पैसा नको , प्रेम द्या
००० पैसा नको , प्रेम द्या ०००
काही दिवसांपूर्वी वृत्तवाहीनीवरील एका बातमीने मन सुन्न करुन टाकले. या बातमीत मन सुन्न करुन टाकण्यासारखे एवढे काय होते ?
बातमी होती एका पाळणाघराची ! तिथे काम करणारी एक बायी एका सात आठ महिन्याच्या बाळावर अमानुष अत्याचार करत होती. हे दृश्य बघुण माणसातील माणूसकी शोधन्याची वेळ आपल्यावर आली असल्याचेच जाणवले.
या पाळणाघरातील मुलांच्या वयाचा विचार केला तर यात खरा दोष कुणाचा ? असा प्रश्न पडतो. एकीकडे पैशाचा हव्यास तर दुसरीकडे माणसातील आटत चाललेलं प्रेम . या दोन्हींच्या मध्ये ही निष्पाप बालके भरडताहेत. आधुनिकतेचा मुखवटा परीधान करुन सुशिक्षित झालेली पीढी यात स्री - पुरुष , पती - पत्नी दोघेही पैसा कमावण्याच्या शर्यतीत पळताहेत. या शर्यतीच्या नादात आपल्या पोटच्या गोळ्याला आई बाबांचे प्रेम मिळायचे राहुनच जातेय.
आज कितीतरी कुटुंब अशा चक्रात सापडुन आपल्या चिमुकल्यांना छळताहेत. घरात दोघेही कमावती असतील तर किमान स्रीनेतरी आपले बाळ तीन चार वर्षाचे होईपर्यंत त्याचे आईच्या मायेने पालनपोषण करावे. किमान तीन चार वर्षांच्या प्रेमाने त्या बाळाची नाळ जन्मदात्यांशी घट्ट बांधली जाईल अशी आशा करुया. परंतु मुल पाच सहा महीन्याचे झाले की , त्याची रवानगी पाळणाघरात केली गेल्याने त्याची नाळ कशी जुळेल ? ज्यांच्या भविष्यासाठी रात्रंदिवस कमावले जातेय त्यांचे वर्तमान मात्र अंधकारमय झालेय. अशी अभागी बालके आपल्या जन्मदात्यांना नक्की म्हणत असतील , " आई - बाबा , आम्हाला पैसा नको. प्रेम द्या "..................गुलाब बिसेन

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा