उमलती कळी
००० उमलती कळी ०००
""""""""""""""""""""
परिपाठ नुकताच झाला होता. वर्गात जावुन हजेरी उघडली , एवढ्यात इ. ३ रीची श्रावणी कसलीतरी फुले घेवून माझ्याजवळ येवुन उभी राहीली. मागोमाग तिच्या मैत्रीणीही आल्या. आणलेली फुले मला देत श्रावणी म्हणाली , "सर , ही फुले आमच्या घराजवळ खुप फुललेली आहेत. मी म्हणालो " हि कसली फुले आहेत ". ती " माहीत नाही सर ". मी फुले हातात घेतली. फिक्कट जांभळ्या रंगांची ही रानफुले होती. श्रावणी व तिच्या मैत्रीनी मला त्या फुलांविषयी विस्ताराने सांगु लागल्या. " या फुलांची रोपे यावर्षी चांगल्या पावसामुळे मोठ्याप्रमाणात उगवली आहेत. या फुलांच्या कळ्या रात्री पाण्यात ठेवल्यास दुस-या दिवशी कळ्या उमललेल्या असतात. फुलांना अनोळखी असा सुगंध आहे. हिफुले खुप बारीक व नाजुक आहेत. मुलींची निरिक्षण शक्ती बघुन मी स्तंभीत झालो. थोडावेळ विचारकेल्यावर माझ्या लक्षात आले कि , मागील वर्षी या मुलींना मी " जाऊ फुलांच्या जगात " या कवीतेच्या अध्यापनावेळी रस्त्याच्या कडेला असणा-या विवविध फुलांचे निरिक्षण केले होते आणि मुलांनाही निरीक्षनाचा मंत्र दिला होता. वरील प्रसंगावरुन माझा छोटा प्रयत्न यशस्वी होतोय असे वाटते .कारण आजचे विद्यार्थीच उद्याचे संशोधक आहेत..............गुलाब बिसेन

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा