हॅप्पी बाप्पा
००० हॅप्पी बाप्पा ०००
"""""""""""""
शाळेत पाऊल ठेवतो न ठेवतो इ. ३ री चा प्रज्वल त्याच्या मित्रांसोबत त्याने मातीपासून बनवलेली बाप्पांची मूर्ती घेवून आला. मूर्ती सुबक व सुंदर होती. मी त्याच्या कलेचे कौतुक केले आणि वर्गात गेलो. सगळीकडे गणोशोत्सवाचा आनंद ओसंडत असताना बालगोपाल मागे कसे राहणार. त्यांनीही आपल्यापरीने तयारी सुरू केली होती.
वर्गात गेल्यावर वेगळ्याच विषयाने माझ्या मनात कल्लोळ माजवला. मागील काही वर्षांपासून गणेशोत्सवात मातीच्या मूर्तींऐवजी प्लॅस्टर आॅफ पॅरीसपासून बनवलेल्या मूर्त्यांना मागणी अधीक वाझलीय. यामागे अनेक कारणे आहेत. कारण कोणतेही असले तरी शेवटी हानी पर्यावरणाची होतेय. यावर बालगोपालांचे प्रबोधन करावे असा मनात विर आला.
परीपाठ झाल्यावर मी मुलांना दोन बादल्यांत पाणी आणायला सांगितले. एका विद्यार्थ्याने POP पासून बनवलेली मूर्ती आणली . ती एका बादलीत ठेवली. दुस-या बादलीत प्रज्वलने आणलेली मातीची मूर्ती ठेवली. तासाभरानंतर सर्व मुलांना घेवुन दोन्ही बादल्यांचे निरीक्षण केले. निरीक्षणावरू मुलांना आश्चर्याचा धक्काच बसला. PPO पासुनबनवलेल्या मूर्ती वर पाण्याचा कोणताच परीणाम झालेला नव्हता. मातीची मूर्ती मात्र पूर्णपणे नष्ट झालेली होती. यावरून मुलांना मातीच्या मूर्तीचे महत्व पटले आणि मुलांनी या गणेशोत्सवात " हॅप्पी बाप्पा " च घरी आणण्याचा निर्धार केला. ..............गुलाब बिसेन.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा