यार्थ्यांना आकृतिबंध शोधण्याचा छंदच लागला. पुस्तकी ज्ञानाची व विद्यार्थ्याच्या परीसराची सांगड घातल्याशीवाय घेतलेले ज्ञान वा दिलेले ज्ञान व्यर्थ ठरेल...............गुलाब बिसेनgulabbisen.bloggspot.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

कवलकी बंडी (नहानपनको खेल)

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा