स्वनिर्मितीचा आनंद

०००  चिमुकल्यांचा नृत्याविष्कार आणि स्वनिर्मितीचा
---------------------------------------------------------------------आनंद ०००
------------------
               

 
                    " सर , हे गाणं मी बसवलय. चांगलं बसलय ना ?"

शाळेचे स्नेहसंमेलन सुरु असताना अमृतने मला विचारले.

" खुप छान बसलाय डांस ! " मी म्हणालो.

" सर , यावेळी बसवण्याचा प्रयत्न केलाय. माझा पहीलाच प्रयत्न आहे."

मी , " गाणं छानच बसलय ! एखादि स्टेप जर चुकली असेल तर काही फरक पडत नाही . या चुकांतूनच आपण शिकत जाणार आहोत."

शाळेचा माजी विद्यार्थी अमृत गवड व माझी नृत्यांवर चर्चा सुरु होती.
       
       मागील पंधरा दिवसांपासून शाळेतील माझे सहकारी , पालक व शाळेचे माजी विद्यार्थ्यांची स्नेहसंमेलनासाठी धावपळ सुरु होती. सर्व मंडळी झपाटल्यासारखी कामाला
लागली होती. शाळेत शिक्षक तर घरी पालक व आजी माजी विद्यार्थी नृत्य बसवत होती. शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी ब-याच ठिकाणी व्यावसायीक कलाकारांकडुन नृत्य बसवून घेतले जातात. यावर बराच खर्च केला जातो. परंतु आम्ही शिक्षक , पालक व माजी विद्यार्थ्यांची मदत घेवून नृत्य बसवतो. यातील चुकांची दुरुस्तीही आम्हीच करतो. याशिवाय वेशभूषाही स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेलीच वापरली जाते. यासाठी ग्रामस्थांची मोठी मदत आम्हाला होते.

          मागील पंधरा दिवस सुरु असलेल्या मेहनतीला या कार्यक्रमाने पूर्णविराम मिळाला. संपूर्ण गाव कार्यक्रम बघत रात्री ११ वाजेपर्यंत जागे होते. कार्यक्रम बघुन आपल्या मेहनतीचे चीज झाल्याची भावना पालकांत दिसत होती. आपल्या चिमुकल्याचे नृत्याविष्कार बघतान सर्वांचे भान हरपून गेले होते. कार्यक्रम  संपल्यावर स्वनिर्मितीचा आनंद पालकांच्या चेह-यावरुन ओसंडून वाहत होता.........................गुलाब बिसेन

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडपडणारा शिक्षक - गुलाब रमेश बिसेन

कवलकी बंडी (नहानपनको खेल)

मुलांचे भावविश्व उलगडणारा बालकवितासंग्रह - सागरलाटा