मड्डा

०००  मड्डा  ०००

    रामदास आज झुंजुरकालेच उठला. खाटंखालच्या गळव्यातला गिलासभर पाणी पिऊन लगवील कोठ्यात गेला. कोठ्यात गायी ,बयील उठावच्या तयारीतच होते. त्याना दुधपित्या वासरायले बाजुल बांधुण गायीयच्या मांगचा शेण काळुन तो टोतलीत भरु लागला.
     रामदास आपल्याच तंद्रित होता. तो रातभर झोपला नोहता. दिवसभर धु-यायचा गवत कापून त्याचा आंगना आंग दुकत होता पर झोप त्याच्या जवळ कायी आलीच नायी. त्यालं एकच चिंता सारकी सतावत होती.
     त्याचा च्यार एकराचा धान निसवला होता. धान भरावले पाणी पायजे होता. पर उना-यासारक्या कळक तपनीना बांद्या कड्ड्या पळत होत्या.
    थोळा ओल होता तो च्यार आट दिवस कसातरी ढकलल. पाण्याची कोणतीच आशा दिसत नोहती. येत्या च्यार पाच दिवसात धानाले पाणी नायी भेटला तं यासालीबी मड्डाच कापावा लागल असा त्याले वाटत होता.
     गेल्यासालीच त्याना मोठ्या पोरीच्या लग्नाले " नवतरीत धान देयीन " असा सांगुन तिरोड्याच्या कटरे दलालाकळुन तीस हजार रुपये आंगावर घेतलं होतन.................  " मड्डा "  या माझ्या कथेतून........गुलाब बिसेन  (9404235191)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

कवलकी बंडी (नहानपनको खेल)

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा